Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘छावा’ सिनेमाची घोडदौड सुरुच! विकी कौशलने कमाईच्या बाबतीत अक्षय आणि अजयलाही मागे टाकले

Chhaava Box Office Collection: 'छावा' सिनेमाची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी देखील सिनेमा चांगली कमाई करताना दिसत आहे.

'छावा' सिनेमाची घोडदौड सुरुच! विकी कौशलने कमाईच्या बाबतीत अक्षय आणि अजयलाही मागे टाकले
Follow us
| Updated on: Feb 22, 2025 | 8:30 AM

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान आणले आहे. या चित्रपटातील अभिनेता विकी कौशलने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. फेब्रुवारी १४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा चांगली कमाई करत आहे. आता चित्रपट प्रदर्शित होऊन आठ दिवस उलटले आहेत. तरीही या चित्रपटाची क्रेझ कमी होत नसल्याचे दिसत आहे. चला जाणून घेऊया शुक्रवारी या चित्रपटाने किती कमाई केली आहे.

विकी कौशल आणि रश्मिका मंदानाचा ‘छावा’ सिनेमा दररोज बॉक्स ऑफिसवर जलवा दाखवण्यात यशस्वी होत आहे. चित्रपटाची कमाई पाहाता येत्या काळात हा सिनेमा नव्या प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना देखील टक्कर देणार असे म्हटले जात आहे. स‌ॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी भारतात २३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई २४२.२५ कोटी रुपये झाली आहे.

पहिला दिवस : ३१ कोटी रुपये

हे सुद्धा वाचा

दुसरा दिवस : ३७ कोटी रुपये

तिसरा दिवस : ४८.५ कोटी रुपये

चौथा दिवस : २४ कोटी रुपये

पाचवा दिवस : २५.२५ कोटी रुपये

सहावा दिवस : ३२ कोटी रुपये

सातवा दिवस : २१.५ कोटी रुपये

आठवा दिवस : २३ कोटी रुपये

एकूण कमाई २४२.२५ कोटी रुपये

‘छावा’ सिनेमाविषयी बोलायचे झाले तर हा सिनेमा १४ फेब्रुवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने ‘जवान’, ‘पठाण’, ‘पुष्पा’ यांसारख्या सिनेमांना कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. छावा सिनेमामधील विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांच्या भूमिका विशेष गाजताना दिसत आहेत.

छावा सिनेमाने आतापर्यंत ७ सिनेमांना टक्कर दिली आहे. त्यामध्ये कंगना रणौतचा इमर्जंसी, जुनैद खानचा लवयापा, हिमेश रेशमियाचा बॅडएस रविकुमार, अजय देवगणचा आदाज, अक्षय कुमारचा स्कायफोर्स आणि शाहिद कपूरच्या देवा सिनेमाला टक्कर दिली आहे. हे सातही सिनेमे २५० पर्यंत देखील पोहोचू शकले नाहीत. मात्र, छावा सिनेमाने एकूण २४२.२५ कोटी रुपयांची कमाई केला आहे. जगभरात चित्रपटाने ३०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे.

राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं...
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं....
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट.
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?.
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?.
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या...
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या....
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली.
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.