Vikram Vedha: जबरदस्त रेकॉर्ड करत प्रदर्शित होणार ऋतिक-सैफ अली खानाचा ‘विक्रम वेधा’
'विक्रम वेध' हा एक अॅक्शन-थ्रिलर आहे. विक्रम वेधाची कथा ट्विस्ट आणि टर्नने भरलेली आहे, कारण एक कठोर पोलीस विक्रम (सैफ अली खान) धोकादायक गुंड वेधा (हृतिक रोशन) चा माग काढण्यासाठी आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी निघतो.
बॉलीवूडमधील प्रसिद्ध हृतिक रोशन, सैफ अली खान व अभिनेत्री राधिका आपटे (Radhika apte)यांचा ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha)बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या 30 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘विक्रम वेध’ जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये रिलीज होणार आहे. यासह, हा बॉलिवूड (Bollywood)चित्रपटासाठी सर्वात मोठा ओपनिंग ठरणार असल्याचे बोलले जात आहे. फ्रायडे फिल्मवर्क्स आणि YNOT स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने गुलशन कुमार, टी-सीरीज फिल्म्स आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांनी बहुप्रतिक्षित ‘विक्रम वेध’ सादर केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले आहे आणि एस शशिकांत आणि भूषण कुमार यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात रोहित सराफ, योगिता बिहानी, शारीब हाश्मी आणि सत्यदीप मिश्रा यांच्याही भूमिका आहेत.
या देशांमध्ये चित्रपटांचा बोलबाला असेल
मीडिया रिपोर्टनुसार ‘विक्रम वेधा’ जगभरातील काही कन्वेशन्ल और नॉन-कन्वेशन्ल मार्केट्समध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी माइलस्टोन गाठण्यासाठी सज्ज आहे. यामध्ये उत्तर अमेरिका, यूके, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या प्रमुख देशांच्या सोबतच हा चित्रपट युरोपमधील 22 देशांमध्ये, आफ्रिकेतील 27 देश आणि जपान, रशिया, इस्रायल यांसारख्या अपारंपरिक देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आणि पनामा पेरू सारखे लॅटिन अमेरिकन देश यासाठी तयार आहेत. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या सुरक्षेसाठी बरीच विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
विक्रम वेधा हा एक अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे
‘विक्रम वेध’ हा एक अॅक्शन-थ्रिलर आहे. विक्रम वेधाची कथा ट्विस्ट आणि टर्नने भरलेली आहे, कारण एक कठोर पोलीस विक्रम (सैफ अली खान) धोकादायक गुंड वेधा (हृतिक रोशन) चा माग काढण्यासाठी आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी निघतो. कोणत्या प्रकारचे अडथळे येतात आणखी बरंच काही चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे.