माझ्यासोबतही दिग्दर्शकाकडून कास्टिंग काऊचचा प्रयत्न, विद्या बालनचा धक्कादायक खुलासा

प्रचंड पैसा आणि प्रसिद्धी देणाऱ्या बॉलिवुडमधील अभिनेत्रींचं आयुष्य खूप सहज सोपं वाटतं. मात्र, बॉलिवूडच्या आत त्यांचाही एक संघर्ष सुरू असतो. त्याचाच भाग म्हणून मध्यंतरी 'मी टू' (MeToo) आंदोलनात अनेक खुलासे झाले. आता बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिनेही आपल्यासोबत घडलेला काहीसा असाच एक प्रसंग सांगितला आहे.

माझ्यासोबतही दिग्दर्शकाकडून कास्टिंग काऊचचा प्रयत्न, विद्या बालनचा धक्कादायक खुलासा
Follow us
| Updated on: Aug 26, 2019 | 8:53 PM

मुंबई : प्रचंड पैसा आणि प्रसिद्धी देणाऱ्या बॉलिवुडमधील अभिनेत्रींचं आयुष्य खूप सहज सोपं वाटतं. मात्र, बॉलिवूडच्या आत त्यांचाही एक संघर्ष सुरू असतो. त्याचाच भाग म्हणून मध्यंतरी ‘मी टू’ (MeToo) आंदोलनात अनेक खुलासे झाले. आता बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हिनेही आपल्यासोबत घडलेला काहीसा असाच एक प्रसंग सांगितला आहे.

करिअरच्या सुरुवातीच्या काळात मलाही कास्टिंग काऊचचा (Casting Couch) सामना करावा लागल्याचा मोठा खुलासा विद्या बालनने केला आहे. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत विद्या बालनने याची माहिती दिली. त्या काळात आपल्या हातातून 12 प्रोजेक्ट्स निघून गेल्याचेही विद्याने नमूद केले. यावेळी विद्याने आजच्या उंचीवर पोहचण्यासाठी काय संघर्ष केला याचीही माहिती दिली.

विद्या म्हणाली, “मला आजही तो दिवस आठवतो. मी कामानिमित्त चेन्नईत एका दिग्दर्शकाला भेटले होते. त्यावेळी मी त्याला कॉफी शॉपमध्ये जाऊन बोलुयात असे सांगितले. मात्र, तो वारंवार मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणत खोलीत येण्यास सांगत होता. त्याच्या या बोलण्यातून मला त्याचा हेतू कळाला. त्यामुळे मी खोलीत गेले, मात्र मी दरवाजा उघडाच ठेवला. त्यानंतर तो दिग्दर्शक 5 मिनिटातच बाहेर निघून गेला.”

विद्या बालनने बॉलीवुडमध्ये आपली वेगळी कसदार भूमिका करणारी अभिनेत्री म्हणून ओळख तयार केली आहे. विद्याच्या हटके भूमिकांची नेहमीच प्रशंसा होत आली आहे. विद्या आपल्या खऱ्या आयुष्यात एक कणखर व्यक्ती असल्याचेही तिचे जवळचे सांगतात. विद्या इतरांनाही नेहमीच कणखर राहण्याचा सल्ला देते.

विद्या बालन नुकतीच ‘मिशन मंगल’मध्ये देखील पाहायला मिळाली. यातही तिच्या भूमिकेचं बरंच कौतुक झालं. या चित्रपटाने आठवडाभरात 100 कोटींची कमाई केली. या चित्रपटात तिच्यासोबत संजय कपूर, अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, कीर्ति कुल्हारी आणि नित्या मेनन हेही प्रमुख भूमिकेत होते.

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.