मुंबई : 28 जानेवारी 2024 | प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते एका व्यक्तीला चपलाने मारताना दिसत आहेत. ती व्यक्ती राहत फतेह अली खान यांचा नोकर असल्याचं कळतंय. त्याला चपलाने मारत बाटली कुठे आहे, असा प्रश्न ते विचारतायत. या व्हिडीओमध्ये आधी ते नोकराला मारताना आणि त्यानंतर त्याला खेचून घेऊन जाताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. राहत फतेह अली खान यांना त्यांच्या वागणुकीवरून प्रचंड ट्रोल केलं जातंय.
राहत फतेह अली खान यांच्याकडून मारहाण होत असताना ती व्यक्ती विनंती करताना दिसतेय. मला मारू नका, असं ती व्यक्ती म्हणतेय. मात्र तरीही ते थांबत नाहीत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पाकिस्तानी आणि जगभरातील त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘हे अत्यंत लज्जास्पद आहे’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘हे चांगले गायक असतील, पण चांगला माणूस तर नक्की नाही’, असं दुसऱ्याने म्हटलं आहे. हे प्रकरण वाढल्यानंतर त्यावर राहत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Trigger warning ⚠️
Video of Rahat fateh ali khan comes out where he is beating his househelp for a mere bottle while they are seen begging for help!
Clearly, he is drunk! He has completely lost it. 🤬🤬 pic.twitter.com/SIH8nmkakM
— Dia AZ (@drdia_a) January 27, 2024
आपली बाजू मांडण्यासाठी राहत यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये ते म्हणतायत, “ही उस्ताद आणि शागिर्द (गुरू-शिष्य) यांच्यातील गोष्ट आहे. जेव्हा तो चांगला काम करतो, तेव्हा आम्ही त्याचं कौतुक करतो आणि जेव्हा तो चूक करतो, तेव्हा आम्ही त्याला शिक्षासुद्धा देतो.” व्हिडीओमध्ये राहत ज्या बाटलीबद्दल बोलत होते, ती दारूची बाटली असल्याचं नेटकरी म्हणत होते. मात्र त्यात दारू नसून पवित्र पाणी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Update : Rahat Fateh Ali Khan ( @RFAKWorld )issued a clarification regarding his viral video, There was holy water in the bottle pic.twitter.com/oIStHwWXFp
— Ghulam Abbas Shah (@ghulamabbasshah) January 27, 2024
राहत फतेह अली खान अशाप्रकारे वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी 2019 मध्ये त्यांच्यावर भारतात परकीय चलनाची तस्करी केल्याचा आरोप होता. त्यामुळे अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने त्यांना नोटीस बजावली होती. राहत फतेह अली खान यांनी भारतात तीन वर्षांपासून परकीय चलनाची तस्करी केल्याचा आरोप होता.
राहत फतेह अली खान यांची गायकी केवळ पाकिस्तानातच नाही, तर संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे. त्यांच्या असंख्य गाण्यांना भारतातही प्रचंड लोकप्रियता मिळाली. राहत यांनी 2003 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘पाप’ या चित्रपटातील गाणं त्यांनी गायलं होतं. ‘लागी तुमसे मन की लगन’ हे त्यांचं गाणं आजही तुफान लोकप्रिय आहे. त्यानंतर त्यांनी बॉलिवूड चित्रपटांमधील अनेक गाणी गायली आहेत.