Video: महामानव आणि महानायक एकाच फ्रेममध्ये हे फक्त तुच करु शकतोस, जितेंद्र जोशीचं LIVE सुरु अन नागराजची एन्ट्री झाली

नागराजबद्दल बोलताना जितेंद्र म्हणतो, सगळ्यात गेट्रेस्ट गोष्ट काय नागराजची की, त्याच्या प्रत्येक कवितेत त्याचं जगणं आलंय पण ती कविता एक लाखनं गुणून त्यानं पडद्यावर आणली. आणि त्यानं ती दाखवली कविता. आणि ती कविता आपली होते. त्यानं फँड्री केला होता ना, तेव्हा अनेक लोकांना मागे लागून, बघा बघा फँड्री बघा. तर मला असं सांगितलं की , डुकराच्या मागे जाणाऱ्या माणसाची काय कथा असते व्हय.

Video: महामानव आणि महानायक एकाच फ्रेममध्ये हे फक्त तुच करु शकतोस, जितेंद्र जोशीचं LIVE सुरु अन नागराजची एन्ट्री झाली
नागराज मंजुळेंच्या झूंडसाठी अभिनेता जितेंद्र जोशींनी लाईव्ह केलंImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 1:01 AM

नागराज मंजुळेंचा (Nagraj Manjule) झूंड (Jhund) प्रदर्शित झालाय. त्याची चर्चा सगळीकडे होतेय. फेसबूक, ट्विटरवर अनेक मतमतांतरे मांडली जातायत. मराठी चित्रपटसृष्टीतून सहसा कुणी प्रतिक्रिया देताना दिसत नाही. पण झूंड त्याला अपवाद ठरताना दिसतोय. कारण मराठीसह हिंदीतही छाप पाडलेल्या अभिनेता जितेंद्र जोशीनं (Jitendra Joshi) नागराजच्या झूंडचं तोंडभरून कौतूक केलंय. विशेष म्हणजे जितेंद्र पडलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावर जखमा दिसतायत. आणि तरीही त्यानं इन्स्टाग्रामवर झूंडसाठी लाईव्ह केलं. हे लाईव्ह सुरु असतानाच झूंडचा दिग्दर्शक नागराज मंजुळेचीही  अचानक एन्ट्री झाली आणि मग प्रेक्षकांना वेगळं काही तरी ऐकण्याची संधी मिळाली. त्याच लाईव्हमध्ये नागराजची स्तुती करताना जितेंद्र जोशीने बाबासाहेब आंबेडकर आणि अमिताभ बच्चन एकाच फ्रेममध्ये आणल्याबद्दल कौतूक केलंय.

काय म्हणाला नेमका जितेंद्र जोशी? जितेंद्र जोशीचं झूंडवरचं हे लाईव्ह 22 मिनिटांपेक्षा अधिक वेळचं आहे. त्याचं अर्ध लाईव्ह झाल्यानंतर नागराज हा अचानक जितेंद्रला ज्वाईन झालेला आहे. खरं तर जितेंद्रलाही ते अनपेक्षीत असावं पण त्याचं लाईव्ह बघतोय असं त्याला लक्षात आल्यानंतर त्यानं नागराजला ज्वाईन होण्याची विनंती केली आणि त्यानंतर त्यात नागराजही ज्वाईन झाला. त्यावेळेस जितेंद्र त्याला म्हणाला- अशा प्रकारचा सिनेमा काढून तू माझ्यावर, माझ्या आसपासच्या माणसांवर, माझ्या पोरीवर तू उपकार करतोयस, मला माहितीय तुला कौतूक आवडत नाही पण ते करु दे आम्हाला. तो आमचा अधिकार आहे. तू चित्रपट बनवतो का नाही मग त्याच्याबद्दल बरं वाईट बोलण्याचा अधिकार आमचा आहे. तू मित्रयस, तुला ते घ्यावं नाही वाटत पण ते जाऊ दे. ते इतकं सोप्पं नाहीय. काय काय झालं? तो सेट काढण्यात आला. तुला किती त्रास झाला हे जवळून पाहिलेलंय. आज तीन दिवस झालेत पिच्चर बघून. तसूभर हलला नाही रे माझ्या मनातून. हलतच नाहीय, एक एक गोष्ट. त्या वस्तीमध्ये स्वत:चा कचरा टाकणाऱ्या माणसांपासून ते त्या मुलांना विचारणं की आज तक की तू कैसा है, कुणी तरी आपल्याला विचारतं कसायस ब्वा. हे किती महत्वाचंय आणि ते तू विचारतोयस आता. ह्या चित्रपटाच्या रुपानं. अमिताभ बच्चनला घेऊन अमिताभ बच्चनला बच्चनगिरी करुच दिलेली नाहीय. (त्यांनी सुटेबल काम केलंय-नागराजचं लगेचच उत्तर) म्हणजे एखाद्या शार्प शुटरला घ्यायचं अन् म्हणायचं तुझा नेम सोडून सगळं दाखव. त्या बच्चनसाहेबाला सर्वसामान्य माणूस म्हणून बघायची आपल्याला सवय नाहीय. आपण बघू शकत नाही. महानायक आणि महामानव तू एका फ्रेमध्ये आणलेस. हे तुच करु शकतोस नागराज. मला बस एवढंच बस्स एवढच म्हणायचंय.

सगळ्यात गेट्रेस्ट गोष्ट काय नागराजची?

नागराजबद्दल बोलताना जितेंद्र म्हणतो, सगळ्यात गेट्रेस्ट गोष्ट काय नागराजची की, त्याच्या प्रत्येक कवितेत त्याचं जगणं आलंय पण ती कविता एक लाखनं गुणून त्यानं पडद्यावर आणली. आणि त्यानं ती दाखवली कविता. आणि ती कविता आपली होते. त्यानं फँड्री केला होता ना, तेव्हा अनेक लोकांना मागे लागून, बघा बघा फँड्री बघा. तर मला असं सांगितलं की , डुकराच्या मागे जाणाऱ्या माणसाची काय कथा असते व्हय. पण त्याचं जगणं आहे ना मग. म्हणजे तो जगलाय, तो जगत असताना तुम्ही ते जगणं त्याला दिलंत समाजाने. त्याच्या जगण्याविषयी तो आता भाष्य करतोय तर तेही तुम्हाला नाही चालत होय. बरं आणखी एक गोष्ट करायला लागला ना तो. त्याचा बिजनसही करायला लागला. बरं त्याचे पैसे असतात ना. सेट लावायला. अमिताभ बच्चन काय फुकट काम करत असन का? त्या सैराटनं एवढे पैसे मिळवून दिले इंडस्ट्रीला. मग सैराटनंतर काय नागराजय, अरारारा. नाही तो हे सगळे ठोकताळे बाजुला ठेवतो आणि सिनेमा बनवतो. झूंड पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल.

हे सुद्धा वाचा:

Jhund : नागराज मंजुळेंचा ‘झूंड’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप? पहिल्या दिवशीची कमाई उघड, कौतूक होतंय तर मग प्रेक्षक का नाहीत?

Jhund Video: नागराजचा ‘झूंड’ नेमका कसाय? अभिनेता जितेंद्र जोशी म्हणतो, बच्चनगिरी..!

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.