किसींग सीन शूट करताना कट म्हणून देखील अभिनेत्याचा संयम सुटला; अभिनेत्रीचा ओठ चावला अन्….
बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये किसिंग सीन सामान्य झाले आहेत. पण अनेकदा शूटिंग दरम्यान अभिनेत्यांचा संयम सुटल्याचे किस्से ऐकायला मिळतात. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका अभिनेत्याचा संयम सुटला आणि त्याने थेट अभिनेत्रीचे ओठ चावले. हा किस्सा आजही तेवढाच चर्चेत आहे.

आजकाल बॉलिवूड असो किंवा मराठी चित्रपट किसींग सीन अतिशय सामान्य आहेत. पण काहीवेळेला किसींग सीन शूट करताना अनेकदा अभिनेत्यांचा संयम सुटलेला आहे. अनेक चित्रपटांच्या सेटवर असे प्रसंग घडलेले आहेत. आणि हे चित्रपट फक्त आताचे नाहीत तर 90च्या चित्रपटांमध्येही अनेक अभिनेत्यांकडून असे प्रसंग घडले आहेत.
किसींग किंवा इंटिमेट सीन शुट करताना अभिनेत्याचा संयम सुटला
90 मधला असा एक चित्रपट आहे जो त्याच्या बोल्ड सीनमुळे आणि त्यातील किसींग सीनमुळेही चर्चेत आला होता. तसेच प्रेक्षकांनीही या अशा सीन्ससाठी ट्रोल केलं होतं. तसेच या चित्रपटातील किसींग किंवा इंटिमेट सीन शुट करताना अभिनेत्याचा संयम सुटला होता. तसेच शूट करताना चक्क अभिनेत्याने अभिनेत्रीचे चक्क ओठ चावले होते.नेमका हा किस्सा काय आहे.
View this post on Instagram
‘दयावान’ चित्रपटाच्या शुटींग दरम्यान घडला होता किस्सा
सध्या चित्रपटांमध्ये सर्रासपणे किसींग आणि इंटिमेट सीन दाखवले जातात. मात्र, हे सीन शूट करताना अनेक अभिनेते संयम हरवून बसतात. असाच किस्सा 37 वर्षांपूर्वी आलेल्या ‘दयावान’ चित्रपटाच्या शुटींग दरम्यान घडला होता. अभिनेते विनोद खन्ना आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटासाठी दिग्दर्शक आणि ज्येष्ठ अभिनेते फिरोज खान यांनी माधुरी दीक्षितला 1 कोटी मानधन दिले होते.
विनोद खन्ना यांचा संयम सुटला अन् त्यांची माधुरीचा ओठ चावला
या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांच्यात काही किसींग आणि इंटिमेट सीन होते. पण माधुरीने सुरुवातीला या सीन्ससाठी नकार दिला होता. शेवटी माधुरी किसींग सीन देण्यास तयार झाली. एका रिपोर्टनुसार माधुरी आणि विनोद खन्ना हे किसींग सीन शूट करत असताना विनोद खन्ना यांचा संयम सुटला आणि कट म्हणून देखील विनोद खन्ना माधुरीला किस करत राहिले, त्यामुळे हा किसींग सीन खूपच मोठा झाला. तसेच रिपोर्ट्सनुसार, लिप-लॉक करताना अभनेत्याने माधुरी दीक्षितचे ओठ चावले होते असंही सांगितलं जातं.
चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट झाला
‘दयावान’ चित्रपटातील ‘आज फिर तुम्पे प्यार आया है’ हे गाणे खूप गाजलं होतं. या गाण्यात विनोद आणि माधुरी दीक्षित यांनी खूप बोल्ड सीन्स दिले आहेत. इंटिमेट सीन्समुळे या चित्रपटाची आणि स्टारकास्टची चांगलीच चर्चा रंगली होती. पण यासीन्समुळे त्यांच्यावर टीका देखील झाली. पण तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट झाला होता.