Marathi Serial: ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’च्या सेटवर धमाल, विशाल निकमचं सेटवरच वर्कआऊट सेशन

भूमिकेसाठी शरीर फिट ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे विशालनं हा नवा मार्ग शोधून काढला आहे. (Vishal Nikam's workout session on the set of Dakhkhancha Raja Jyotiba )

Marathi Serial:  ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’च्या सेटवर धमाल, विशाल निकमचं सेटवरच वर्कआऊट सेशन
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 2:32 PM

मुंबई : फिट राहण्यासाठी आणि उत्तम लाईफस्टाईलसाठी तुमचे लाडके कलाकार जीम, वर्कआऊट, योगा आणि डान्स यासारख्या अनेक गोष्टी करत असतात. यात ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत ज्योतिबा साकारणारा विशाल निकमही मागे नाहीये. ज्योतिबांची भूमिका साकारण्यासाठी विशाल भरपूर मेहनत घेतोय. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातूनही वेळ काढत विशाल वर्कआऊट करतो. खरंतर शूटिंगमधून जीमसाठी वेगळा वेळ काढणं शक्य होत नाही त्यामुळे विशालनं चक्क सेटवरच वर्कआऊट करणं सुरू केलं आहे.

भूमिकेसाठी शरीर फिट ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे विशालनं हा नवा मार्ग शोधून काढला आहे. सेटवरच्या वस्तूंचा वापर करत त्यानं सेटलाच जीम बनवलं आहे. विशाल शुद्ध शाकाहरी व्यक्ती आहे. त्यामुळे दूध, मोड आलेली कडधान्य, ताज्या भाज्या आणि फळं अश्या सकस आहाराकडे नेहमीच त्याचा कल असतो. सोबत दररोजचा व्यायाम केल्यामुळे विशालला शरीर फिट ठेवणं शक्य झालं आहे.

फिटनेस विषयीचं प्रेम व्यक्त करताना विशालनं सांगितलं की, त्यानं दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेत ज्योतिबाची भूमिका साकारण्यासाठी बारा किलो वजन वाढवलं होतं. मात्र शूटिंगच्या वेळापत्रकातून वेळ काढत हे वजन तसंच मेंटेंन करणं त्याच्यासाठी नवं आव्हान ठरत आहे. दररोज वेळ काढत जीमला जाणं त्याला शक्य नसल्यामुळे त्यानं सेटवरच वर्कआऊट करायला सुरुवात केलीये. सेटवर लाईट्ससाठी वापरले जाणारे वेट्स आणि काही उपलब्ध गोष्टींचा वापर करुन तो सेटवरच त्याचं वर्कआऊट करतो. सोबतच डाएटिशनच्या सल्यानंच तो त्याचा आहार घेतो. महत्त्वाचं म्हणजे सेटवरही त्याच्या खाण्यापिण्याची योग्य ती काळजी घेतली जाते. त्यात सर्वांच्या सहकार्यानं तो त्याचं फिटनेस मेंटेंन करतोय. सोबतच आनंदाची गोष्ट म्हणजे ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’या मालिकेला आणि माझ्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

संबंधित बातम्या 

Dhamaka | कार्तिक आर्यनचा चित्रपट ‘धमाका’ ओटीटीवर प्रदर्शित होणार?

Big News : करण जोहरच्या ‘LIGER’चित्रपटाद्वारे विजय देवरकोंडाचं बॉलीवूडमध्ये पदार्पण, पाहा चित्रपटाचा पहिला लूक

Dhaakad | कंगना रनौतचा धाकड चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित!

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.