दिसतं तसं नसतं… सलमान खानच्या त्या कृत्यानंतर विकी कौशलने दिली पहिली प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांपासून सलमान खान आणि विकी कौशलचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. आता त्या व्हिडिओवर विकी कौशलची प्रतिक्रिया समोर आली आहे.

दिसतं तसं नसतं... सलमान खानच्या त्या कृत्यानंतर विकी कौशलने दिली पहिली प्रतिक्रिया
विकी कौशल- सलमान खानImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 1:37 PM

Vicky Kaushal Reaction On Viral Video : आयफा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बॉलिवूडचे अनेक स्टार्स सध्या अबुधाबीमध्ये पोहोचले आहेत. या मोठ्या कार्यक्रमात सुपरस्टार सलमान खानही (salman khan) सहभागी झाला होता. सलमान खान त्याच्या आगामी ‘टायगर 3’ चित्रपटाचे व्यस्त शेड्यूल अबुधाबीमध्ये शूट करणार आहे. यासोबतच तो आयफाचा भागही बनला. यावेळी अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) आणि अभिषेक बच्चन (abhishek bachchan) हे आयफा होस्ट करत आहेत.

या कार्यक्रमापूर्वी आदल्या दिवशीच्या एका व्हिडिओची खूप चर्चा झाली होती. IIFA 2023 च्या पत्रकार परिषदेतील सलमान आणि विकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला होता. यामध्ये सलमानने विकीकडे साफ दुर्लक्ष केल्याचं दिसत होतं. सलमानच्या बॉडीगार्डने ज्याप्रकारे विकीला बाजूला केलं, ते पाहून चाहत्यांनीही राग व्यक्त केला होता.

या व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या. मात्र, काही लोकांना सुरक्षा रक्षकांचं हे वागणं अजिबात आवडले नाही. त्यानंतर आता या व्हिडिओवर विकी कौशलची प्रतिक्रिया समोर आली आहे.

यासंदर्भात मीडियाशी बोलताना विकी म्हणाला, “कधीकधी गोष्टी व्हिडिओमध्ये दिसतात त्याप्रमाणे नसतात.” विकीच्या म्हणण्यानुसार, कधीकधी काही गोष्टी वाढवून दाखवल्या किंवा सांगितल्या तात. अनेकवेळा विनाकारण त्याच्याबद्दल चर्चा होते. त्याचा काही उपयोग नाही. अनेक वेळा व्हिडीओमध्ये जे दिसते ते सारखे नसते. त्यामुळे त्यावर बोलून उपयोग नाही. विकीच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होते की व्हिडिओमध्ये जे दिसलं (सलमानचं विकीकडे दुर्लक्ष) ते खरं नाही.

View this post on Instagram

A post shared by RK (@rohitkhilnani)

मिळालेल्या माहितीनुसार, नंतर आयफाच्या ग्रीन कार्पेटवर, सलमान खान स्वतः विकी कौशलकडे गेला आणि त्याला मिठी मारली आणि सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. विकी कौशलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच सारा अली खानसोबत ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात दिसणार आहे.

तर सलमान खान टायगर 3 च्या चित्रीकरणात व्यस्त असून हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होईल असे समजते. सलमान खानच्या टायगर 3 बाबत लोकांमध्ये खूप क्रेझ पाहायला मिळत आहे. यावेळी सलमान आणि कतरिना कैफसोबत इमरान हाश्मी देखील टायगर 3 मध्ये दिसणार आहे.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.