आमी जे तोमार.. ‘भूल भुलैया 3’ मधून मंजुलिकाचं पुनरागमन; दुसऱ्या भागात पत्ता का झाला होता कट ?
'भूल भुलैया 2'मध्ये विद्या बालन दिसली नव्हती. मात्र आता तिसऱ्या भागात ती पुन्हा दिसणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका करणाऱ्या कार्तिक आर्यननेच ही माहिती शेअर केली. कार्तिक आर्यनने याबाबत माहिती दिली आहे. पण दुसऱ्या भागात विद्या बालन का दिसली नाही हे तुम्हाला माहीत आहे का? चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी एकदा याबद्दल सांगितले होते.
मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या’भूल भुलैया ‘ फ्रँचायझीच्या दुसऱ्या भागातील कामाचं प्रचंड कौतुक झालं होतं. त्याचं काम आणि चित्रपट, दोन्ही सर्वांनाच आवडलं. आता हा अभिनेता तिसऱ्या भागामुळेही चर्चेत आहे. 2024 च्या दिवाळीमध्ये कार्तिक आर्यन पुन्हा एकदा ‘रूह बाबा’ च्या भूमिकेत दिसणार आहे. चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे या चित्रपटातून ओरिजनल मंजुलिकाचे पुनरागमन होणार आहे. अर्थात विद्या बालन चित्रपटात पुन्हा दिसणार आहे.
हो, हे खरं आहे. खुद्द कार्तिक आर्यननेच ही घोषणा केली आहे. या चित्रपटाचा तिसरा भाग येणार असल्याची बातमी समोर येताच, लीड अभिनेत्री कोण असेल याबद्दल चर्चा सुरू झाली होती. कियारा अडवाणी, सारा अली खान असा अनेक आघाडीच्या अभिनेत्रींची नावंही चर्चेत होती. पण काल, 12 फेब्रुवारीला कार्तिक आर्यनने एक व्हिडीओ शेअर करत विद्या बालन परत येत असल्याची माहिती दिली. या बातमीमुळे चाहते खूपच खुशू झाले आहेत.
2007 मध्ये जेव्हा ‘भूल भुलैया’ चित्रपट रिलीज झाला तेव्हा लोकांना तो प्रचंड आवडला होता. त्यातील विद्या बालनचे काम, तिची मंजुलिका सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडली. मात्र 2022 मध्ये जेव्हा चित्रपटाचा पुढला भाग आला तेव्हा मात्र विद्या बालन पिक्चरमधून गायब होती. त्या चित्रपटात ती काही दिसली नाही. यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. मात्र आता तिसऱ्या भागातून तिचे भूल भुलैया’ मध्ये पुनरागमन होत असल्याचे प्रेक्षक खुश आहेत.
पण विद्या बालन ‘भूल भुलैया २’ मध्ये का दिसली नव्हती हे तुम्हाला माहीत आहे का ? शेवटी याचा खुला चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी केला.
‘भूल भुलैया २’ मध्ये का नव्हती विद्या ?
या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात, ओरिजनल चित्रपटातलं कोणीच नव्हतं विद्या बालनच नव्हे तर अक्षय कुमारही चित्रपटात दिसला नाही. त्याच्या जागी कार्तिक आर्यन दिसला. जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला तेव्हा त्या मुद्यावर दिग्दर्शक अनीस बज्मी बोलले होते. अक्षय आणि विद्या, स्क्रिप्टचा नुसार, फिट बसत नव्हते. त्यामुळेच दोघेही या चित्रपटात नव्हते. त्यांना थोड्या वेळासाठी तरी चित्रपटात आणता आलं असंत तर मस्त जालं असतं पण स्क्रिप्टमध्ये तशी कुठे जागाच नव्हती, असे बज्मी यांनी स्पष्ट केलं.
किती होती भूल भुलैया 2 ची कमाई ?
ते काही असो, मात्र ‘भूल भुलैया 2’मध्ये कार्तिकचं काम लोकांना खूप आवडलं. चित्रपटानेसुद्धा चांगली कमाई केली. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचं बजेट सुमारे 90 कोटी रुपये होते आणि जगभरातून 266 कोटी रुपये कमावले होते. हा पिक्चर बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. आता सर्व जण या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आणि अर्थात विद्या बालनचीही आतुरतेने वाट पहात आहेत. या दिवाळीत हा पिक्चर रिलीज होईल.