अजिंक्य देव-लक्ष्मीकांत बेर्डेंची हिरोईन ते काकीसाहेब, पूजा पवार यांची कारकीर्द ‘लय भारी’

अभिनेते अजिंक्य देव यांच्यासोबत सर्जा चित्रपटातून पूजा पवार यांनी 1987 मध्ये चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. (Marathi Actress Pooja Pawar Salunkhe )

अजिंक्य देव-लक्ष्मीकांत बेर्डेंची हिरोईन ते काकीसाहेब, पूजा पवार यांची कारकीर्द 'लय भारी'
अभिनेत्री पूजा पवार साळुंंखे
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 9:05 AM

मुंबई : ‘कारभारी लयभारी’ या झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेत राजवीर आणि पियू यांची गावरान प्रेमकहाणी पाहायला मिळत आहे. मात्र या दोघांइतकेच त्यांच्या प्रेमकहाणीत खोडा घालणारे व्हिलनही गाजत आहेत. या मालिकेतील काकीसाहेब ही व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. प्रख्यात अभिनेत्री पूजा पवार ही भूमिका साकारत आहेत. (Veteran Marathi Actress Pooja Pawar Salunkhe plays Kaki Saheb in Karbhari Laybhari Zee Marathi Serial)

पूजा पवार यांनी विनोदाचे बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे, हरहुन्नरी कलाकार सचिन पिळगांवकर यांच्यासोबत भूमिका केल्या आहेत. अभिनेते अजिंक्य देव यांच्यासोबत सर्जा चित्रपटातून त्यांनी 1987 मध्ये चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. पूजा पवारांनी साकारलेली कस्तुराची भूमिका चांगलीच भाव खाऊन गेली.

पूजा पवार यांचे गाजलेले चित्रपट :

उतावळा नवरा (1989), राजाने वाजवला बाजा (1989), एक होता विदूषक (1992), झपाटलेला (1993), विश्वविनायक (1994), माझा छकुला (1994), टोपी वर टोपी (1995) अशा अनेक चित्रपटांमध्ये पूजा पवार झळकल्या आहेत.

(Veteran Marathi Actress Pooja Pawar Salunkhe plays Kaki Saheb in Karbhari Laybhari Zee Marathi Serial)

लग्नानंतर ब्रेक

खिलौना बना खलनायक या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्येही पाय ठेवला. मोठा पडदा गाजवणाऱ्या पूजा पवारांनी 1999 मध्ये रंग प्रेमाचा सिनेमानंतर लग्नाच्या वेळी ब्रेक घेतला होता. विवाहानंतर पूजा पवार यांची पूजा साळुंखे झाली. लग्न, मुलीच्या संगोपनामुळे पूजा यांनी मनोरंजन विश्वापासून लांब राहणं पसंत केलं.

पूजा पवार यांच्यातील कलाकार त्यांना स्वस्थ बसू देईना. तब्बल 15 वर्षांच्या गॅपनंतर त्यांची पावलं पुन्हा मनोरंजन विश्वाकडे वळली. 2004 मध्ये हेडलाईन या सिनेमातून त्या चित्रपटसृष्टीत परतल्या. धनगरवाडा, धोंडी, अशी ही आशिकी, पुरुषोत्तम असे सिनेमे त्यांनी आपल्या सेकंड इनिंगमध्ये केले.

सेकंड इनिंगमध्ये छोटा पडदा गाजवला

झी युवा वाहिनीवरील ‘बापमाणूस’ या मालिकेत दिग्गज अभिनेते रवींद्र मंकणी यांच्यासह पूजा पवारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. त्यानंतर स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते!’ या मालिकेत त्या अंकिताच्या आईच्या नकारात्मक भूमिकेत दिसल्या. आता झी मराठी वाहिनीवरील ‘कारभारी लयभारी’ या मालिकेत कांचन सुर्यवंशी उर्फ काकीसाहेबांची खलनायिकेची मुख्य भूमिका त्या साकारत आहेत.

पूजा पवार यांनी काही दिवसांपूर्वी चला हवा येऊ द्या कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावली होती. डॉ. नीलेश साबळे यांच्या आग्रहाखातर त्यांनी आपल्या नृत्याची चुणूक दाखवली होती.

संबंधित बातम्या :

सणाच्या दिवशीही आईच्या वाट्याला दुःखच!  देशमुखांच्या पारंपरिक पूजेत अनिरुद्ध संजनालाही करणार सहभागी!

‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम जिजी अक्का आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची सून

आई मराठी, मुस्लीम वडिलांच्या तिसऱ्या बायकोची मुलगी, ‘देवमाणूस’फेम नेहा खानची संघर्षगाथा

(Veteran Marathi Actress Pooja Pawar Salunkhe plays Kaki Saheb in Karbhari Laybhari Zee Marathi Serial)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.