आलिशान बंगला, महागड्या गाड्या अन् बरच काही! विक्रांत मेस्सीचे लॅवीश आयुष्य; अभिनेत्याची नेमकी संपत्ती किती?

बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीने अभिनयाला रामराम ठोकला आहे. विक्रांच्या नावावर अनेक हीट चित्रपट आहेत. त्याचसोबत त्याच्या संपत्तीची आणि त्याच्या लॅवीश लाइफस्टाईलची देखील तेवढीच चर्चा होताना दिसते. तर पाहुयात की विक्रांतची नेमकी किती संपत्ती आहे ते.

आलिशान बंगला, महागड्या गाड्या अन् बरच काही! विक्रांत मेस्सीचे लॅवीश आयुष्य; अभिनेत्याची नेमकी संपत्ती किती?
Follow us
| Updated on: Dec 02, 2024 | 7:05 PM

बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीने अभिनयातून निवृत्ती जाहीर केली आणि सर्वांना धक्कच बसला. 2025 मध्ये प्रदर्शित होणारे त्याचे दोन चित्रपट हे त्याचे शेवटचे चित्रपट असतील असेही विक्रांतने शेअर केले. पण विक्रांत मेस्सीच्या लाइफस्टाइलबद्दल फार कमी माहित आहे. जाणून घेऊया विक्रांतकडे नेमकी किती संपत्ती आहे.

विक्रांतने आपल्या अभिनय कारकिर्दीला टेलिव्हिजनपासून सुरुवात केली आणि नंतर त्याने बॉलिवूड आणि ओटीटीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सध्या, विक्रांतचा ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाची फार चर्चा आहे. विक्रांतच्या कामाचे त्याच्या चित्रपट सिलेक्शनचे नेहमीच कौतुक केले जाते. फार खरतड दिवसांमधून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली आहे.

विक्रांतची लॅवीश लाइफस्टाइल 

विक्रांतने आतापर्यंतच्या कारकिर्दीत प्रसिद्धीसोबतच भरपूर संपत्तीही कमावली आहे. अभिनेत्याकडे अनेक महागड्या वस्तू आहेत. ई टाइम्सच्या वृत्तानुसार, विक्रांतची एकूण संपत्ती 20 कोटी ते 26 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. विक्रांत प्रत्येक प्रोजेक्टसाठी 1 कोटी ते 2 कोटी रुपये घेतो. विक्रांतची बहुतेक कमाई चित्रपट आणि वेब शो तसेच ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडिया हँडलमधून येते.

2020 मध्ये, विक्रांतने मुंबईत एक आलिशान सी-फेसिंग घरही विकत घेतलं. येथे तो पत्नी शीतल ठाकूर आणि मुलगा वरदानसोबत राहतो. यापूर्वी त्याने एका मुलाखतीत सांगितले होते, “माझ्या समोर समुद्र आहे. हे 180-डिग्री समुद्राचे दृश्य आहे जिथे मी दररोज निसर्गाचे सुंदर दृश्य पाहतो.”

कार कलेक्शनचे आकर्षण 

विक्रांत कार कलेक्शनचा शौकीन आहे. त्याच्याकडे 1.16 कोटी रुपयांची मर्सिडीज बेंझ जीएलएस, 60 लाख रुपयांची व्होल्वो एस90 आणि मारुती स्विफ्ट डिझायर या अनेक लक्झरी कार आहेत. एवढेच नाही तर त्याच्याकडे 12 लाख रुपयांची डुकाटी मॉन्स्टर मोटरसायकलही आहे. विक्रांतच्या बाईक कलेक्शनमध्ये 12.35 लाख रुपयांची ट्रायम्फ बोनविले बॉबर बाइक देखील आहे. यावरून लक्षात येतच असेल की विक्रांत किती लॅविश आयुष्य जगतो ते.

दरम्यान विक्रांतच्या या निर्णयाचा त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. अष्टपैलू आणि आकर्षक अभिनयासाठी विक्रांत ओळखला जात होता. त्याच्या या निर्णयानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.