छोट्या पडद्यावरील आजी-आजोबांची चटका लावणारी एक्झिट

'अग्गंबाई सासूबाई' मालिकेतील लाडके बबड्याचे आजोबा रवी पटवर्धन यांच्या निधनानंतर स्मृतींना उजाळा दिला जात आहे

छोट्या पडद्यावरील आजी-आजोबांची चटका लावणारी एक्झिट
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 7:06 AM

मुंबई : प्रत्येकाच्या घरात असलेला छोटा पडदा, जसा प्रेक्षकांना जवळचा वाटतो, तशाच छोट्या पडद्यावरच्या व्यक्तिरेखाही आपल्याशा वाटतात. टीव्ही मालिकांमधील नायक-नायिकांच्या व्यक्तिरेखा जितक्या गाजतात, तितक्याच सहाय्यक भूमिका करणारे कलाकारही लोकप्रिय होतात. अलिकडच्या काळात नायक-नायिकांचे आजी-आजोबाही चांगलेच भाव खात आहेत. त्यामुळेच गेल्या काही दिवसात जीजी, बबड्याचे आजोबा (ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन –  Ravi Patwardhan) यासारख्या भूमिका साकारणाऱ्या दिग्गज कलाकारांची एक्झिट चटका लावून जाणारी आहे. (Veteran Actor Ravi Patwardhan dies will be remembered for Babdya’s Grandfather role)

झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ (Aggabai Sasubai) मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता कमावली. जितकी आसावरी आणि अभिजीतची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली, तितकीच शुभ्राही प्रभावी ठरली. जसा सोहम म्हणजे बबड्याचा घरोघरी बोटं मोडून तिटकारा व्यक्त केला जातो, तसेच बबड्याचे आजोबाही अनेकांना आपलेसे वाटत. दिग्गज अभिनेते रवी पटवर्धन यांनी साकारलेली करारी, खमक्या आजोबांची भूमिका काही एपिसोड्समध्येच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.

आजोबा परतलेच नाहीत…

मार्च महिन्यात लॉकडाऊन लागला आणि मालिकेला ब्रेक मिळाला. चार महिन्यांनी आसावरी-अभिजीत परतले, मात्र वयोमानापरत्वे आजोबांना सेटवर येण्यास परवानगी मिळाली नाही. माझा होशील ना मालिकेतील अण्णा अर्थात दिग्गज अभिनेते अच्युत पोतदार घरबसल्या शूटिंगमध्ये सहभागी होऊ लागले, मात्र रवी पटवर्धन यांचं मार्च महिन्यातील दर्शन अखेरचं ठरलं. कारण त्यानंतर आजोबा परतलेच नाहीत…

सहा डिसेंबरची सकाळ अनेकांसाठी धक्कादायक होती. कारण अग्गंबाई सासूबाई मालिकेतील आजोबांनी अखेरचा श्वास घेतल्याचे वृत्त समोर आले. सोशल मीडियावर सगळ्यांच्या गळ्यातील ताईत असलेले लाडके आजोबा अनंताच्या प्रवासासाठी निघून गेले.

बबड्या-शुभ्रापेक्षाही लोकप्रिय व्यक्तिरेखा

सोशल मीडियावर बबड्याच्या आजोबांसाठी अनेक मेसेज येत असल्याचं आपण पाहिलं आहे. अगदी तेजश्री प्रधान-आशुतोष पत्की यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवरही आजोबांची आठवण काढली जात असे. आजोबांचं फॅन फॉलोइंग इतकं जबरदस्त होतं, की तेजश्रीने इन्स्टा स्टोरीमधून रवी पटवर्धन यांच्यासोबत फोटो शेअर करत आम्हालाही तुमची आठवण येते, सर्व काही सुरळीत झाल्यावर तुम्ही सेटवर परत येण्याची वाट पाहतोय, असं सांगावंसं वाटलं.

‘लागिरं…’तील जीजीची एक्झिट

नोव्हेंबर महिन्यात ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं वयाच्या 74 व्या वर्षी निधन झालं. कमल ठोके यांना कारकीर्दीत इतर भूमिकांमुळे जितकी लोकप्रियता मिळाली, त्यापेक्षा कांकणभर अधिक ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील जिजीच्या भूमिकेमुळे मिळाली असेल. त्या घराघरात ”जिजी” या नावाने परिचित झाल्या. सासर माहेर, सखा भाऊ पक्का वैरी, कुंकू झालं वैरी, भरला मळवट, बरड अशा अनेक चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या होत्या. मात्र मालिकेतील जिजीची भूमिका काहीशी वेगळीच ठरली.

आभाळमायातील मायाळू आजी

याआधी, काहे दिया परदेस मालिकेतील गौरीच्या आजीनेही अशीच लोकप्रियतेची उंची गाठली होती. आभाळमाया मालिकेपासून मायाळू आजी साकारत आलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांची एक्झिटही चटका लावणारी होती. तुमच्या-आमच्या घरात असणारे, आजूबाजूला वावरणारे, प्रेम-माया करणारे, प्रसंगी ओरडणारे पण पुढच्याच क्षणी पोटाशी धरणारे आजी-आजोबा छोट्या पडद्यावरही दिसू लागले, त्यामुळे आपलेसेही वाटू लागले. मालिका संपली, तरीही व्यक्तिरेखा मनात कायमचं घर करतात. जगाचा निरोप घेतलेले दिग्गज कलाकारही निरंतर स्मरणात राहतील, यात शंका नाही.

छोट्या पडद्यावर गाजलेले आजी-आजोबा

आई आजी – होणार सून मी ह्या घरची माई आजी – एका लग्नाची दुसरी गोष्ट बबड्याचे आजोबा – अग्गंबाई सासूबाई (Veteran Actor Ravi Patwardhan dies will be remembered for Babdya’s Grandfather role) नानी – चूक भूल द्यावी सरु आजी – देव माणूस माई – घाडगे अँड सून्स आजी – काहे दिया परदेस जिजी – लागिरं झालं जी गोदाक्का – तुझ्यात जीव रंगला अण्णा – घाडगे अँड सून्स अण्णा – माझा होशील ना

संबंधित बातम्या :

Ravi Patwardhan | ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन

(Veteran Actor Ravi Patwardhan dies will be remembered for Babdya’s Grandfather role)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.