‘आरोप सिद्ध होण्याआधीच दोषी ठरवू नका’, अभिनेत्री विद्या बालन रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी आतापर्यंत अनेक सेलिब्रेटींनी समोर येऊन आपली मतं व्यक्त केली आहेत (Vidya Balan on Sushant case Media trial and Rhea Chakraborty).

'आरोप सिद्ध होण्याआधीच दोषी ठरवू नका', अभिनेत्री विद्या बालन रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ
Follow us
| Updated on: Sep 02, 2020 | 11:22 AM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी आतापर्यंत अनेक सेलिब्रेटींनी समोर येऊन आपली मतं व्यक्त केली आहेत (Vidya Balan on Sushant case Media trial and Rhea Chakraborty). यात शेखर सुमन, कंगना रनौत, शत्रुघ्न सिन्हा, वरुण धवन यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. आता विद्या बालनने देखील या प्रकरणी सुरु असलेल्या घटनाक्रमावर आपली भूमिका सर्वांसमोर मांडली आहे. यात त्यांनी आरोप सिद्ध होण्याआधीच कुणालाही दोषी न ठरवण्याचं आणि या प्रकरणाला सर्कस न करता पोलिसांना कायद्यानुसार त्यांचं काम करु देण्याचं आवाहन केलं आहे.

अभिनेत्री लक्ष्मी मंछूने एक ट्वीट करत सुशांत प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विद्या बालनने आपलं मत व्यक्त केलं.

विद्या बालन म्हणाली, “या प्रकरणावर इतकं स्पष्टपणे मत व्यक्त करण्यासाठी गॉड ब्लेस यू लक्ष्मी मंछू. एका युवा अभिनेता असलेल्या सुशांत सिंह राजपूतच्या अवेळी मृत्यू प्रकरणाची माध्यमांकडून अशा पद्धतीने सर्कस होणं फार दुर्दैवी आहे. एक महिला म्हणून रिया चक्रवर्तीचा होणारा द्वेष पाहून फार वाईट वाटतं. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती निर्दोष नाही का? की आता जोपर्यंत निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत दोषी समजायचं? संविधानाने नागरिकांना दिलेल्या मुलभूत अधिकारांचा सन्मान करायला हवा आणि कायद्याला त्याचं काम करु द्यायला हवं.”

हेही वाचा : Sushant Singh Death Case | “रियाला 2017 मध्ये भेटलो” हॉटेलियर गौरव आर्याला ईडीचे समन्स

विद्या बालनशिवाय तापसी पन्नूने देखील लक्ष्मी मंछूच्या ट्वीटला पाठिंबा दिला आहे. तापसीने देखील नागरिकांना लगेच कोणत्याही निष्कर्षापर्यंत न येण्याचं आवाहन केलं आहे. तसेच जोपर्यंत चौकशी होऊन निकाल येत नाही तोपर्यंत या प्रकरणातील प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करा, असंही म्हटलं आहे.

लक्ष्मी मंछूने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं, “मी पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी घेतलेली रिया चक्रवर्तीची संपूर्ण मुलाखत पाहिली. त्यानंतर मी यावर बोलावं की नाही असा विचार मनात आला. माध्यमांनी एका मुलीला राक्षस बनवून टाकलं आहे आणि त्यावर अनेक लोक शांत बसले आहेत. मला या प्रकरणातील खरं काय आहे हे माहिती नाही. मात्र, मला विश्वास आहे की प्रामाणिक मार्गाने या प्रकरणातील खरं सर्वांसमोर येईल.”

हेही वाचा : Sushant Case | सुशांत प्रकरणातील आरोपी संदीप सिंहने कोणत्या भाजप नेत्याला 53 कॉल केले? : सचिन सावंत

“सुशांतला न्याय देण्याबाबत माझा न्यायव्यवस्थेवर आणि या प्रकरणाचा तपास करणाऱ्या प्रत्येक तपास यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, तोपर्यंत आपण राक्षस होऊन क्रुर वागण्यापासून स्वतःला दूर ठेऊ का? एका व्यक्तिला आणि तिच्या कुटुंबाला शिव्याशाप देणं थांबवू शकतो का? या प्रकरणी रिया आणि तिच्या कुटुंबाची सुरु असलेल्या मीडिया ट्रायलमुळे तिला किती त्रास होत असेल याचा मी केवळ अंदाज लावू शकते. जर माझ्यासोबत असं काही घडलं असतं तर माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यासोबत उभं राहावं असं मला नक्कीच वाटलं असतं. तसेच पूर्ण खरं समोर येऊपर्यंत मला एकटं सोडा असं सांगावं असंही वाटलं असतं. जे काही होत आहे त्याचा खूप त्रास होत आहे. आपण आपल्या मनातील विचार बोलू शकत नसू तर आपण खरंच विश्वासास पात्र आहोत का? मी माझ्या सहकाऱ्यासोबत उभी आहे,” असंही लक्ष्मी मंछूने आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं.

संबंधित बातम्या :

SSR Case | आर्थिक व्यवहार, वॉटर स्टोन रिसॉर्ट आणि, ड्रग्स! सीबीआय चौकशीत काय काय झालं?

प्रियंका-मितूच्या सांगण्यावरुन सुशांतचा मृतदेह खाली उतरवला, सिद्धार्थ पिठानीचा सीबीआय चौकशीत दावा

मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती, केंद्र सरकारने सुरक्षा द्यावी : कंगना रनौत

Vidya Balan on Sushant case Media trial and Rhea Chakraborty

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.