चार महिने फक्त 1 खजूर आणि 1 ग्लास दूधावर, ‘करारी सावरकर’ साकारण्यासाठी रणदीप हुडाने घटवले ‘इतके’ वजन

Randeep Hooda's preparation for Swatantra Veer Savarkar : 'सरबजीत' चित्रपटासाठी रणदीप हुड्डाने त्याचं वजन खूप कमी केले होते. आता पुन्हा एकदा 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटासाठी त्याने वजन कमी केले आहे.

चार महिने फक्त 1 खजूर आणि 1 ग्लास दूधावर, 'करारी सावरकर' साकारण्यासाठी रणदीप हुडाने घटवले ‘इतके’ वजन
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 9:39 AM

मुंबई : रविवारपासून एका चित्रपटाच्या टीझरने बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला असून, त्याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट म्हणजे ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’. या चरित्रात्मक चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या टीझरसोबतच रणदीपचा लूकही सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो हुबेहूब विनायक दामोदर सावरकरांसारखा दिसत आहे.

त्याचा हा लूक पाहून रणदीप स्वतःला व्यक्तीरेखेशी कसं जुळवून घेतो, असा प्रश्न लोकांना पडत आहे. या परफेक्ट लूकमागे रणदीपची कठोर मेहनत दडलेली आहे आणि त्यासाठी त्याने 4 महिने काटेकोर डाएट प्लॅन फॉलो केला.

रणदीप हुड्डाचा जन्म 20 ऑगस्ट 1976 रोजी रोहतक येथे झाला. मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या 46 वर्षीय अभिनेत्याने प्रत्येक पात्र साकाराताना जीवतोड मेहनत करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. तो फक्त एखादी भूमिका करत नाही तर ती जगण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो त्या पात्रांचा आत्मा पकडण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पात्राच्या दिसण्यावर, देहबोलीवरही खूप काम करतो. याआधी त्याने ‘सरबजीत’ चित्रपटासाठी वजन कमी करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन हिचीही प्रमुख भूमिका होती. आता रणदीप पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवण्यास सज्ज झाला असून वीर सावरकरांच्या लूकने तो सर्वांना प्रभावित करत आहे.

1 खजूर आणि 1 ग्लास दूध

कोणत्याही अभिनेत्यासाठी एखादी व्यक्तिरेखा साकारणे सोपे नसते. विशेषत: जेव्हा भूमिकेनुसार वजन कमी-अधिक करावे लागते, तेव्हा त्यामागे खूप मेहनत घ्यावी लागते. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर निर्माता आनंद पंडित यांनी सांगितले की चित्रपटासाठी रणदीपने 4 महिन्यांत वजन कसे कमी केले. आनंद म्हणाले, रणदीप चित्रपटाच्या संदर्भात माझ्याकडे आला तेव्हा त्याचे वजन 86 किलो होते. अशा परिस्थितीत आपल्या व्यक्तिरेखेत उतरण्यासाठी रणदीप संपूर्णपणे झोकून देतो. या चित्रपटाचे शूटिंग संपेपर्यंत त्याने 4 महिने फक्त 1 खजूर आणि 1 ग्लास दूध सेवन केले. रणदीपने 26 किलो वजन कमी केले. एवढेच नाही तर रणदीपने या लूकसाठी केसही कापले.

विशेष म्हणजे या चित्रपटासाठी रणदीपने कोणत्याही प्रकारचा प्रोस्थेटिक मेकअप केलेला नाही. या चित्रपटासाठी रणदीपने वीर सावरकरांच्या नातवाकडून परवानगी घेतली होती. चित्रपटाचे चित्रीकरण महाबळेश्वरजवळील एका गावात झाले आहे. या चित्रपटात अंकिता लोखंडेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.