विकी-रश्मिका नव्हते ‘छावा’साठी पहिली पसंती, या सुपरस्टाने दिला होता सिनेमाला नकार
'छावा' सिनेमाविषयी नवी अपडेट समोर आली आहे. विकी कौशल आधी एका सुपरस्टार अभिनेत्याला या सिनेमाची ऑफर देण्यात आली होती. पण त्याने नकार दिल्यामुळे विकीला कास्ट करण्यात आले.

सध्या सगळीकडे एकाच सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. तो म्हणजे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमा. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल आणि दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, चित्रपटाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. सुरुवातीला या चित्रपटात विकी कौशल ऐवजी एका सुपरस्टारची निवड करण्यात आली होती. मात्र, या अभिनेत्याने नकार दिल्यामुळे विकी कौशलला कास्ट करण्यात आले.
विकी ऐवजी कोणत्या अभिनेत्याची निवड?
हॉलिवूड सुपरस्टारने दिलेल्या वृत्तानुसार, ‘छावा’ सिनेमासाठी सुरुवातीला टॉलिवूड सुपरस्टार अभिनेता महेश बाबूला ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्याला या सिनेमामध्ये फारसा रस नव्हता. महेश बाबूने सिनेमाला नकार दिल्यानंतर लक्ष्मण उतेकर यांनी विकी कौशलला या चित्रपटाची ऑफर दिली.




रश्मिका ऐवजी या अभिनेत्रीची निवड ‘छावा’ सिनेमातील येसुबाई या भूमिकेसाठी अभिनेत्री रश्मिका मंदाना आधी अभिनेत्री कतरिना कैफला विचारण्यात आले होते. काही कारणास्थव कतरिनाने या चित्रपटाला नकार दिला. त्यानंतर रश्मिकाची या सिनेमासाठी निवड करण्यात आली.
छावा सिनेमातील कलाकारांविषयी
‘छावा’ सिनेमाविषयी बोलायचे झढाले तर या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे. या चित्रपटात विकी आणि मंदानासोबतच अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, डायना पेंटी, विनीत कुमार सिंग हे बॉलिवूडमधील कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच या चित्रपटात मराठी कलाकारांची देखील फौज पाहायला मिळत आहे. चित्रपटात संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, आशिष पाथोडे, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी आणि नीलकांती पाटेकर हे कलाकार दिसत आहेत.
छावा सिनेमाने आतापर्यंत ७ सिनेमांना टक्कर दिली आहे. त्यामध्ये कंगना रणौतचा इमर्जंसी, जुनैद खानचा लवयापा, हिमेश रेशमियाचा बॅडएस रविकुमार, अजय देवगणचा आदाज, अक्षय कुमारचा स्कायफोर्स आणि शाहिद कपूरच्या देवा सिनेमाला टक्कर दिली आहे. हे सातही सिनेमे २५० पर्यंत देखील पोहोचू शकले नाहीत. मात्र, छावा सिनेमाने एकूण २४२.२५ कोटी रुपयांची कमाई केला आहे. जगभरात चित्रपटाने ३०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे.