एका नकाराने आयुष्य बदललं, राजकुमार रावमुळे विक्की कौशल बनला बॉलिवूड स्टार; काय आहे इन्साईड स्टोरी

विकी कौशल बॉलिवूडचा मोठा स्टार बनला आहे. राजकुमार रावने 'नकार' दिल्यानंतर त्याला लीड डेब्यू चित्रपट मिळाला. ही इन्साईड स्टोरी आपण जाणून घेऊया.

एका नकाराने आयुष्य बदललं, राजकुमार रावमुळे विक्की कौशल बनला बॉलिवूड स्टार; काय आहे इन्साईड स्टोरी
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 9:39 AM

Vicky Kaushal Birthday : ॲक्शन असो वा रोमँटिक चित्रपट किंवा ऐतिहासिक भूमिका, बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता विक्की कौशलने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत सर्व प्रकारचे चित्रपट केले आहेत. मसानपासून संजू आणि उरीपर्यंत, विकीने आतापर्यंत केलेले सर्व चित्रपट, त्याने पडद्यावर साकारलेली सर्व पात्रे, प्रत्येक पात्रासाठी त्याला भरभरून दाद मिळाली .

विकीने 2015 साली ‘मसान’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना खूपच आवडला. मात्र, या चित्रपटासाठी अभिनेता म्हणून तो पहिली पसंती नव्हता. आज 16 मे रोजी विकीचा वाढदिवस असतो. तो त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच निमित्ताने बॉलिवूडला हा एक उत्तम अभिनेता, हिरो मसानद्वारे कसा मिळाला, ते जाणून घेऊया.

राजकुमार रावला ऑफर झाला होता मसान

रिपोर्ट्सनुसार, विकी कौशलच्या आधी मसान हा चित्रपट राजकुमार रावला ऑफर झाला होता. मात्र राजकुमार रावने या चित्रपटासाठी नकार दिला. त्यावेळी राजकुमार राव इतर काही प्रोजेक्टमध्ये व्यस्त होता, ज्यामुळे तो या चित्रपटाची ऑफर स्वीकारू शकला नाही आणि नंतर हा चित्रपट विकी कौशलकडे गेला.

अभिनयासाठी हातातील नोकरीची ऑफर नाकारली

विकी कौशल जितका हुशार अभिनेता आहे तितकचं त्याचं शिक्षणही उत्तम आहे. त्यांने इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कॉलेजच्या कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून त्याने अनेक प्रतिष्ठित संस्थांकडून नोकरीच्या ऑफर मिळाल्याचे सांगितले जाते. विकीला थिएटर करायचं होतं, त्यामुळे त्याने हातातलं काम नाकारलं आणि मग मसानमधून लीड डेब्यू केला आणि बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाला.

असिस्टंट डिरेक्टर म्हणूनही केले काम

विकी कौशलने सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. 2012 मध्ये त्याने अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूरमध्ये असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केले. लवकरच विकी जरा हटके जरा बचके या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 2 जूनला प्रदर्शित होणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.