Shirish Kanekar | ‘कणेकरी’ पर्वाचा अस्त… ज्येष्ठ पत्रकार, सिने, क्रिकेट समीक्षक शिरीष कणेकर यांचं निधन, वयाच्या 80व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ पत्रकार, समीक्षक, चतुरस्त्र लेखक शिरीष कणेकर यांचे निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

Shirish Kanekar | 'कणेकरी' पर्वाचा अस्त... ज्येष्ठ पत्रकार, सिने, क्रिकेट समीक्षक शिरीष कणेकर यांचं निधन, वयाच्या 80व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
शिरीष कणेकर यांचे निधन
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 3:18 PM

मुंबई | 25 जुलै 2023 : ज्येष्ठ पत्रकार, सिने, क्रिकेट समीक्षक, चतुरस्त्र लेखक शिरीष कणेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती खालावल्यामुळे आज (मंगळवार) सकाळी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. ‘लगाव बत्ती’ ‘कणेकरी’ ‘ फिल्लमबाजी, ‘ ‘शिरीषासन ‘ ‘शिणेमा डॉट कॉम’ यासह त्यांची अनेक पुस्तकं आणि ललितलेख गाजले.

शैलीदार, खुसखुशीत लेखन ही शिरीष कणेकरांची ख्याती. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारणावरील, त्यांचे लेख प्रसिद्ध आहेत. त्यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे. ‘माझी फिल्लमबाजी’, ‘फटकेबाजी’ व ‘कणेकरी’ या तीन एकपात्री कार्यक्रमांचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती व सादरीकरण त्यांनी केले. त्याला प्रेक्षकांचा आणि कलाकारांचाही उदंड प्रतिसाद मिळाला.

शिरीष कणेकर यांचा अल्पपरिचय

शिरीष मधुकर कणेकर यांचा जन्म ६ जून १९४३ रोजी झाला. रायगड जिल्ह्यातील पेण हे त्यांचे मूळ गाव होते. शिरीष कणेकर यांचे वडील विख्यात डॉक्टर असल्याने त्यांचं   बालपण भायखळा येथील रेल्वे रुग्णालयाच्या सरकारी निवासस्थानामध्ये गेलं. कणेकर यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए.एलएलबी केले.

इंडियन एक्सप्रेस, फ्री प्रेस जर्नल, डेली, सिंडिकेट प्रेस न्यूज एजन्सी या वर्तमानपत्रांसाठी त्यांनी काम केलं होतं. तसेच मुख्यत: मराठी वृत्तपत्रांतून त्यांची अनेक सदरे गाजली. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना, पुढारी, लोकमत , साप्ताहिक मनोहर, साप्ताहिक लोकप्रभा, साप्ताहिक प्रभंजन, पाक्षिक प्रभंजन, पाक्षिक चंदेरी, साप्ताहिक चित्रानंद, सिंडिकेटेड कॉलम, द डेली (इंग्रजी) या सर्वांसाठी त्यांनी अनेक स्तंभलेख लिहीले.

लिखाणाची अनोखी शैली 

नर्मविनोदी शैलीत लिहिता लिहिता डोळ्यात पाणी आणण्याची कणेकरांची हातोटी होती. त्यांच्यावर जणू सरस्वती प्रसन्न झाली होती. कणेकर यांनी कागदाला पेन लावताच शब्द अपसूकच कागदावर उमटायचे, इतकी त्यांच्या लेखनाची ताकद होती. लताबाई आणि दिलीप कुमार यांच्यावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं. दोघांच्या आठवणी आणि किस्से सांगताना कणेकर देहभान विसरत. तहान भूक विसरून ते भडाभडा बोलत, लिहीत. हे लिहिताना या दोघांच्या स्वभावाचा परिचयही ते बेमालूमपणे करून देत. लतादीदींनी त्यांना अनेक किस्से सांगितले, ते सांगताना कणेकरांनी त्यात रंजकता आणली, पण विपर्यास केला नाही.

शिरीष कणेकर यांचे प्रकाशित साहित्य

क्रिकेट-वेध , गाये चला जा, यादोंकी बारात (इ.स. १९८५), पुन्हा यादोंकी बारात (इ.स. १९९५), ते साठ दिवस, डॉलरच्या देशा, अशी अनेक हिंदी चित्रपटांलवरील तसेच प्रवासवर्णन करणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहीली. तसेच रहस्यवल्ली हे रहस्यकथांचे पुस्तकही त्यांनीच लिहीले होते.

हिंदी चित्रपटांविषयीची पुस्तके

कणेकरी , नट बोलट बोलपट, शिरीषासन , पुन्हा शिरीषासन, फिल्लमबाजी, शिणेमा डॉट कॉम

ललितलेखन

शिरीष कणेकर यांचं ललितलेखनही खूप गाजलं. आंबटचिंबट, इरसालती, एकला बोलो रे, कट्टा, गोतावळा, चर्पटपंजरी, चहाटळकी, चापटपोळी, डॉ. कणेकरांचा मुलगा, फटकेबाजी, नानकटाई ही त्यांपैकीच काही गाजलेली उदाहरणे.

शिरीष कणेकर यांना मिळालेले पुरस्कार

त्यांच्या ‘लगाव बत्ती’ या कथा संग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट विनोदी वाङ्‌मयाचा चिं.वि. जोशी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. तर ‘सूरपारंब्या’ या लेखसंग्रहास सर्वोत्कृष्ट विनोदी वाङ्‌मयाचा पुरस्कार मिळाला होता. तसेच मुंबई पत्रकार संघातर्फे दिला जाणारा ‘कै. विद्याधर गोखले ललित साहित्य पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.