Virat Kohli : अकायच्या जन्मानंतर विराट कोहलीची लाडक्या लेकीसह लंच डेट, तो फोटो व्हायरल
अभिनेत्री अनुष्का शर्माने 15 फेब्रुवारीला मुलाला जन्म दिला. विराट-अनुष्काने आठवड्याभरानंतर सोशल मीडियावरून ही गुड न्यूज शेअर करत मुलाचं नाव अकाय ठेवल्याची माहिती चाहत्यांना दिली. त्यानंतर आता विराट आणि त्याची लेक वामिका यांचा एक फोटो व्हायरल होत आहे.
मुंबई | 27 फेब्रुवारी 2024 : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली यांनी गेल्या आठवड्यात सोशल मीडियावरून एक गुड न्यूज शेअर केली. 15 फेब्रुवारीला त्यांना मुलगा झाला आणि त्याचं नाव ‘अकाय’ असं ठेवल्याचं दोघांनीही जाहीर केलं. विराट-अनुष्का दुसऱ्यांदा आई-वडील झाले. लंडनमध्ये त्यांच्या मुलाचा जन्म झाला. त्यानंतर साधारण आठवड्याभराने त्यांनी ही गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केली. त्यांच्या या पोस्टनंतर दोघांवर आणि नवजात बाळावर शुभेच्छा, आशिर्वादाचा वर्षाव झाला.
आता याचदरम्यान विराट कोहली याचा एक फोटो व्हायरल होत असून, त्यामध्ये त्याची लाडकी लेक वामिकाही आहे. एका कॅफेमधील त्या दोघांचा हा फोटो असून वामिका तिच्या वडिलांसोबत लंच करताना दिसत आहे.
हा फोटो रेडइटवर शेअर करण्यात आला असून, त्या कॅफेमध्ये विराट आणि वामिका निवांत बसले आहेत. मात्र वामिका पाठमोरी असून तिचा चेहरा कोणालाही दिसत नाहीये. या फोटोवरही लोकांनी, युजर्सनी प्रेमाचा वर्षाव केला. ‘ मला माहीत्ये आपण तिला (वामिका) फक्त पाठमोरं पाहू शकतोय पण ती खूप गोड दिसत्ये. तिचे केस किती सुंदर आहेत. विराट खरंच एक चांगला पती आणि पिता आहे,’ अशी कमेंट एका युजरने केली. तर दुसऱ्या युजरने थोडी मजेशीर कमेंट केली ‘घर आजा परदेसी, तेरा देस बुलाए रे..’ अशी गाण्याची ओळ लिहीत त्याने विराटला भारतात परत येण्यास सांगितलं.
virat spotted in london with vamika! byu/sleepyypqnda inBollyBlindsNGossip
लोकांचा विश्वासच बसेना !
आई आणि नवजात बाळाला वेळ मिळावा, विश्रांती मिळावी म्हणून बाबा लाडक्या लेकीला बाहेर घेऊ आले आहेत. हे किती छान आहे, असं खूप कमी लोक करतात, असं लिहीत एका युजरने विराटचं कौतुक केल. या फोटोत वामिकाने निळ्या-पांढऱ्या रंगाचा स्वेटर घातला असून तिच्या लांबसडक केसांचा पोनी बांधला आहे. अनेक चाहत्यांनी वामिकाचं, तिच्या केसांचही खूप कौतुक केलं. ती किती मोठी झाल्ये, यावर अनेकांचा विश्वासच बसत नाहीये.
अनुष्का आणि विराट
गेल्या वर्षापासून अनुष्काच्या प्रेग्नंसीची जोरदार चर्चा होती. मात्र त्यावर विराट आणि अनुष्काने मौन बाळगलं होतं. ते यावर काहीच बोलत नव्हते. अखेर गेल्या आठवड्यात त्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून मुलाच्या जन्माची गुड न्यूज शेअर केली आणि सर्वांसमोर त्याचं नावही जाहीर केलं. बराच काळ डेट केल्यानंतर अनुष्का-विराटने डिसेंबर 2017 मध्ये लग्न केलं. त्यानंतर जानेवारी 2021मध्ये त्यांच्या मुलीचा, वामिकाचा जन्म झाला. मात्र त्यांनी तिचा चेहरा कोणालाही दाखवलेला नाही. फोटोग्राफर्सनाही तिचा फोटो काढण्यास मनाई आहे. आता 2024 मध्ये त्यांच्या मुलाचा, अकायचा जन्म झाला.