अनुष्काने प्रेमानंद महाराजांना असं काय मागितलं, की प्रेमानंद महाराजांना अश्रू अनावर

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली ही जोडी प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये अनुष्का आणि विराट महाराजांच्या समोर हात जोडून बसलेले दिसतायत तर महाराजांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहे.

अनुष्काने प्रेमानंद महाराजांना असं काय मागितलं, की प्रेमानंद  महाराजांना अश्रू अनावर
Follow us
| Updated on: Jan 13, 2025 | 4:18 PM

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली ही जोडी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पण आजकाल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात ते देत असलेली भेट अनेकदा चर्चेचा विषय बनते.

अनुष्का शर्मा आणि विराट प्रेमानंद महाराजांच्या भेटीला

नुकतचं या जोडीने प्रेमानंद महाराजांची भेट घेतली. यावेळी या अनुष्का शर्मा आणि विराट यांच्यासोबत त्यांची मूलं देखील होती. यावेळी अनुष्काने प्रेमानंद महाराजांना असं काही मागितलं की त्यांना अश्रू अनावर झाले.

अनुष्का आणि विराटने त्यांचा मुलगा अकाय आणि मुलगी वामिकासह प्रेमानंद महाराजांची भेट घेतली. या आध्यात्मिक भेटीचा व्हिडिओही समोर आला आहे. प्रेमानंद महाराजांना अनुष्का अनेक प्रश्न विचारताना दिसत आहे. त्याच भेटीचा आणखी एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये प्रेमानंद महाराजांच्या डोळ्यांत अश्रू दिसत आहेत.

प्रेमानंद महाराजांच्या डोळ्यात अश्रू

प्रेमानंद महाराज त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसताना दिसत आहेत. महाराजांचा हा भावूक झालेला व्हिडीओ पाहाता अनेकांनी सोशल मीडियावर कमेंट करण्यास सुरुवात केली. अनेकांनी असं विचारलं की नक्की अनुष्काने असा काय प्रश्न विचारला की महाराजांना अश्रू अनावर झाले.

पण असं काही नसून वामिका आणि अके यांना पाहताच महाराजांचे त्यांचे डोळे भरून आल्याचं म्हटलं जातं. मुलांना पाहून प्रेमानंद महाराज इतके भावूक झाले की, त्यांच्या निरागस चेहऱ्याकडे बघून ते रडू लागले असं म्हटलं जातं. महाराजांनी वामिका आणि आके यांना आशीर्वाद देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराज प्रेमानंद यांच्याकडून दोन्ही मुलांची विशेष पूजा

महाराज प्रेमानंद यांनीही दोन्ही मुलांची विशेष पूजा करून ही मुले खूप भाग्यवान असून त्यांचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगितले. विराट आणि अनुष्काने हा संपूर्ण अनुभव अतिशय भावनिक आणि संस्मरणीय असल्याचे सांगितले. मात्र काहीजण हा व्हिडिओ एडिट केलाय असंही म्हटलं जात आहे.

या भेटीत विराट आणि अनुष्काने महाराजांशी संवाद साधला आणि कुटुंबाच्या सुख-शांतीसाठी त्यांचे आशीर्वाद घेतले. अनुष्का आणि विराट दोघेही धार्मिक आहेत आणि अनेकदा अध्यात्मिक स्थळांना भेट देतात.

आपल्या मुलांना भारतीय संस्कृती, अध्यात्माशी जोडण्यासाठी विराट -अनुष्काचे पाऊल

आपल्या मुलांना भारतीय संस्कृती आणि अध्यात्माशी जोडण्यासाठी विराट आणि अनुष्काचे हे पाऊल चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जिथे चाहते या कुटुंबाचे त्यांच्या साधेपणाचे आणि विश्वासाचे कौतुक करत आहेत.

दरम्यान महाराजांचा व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे की त्याबद्दलची चर्चा होतना दिसत आहे. पण नक्की हा व्हिडीओ खरा आहे की एडीट केलेला हा मात्र मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...
'सुरेश धस माझ्या मुलाला..', कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
'सुरेश धस माझ्या मुलाला..', कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या.
'आपला पक्ष काँग्रेस झालाय', बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर
'आपला पक्ष काँग्रेस झालाय', बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर.
'...आणि सरपंचाला संपवलं', वारंवार फोन करून देशमुखांना बोलवणारा कोण?
'...आणि सरपंचाला संपवलं', वारंवार फोन करून देशमुखांना बोलवणारा कोण?.
साताऱ्यातून जाऊन दाखव... लक्ष्मण हाकेंना कोणी दिली धमकी?
साताऱ्यातून जाऊन दाखव... लक्ष्मण हाकेंना कोणी दिली धमकी?.