Video: हजारोंचे एअरपॉड्स फेकले तर कोणी पुरस्कार, दारुच्या बाटल्या; सेलिब्रिटींच्या घराच्या कचऱ्यात काय असतं?
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सेलिब्रिटींच्या घराच्या कचऱ्यात काय असते हे दाखवण्यात आले आहे. पाहा व्हिडीओ...

सेलिब्रिटी हे कायमच त्यांच्या लग्झरी लाइफमुळे चर्चेत असताता. त्यांची घरे, त्यांचे कपडे, खाणे-पिणे सर्व काही जाणून घेण्यासाठी चाहते आतुर असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कंटेन्ट क्रिएटर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घराबाहेर जाऊन कचऱ्याच्या डब्यात नेमकं आहे हे चेक करताना दिसत आहे. आता कोणत्या सेलिब्रिटीच्या घराबाहेर काय सापडलं चला जाणून घेऊया…
कोण तपासत आहे कचऱ्याचा डब्बा?
सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या व्हिडीओमध्ये कंटेन्ट क्रियटर सार्थक सचदेव दिसत आहे. सार्थने मुंबईमधील अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घराबाहेरच्या कचऱ्याच्या डब्यांमध्ये नेमकं काय आहे हे तपासण्याचे चॅलेंज स्वीकारले होते. कचऱ्याचा डब्बा तापासत असतानाचा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
कोणत्या सेलिब्रिटीच्या घराबाहेरच्या कचऱ्याच्या डब्ब्यात काय मिळाले?
सार्थकने व्हिडीओच्या सुरुवातीला बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या घराबाहेरील कचऱ्याचा डब्बा उघडला आहे. या डब्ब्यात तांदळाच्या रिकाम्या पिशव्या सापडल्या. त्यानंतर तो अभिनेता अजय देवगणच्या घराबाहेर गेला. त्याला अजयच्या घराबाहेरील कचऱ्याच्या डब्ब्यात चॉकलेटचे रॅपर,तंबाखूची पाकिटं आणि इतर पदार्थांची पाकिटं सापडली. तसेत अनेक दारूच्या रिकाम्या बाटल्याही दिसल्या. त्यानंतर अभिनेता अक्षय कुमारच्या घराबाहेरील कचऱ्याच्या डब्यात रिकामे शहाळे, फेकून दिलेली चित्रपटाची स्क्रीप्ट आणि पुरस्कार देखील होता.
व्हिडीओमध्ये पुढे सार्थकने सचिन तेंडुलकरच्या घराबाहेरील कचऱ्याचा डब्बा उघडला. या डब्ब्यात पाण्याच्या बाटल्या, रिकामे डब्बे, इअरफोन आणि एअरपॉड्स दिसले. त्यानंतर श्रद्धा कपूरच्या घराबाहेरील कचऱ्यात एअरपॉड्स, अनेक गिफ्टचे बॉक्स दिसले.