Ankita Lokhande -Vicky Jain | माझ्या घरच्यांना माहीत नव्हतं की… मतभेदांबद्दल काय म्हणाला विकी जैन ?
'बिग बॉस 17' शोमध्ये टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हे कपल खूप चर्चेत होतं. बरेच वादविवाद, भांडणं यामुळे विकी आणि अंकिता सतत फोकसमध्येच होते, काही वेळा तर त्यांचं भांडण एवढं टोकाला गेलं की आता यांचं नातं तुटतं की काय अशी भीतीही चाहत्यांना वाटली. अंकिताची सासू अर्थात विकी जैनची आई शोमध्ये आल्यावर अंकिता आणि त्यांच्यात बराच तणावही पहायला मिळाला.
मुंबई | 2 फेब्रुवारी 2024 : ‘बिग बॉस 17’ चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. मुनव्वरने या शोचं विजेतेपद मिळवलं. मुनव्वरशिवाय या शोमध्ये आणखी बरेच गाजलेले सेलिब्रिटी होते, त्यापैकी टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हे कपलही खूप चर्चेत होतं. या शोमध्ये त्यांची खूप चर्चा झाली. बरेच वादविवाद, भांडणं यामुळे विकी आणि अंकिता सतत फोकसमध्येच होते, काही वेळा तर त्यांचं भांडण एवढं टोकाला गेलं की आता यांचं नातं तुटतं की काय अशी भीतीही चाहत्यांना वाटली. अंकिताची सासू अर्थात विकी जैनची आई शोमध्ये आल्यावर अंकिता आणि त्यांच्यात बराच तणावही पहायला मिळाला.
अंकिता आणि सासूचा वाद
‘जेव्हा तू विकीला लाथ मारलीस, तेव्हाच विकीच्या वडिलांनी तुझ्या आईला फोन करून विचारलं होतं की तुम्हीही तुमच्या पतीला अशीच लाथ मारली होती का ?’ असं वक्तव्य विकीच्या आईने सर्वांसमोरच , या शोमध्ये केलं होतं. मात्र ते ऐकून अंकिता बरीच अपसेट झाली, तिला रागही आला. तेव्हा तिने थेट सासूला उत्तर दिलं होतं. ‘ तुम्ही मला आणि विकीला जे पाहिजे ते बोलू शकता, पण माझ्या पालकांना मधे आणू नका’ अशा शब्दांत तिने सासूला खडसावलं.
एवढंच नव्हे तर शोच्या ग्रँड फिनालेमध्ये देखील दोघींमध्ये वाद झाला. विकी जैनच्या आईला यावरून बरंच ट्रोलही करण्यात आलं. त्यांच्या वक्तव्यामुळे बरीच कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण झाली. आता बिग बॉस 17 हा शो संपला आहे. पण तरीही विकी आणि अंकिता अजूनही चर्चेत आहेत. याचदरम्यान विकी एका मुलाखतीदरम्यान अंकिता आणि त्याच्या आईच्या नात्याबद्दल मोकळपणाने बोलला आहे.
काय म्हणाला विकी ?
विकीने नुकतीच एक मुलाखत दिली, त्यामध्ये तो अनेक विषयांवर बोलला. ‘ अंकिता आणि मी, त्या वयात लग्न करण्याचा निर्णय घेतला, जेव्हा आम्ही दोघेही खूप मॅच्युअर होतो. माझं कुटुंब हे या (मनोरंजन) क्षेत्रातलं नाहीये. त्यामुळे साहजिकच त्यांनी हा शो पाहून काही प्रश्न विचारले. माझं आणि अंकिताचं नातं कसं आहे, हे त्यांना ( कुटुंबिांना) माहीत नाहीये, कारण ते आमच्यासोबत (जास्त) राहिले नाहीयेत. पण अंकिताचा आईने सगळं काही पाहिलं आहे. जे काही झालं (वाद-विवाद) मी त्याला पाठिंबा देत नाही, ना त्याचा सपोर्ट करतो. पण एका आईच्या भावना बाहेर येऊ शकतात. कधी त्या योग्य असतात तर कधी चुकीच्याही असू शकतात, ‘ अशा शब्दांत विकीने त्याची आई आणि अंकितामध्ये झालेले वाद यांच्याबद्दल स्पष्टीकरण दिलं.
अंकिता-विकीचं नातं
अंकिता लोखंडे तिच्या पतीसोबत बिग बॉस 17मध्ये आली. त्यांच्या नात्याची बिग बॉसमध्ये आणि बाहेरही खूप चर्चा झाली. या शो दरम्यान या जोडप्यात , त्यांच्या नात्यात अनेक चढ-उतार पहायला मिळाले. त्यामुळे ते बरेच ट्रोलही झाले. एवढंच नव्हे तर वाद टोकाला गेल्यावर अंकिताने विकीला घटस्फोटाची धमकीदेखील दिली होती. पण आता शो संपला असून, दोघेही बाहेर आले आहेत.