Vivek Oberoi | सुशांतने जे केलं तेच मी देखील करणार होतो… विवेक ओबेरॉयचा धक्कादायक खुलासा
कंपनी, मस्ती, साथिया, युवा यासारखे एकाहून एक सरस चित्रपट देणारा विवेक ओबेरॉय हा बॉलिवूडचा शानदार अभिनेता आहे. मात्र अचानक बराच काळ तो बॉलिवूडपासून दूर होता. त्याचं ऐश्वर्यासोबतचं ब्रेकअप, विवेक आणि सलमान खानचं वाजलेलं प्रकरण, हे सर्वांनाच माहीत आहे. आता अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील डार्क फेजचा उल्लेख करत एक खळबळजनक खुलासा केला आहे. त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
मुंबई | 26 फेब्रुवारी 2024 : कंपनी, मस्ती, साथिया, युवा यासारखे एकाहून एक सरस चित्रपट देणारा विवेक ओबेरॉय हा बॉलिवूडचा शानदार अभिनेता आहे. मात्र अचानक बराच काळ तो बॉलिवूडपासून दूर होता. त्याचं ऐश्वर्यासोबतचं ब्रेकअप, विवेक आणि सलमान खानचं वाजलेलं प्रकरण, हे सर्वांनाच माहीत आहे. पण आता त्याने रोहित शेट्टीच्या इंडियन पुलिस फोर्समधून कमबॅक केलं असून त्यामध्ये त्याच्यासह सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी यांचीही प्रमुख भूमिका आहे. या मधील त्याच्या कामाचेही खूप कौतुक झाले. मात्र याचदरम्यान अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील डार्क फेजचा उल्लेख करत एक खळबळजनक खुलासा केला आहे. त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
सुशांत सिंह राजपूत… बॉलिवूडचा एका नामवंत अभिनेता असलेल्या सुशांत फार कमी वयातच जगाचा निरोप घेतला. त्याच्या अकस्मात मृत्यूमपळे चित्रपटसृष्टीतील प्रत्येक जण हादरला. तो खूप स्ट्रगल करत होता असं लोकांचं म्हणणं होतं. मात्र आता विवेक ओबेरॉयने सुशांतबद्दल बोलताना एक महत्वाचं विधन केलं जे ऐकून त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला. सुशांतच्या मृत्यूमुळे चाहते तर हादरलेच. लोकांचं असं म्हणणं होतं की त्याला खूप स्ट्रगल करावा लागत होत. आता त्याच कडीमध्ये विवेक ओबेरॉयचही नाव जोडलं जात आहे. नुकतंच विवेकने ह्यूमन्स ऑफ बॉम्बेशी बोलताना आयुष्यातील डार्क फेजबद्दलचा खुलासा केला. विवेकने सुशात शिंह राजपूतचं प्रचंड कौतुक केलं. तो खूप टॅलेंटड अभिनेता होता, असं तो म्हणाला.
सुशांतने जे केलं ते करण्याचा माझा विचार..
त्याच्याबद्दल बोलताना विवेक खूप इमोशनलही झाला. तो म्हणाला, एक वेळ अशी होती की माझ्या आयुष्यात सगळं काही खराब सुरू होतं. अशा वेळी सुशांतने जे पाऊल उचललं ( आत्महत्या) तेच करण्याचा माझा विचार होता. पण एका घटनेमुळे मी रोखलो गेलो आणि तसं काही केलं नाही.
खरंतर, जेव्हा सुशांत सिंह राजपूतवर अंत्यसंस्कार सुरू होते, तेव्हा विवेक ओबेरॉयही तिथे उपस्थित होता. तेव्हा विवेकने सुशांतच्या वडिलांना पाहिलं. आपला तरणाताठा मुलगा गेल्याचं दु:ख त्यांच्या डोळ्यांत दिसत होतं. तुम्ही जेव्हा हे जग सोडता, तेव्हा तुमच्या प्रियजनांना सर्वांत जास्त दुःख देता. अशा स्थितीत माझ्या मनात हा विचारही आला की मी असे काही केले तर माझ्या प्रियजनांनाही दुःख होईल. मी नशीबवान होतो की माझ्याकडे घर, कुटुंब सगळं काही होतं, असं विवेक म्हणाला.
मी जमीनीवर बसलो आणि आईच्या मांडीवर डोक ठेवून लहान मुलांसारखं गदगदून रडलो. हे सगळं माझ्यासोबतच का होतयं, हा प्रश्न मी विचारत होतो. तेव्हा माझी आई मला म्हणाली, जेव्हा तुला पुरस्कार मिळाले, कौतुक , प्रसिद्धी मिळाली तेव्हा हा ( मलाच का) हा प्रश्न तू विचारला होतास का ? तिच्या प्रश्नाने माझे डोळे उघडले, अशी आठवण विवेकने सांगितली.
विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय बराच काळ एकमेकांना डेट करत होते. मात्र त्यानंतर सलमान खान प्रकरणामुळे ऐश्वर्या आणि विवेक दोघांनाही बराच मनस्ताप झाला होता. ऐश्वर्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर विवेक खूपच तुटला होता. एवढंच नव्हे तर त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनावरही त्याचा नकारात्मक परिणाम झाला.