Avinash Kharshikar | ‘माफीचा साक्षीदार’ काळाच्या पडद्याआड, अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे निधन!

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर (Marathi Actor Avinash Kharshikar) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने आज (8 ऑक्टोबर) सकाळी दहा वाजता ठाण्यातील राहत्या घरी निधन झाले.

Avinash Kharshikar | ‘माफीचा साक्षीदार’ काळाच्या पडद्याआड, अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे निधन!
Follow us
| Updated on: Oct 08, 2020 | 2:30 PM

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर (Marathi Actor Avinash Kharshikar) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने आज (8 ऑक्टोबर) सकाळी दहा वाजता ठाण्यातील राहत्या घरी निधन झाले. अविनाश खर्शीकर जानेवारीपासून आजारी होते. त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. दीर्घकाळ आजारी असलेल्या अविनाश यांनी वयाच्या 68व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी श्रद्धांजली देत ही बातमी शेअर केली आहे.(Veteran Marathi Actor Avinash Kharshikar Passed Away)

अविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केले होते. ‘बंदिवान मी या संसारी’ हा अविनाश खर्शीकर यांचा १९७८ साली प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट.  तसेच ‘माफीचा साक्षीदार’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘चालू नवरा भोळी बायको’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून त्यांनी आपली अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. ‘लफडा सदन’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘दिवा जळू दे सारी रात’ यांसारखी नाटके देखील त्यांनी गाजवली होती.  अविनाश खर्शीकर यांनी काही मालिकांमध्येही काम केलं होतं. ‘दामिनी’ या लोकप्रिय मालिकेत ते झळकले होते.(Veteran Marathi Actor Avinash Kharshikar Passed Away)

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांनीही अविनाश खर्शीकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सदाबहार अभिनेते म्हणून ओळख

अविनाश खर्शीकरांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर भूरळ घातली होती. मात्र, अनोख्या शैलीमुळे ते तरुणींच्या गळ्यातले ताईत बनले होते. 90च्या दशकात अभिनयासोबतच अविनाश यांच्या लुकची देखील तितकीत चर्चा सिनेसृष्टीत होती. सदाबहार अविनाश खर्शीकर यांनी दैनंदिन मालिका ‘दामिनीत’ महत्त्वाची भुमिका साकारली होती. मराठी सिनेसृष्टीतील देखण्या अभिनेत्यांपैकी अविनाश एक होते. ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकात त्यांनी साकारलेली ‘श्याम’ची भूमिका विशेष गाजली होती. महाविद्यालयीन विद्यार्थी असणारा ‘श्याम’ ते वयाच्या 60व्या वर्षीदेखील तितक्याच ग्रेसफुली सादर करत होते.

मार्गदर्शक मित्र गमावला : डॉ. अमोल कोल्हे

(Veteran Marathi Actor Avinash Kharshikar Passed Away)

'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'.
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार.
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले.
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.