Mirzapur 2 | ‘कालीन भैया’, ‘गुड्डू’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, ‘मिर्झापूर 2’चा ट्रेलर प्रदर्शित!

पहिल्या सीझनमध्ये निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दुसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांना मिळणार आहेत.

Mirzapur 2 | ‘कालीन भैया’, ‘गुड्डू’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, ‘मिर्झापूर 2’चा ट्रेलर प्रदर्शित!
Follow us
| Updated on: Oct 06, 2020 | 1:36 PM

मुंबई : ओटीटी मनोरंजन विश्वात ‘मिर्झापूर‘ ही वेब सीरिज (Web Series) प्रचंड गाजली होती. ‘मिर्झापूर’च्या (Mirzapur) दुसऱ्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. त्यांची प्रतीक्षा आता संपत आलेली असून, नुकताच ‘मिर्झापूर 2’चा ट्रेलर (Trailer) प्रदर्शित करण्यात आला आहे (Web series Mirzapur 2 trailer released).

पहिल्या सीझनमध्ये अली फजल, पंकज त्रिपाठी, दिब्येंदू शर्मा आणि विक्रांत मेसी या कलाकारांच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले होते. त्यांनतर ‘मिर्झापूर’चा (Mirzapur) दुसरा सीझन पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पहिल्या सीझनमध्ये निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दुसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांना मिळणार आहेत. ‘मिर्झापूर 2’ वेब सीरिजमध्ये (Web Series) गुड्डू पंडितचा नवा अंदाज पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘मिर्झापूर 2’ची उत्सुकता शिगेला!

काही दिवसांपूर्वी याचा टीझर प्रदर्शित झाला होता. दुसऱ्या सीझनमध्ये कालीन भैया आणि त्यांचा मुलगा मुन्ना भैया या दोघांना टक्कर देण्यासाठी, बदला घेण्यासाठी गुड्डू भैया येणार आहे. पहिल्या भागात गुड्डू आणि त्याच्या भावाने कालीन भैयाच्या दहशतीचे साम्राज्य मिर्झापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरवल्याचे दाखवले होते. आपल्यापेक्षा गुड्डू आणि त्याच्या भावाला जास्त महत्त्व मिळत असल्याचे बघून दुखावलेला कालीन भैयाचा मुलगा मुन्ना भैया आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करतो. यात गुड्डूचा भाऊ आणि गुड्डूची प्रेयसी यांना गोळी लागते. गुड्डूच्या पायाला गोळी लागते. (Web series Mirzapur 2 trailer released)

पण गुड्डूच्या भावाला आवडू लागलेली गोलू (गुड्डूच्या प्रेयसीची सख्खी बहीण) वाचते. गोळीबारामुळे निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन गोलू जखमी झालेल्या गुड्डूला वाचवण्यात यशस्वी होते. एका पायाला दुखापत झालेला जखमी गुड्डू भावाच्या आणि प्रेयसीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तयारी करतोय असे टीझरमध्ये दिसले होते. ‘हमारा एक ही उद्देश है जान से मारेंगे; क्योंकि मारेंगे तभी जी पाएंगे’, असे म्हणत गुड्डू शस्त्रसज्ज होत असल्याचे  दाखवण्यात आले होते. आता बदला घेण्यासाठी गुड्डूला गोलूची मदत मिळणार आहे.

‘मिर्झापूर’ ठरलेला सुपरहिट!

मिर्झापूर एक वेब शो चित्रपट आहे. यामध्ये नशेची औषधे, बंदूका आणि अयोग्यतेने भरलेले गुन्हेगारी विश्व या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये जाती, शक्ती, अहंकार आणि हिंसा असे चार पैलू दाखवले आहेत. या चित्रपटाची कथा पुनीत कृष्णा आणि करण अंशुमान यांनी लिहिली आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंह यांनी केले आहे.

दरम्यान, सीझन 1 प्रमाणे सीझन 2 सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असे म्हटले जात आहे. सीझन 1 प्रदर्शित झाला होता तेव्हा काही दिवसात या वेब शोने मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवली होती. त्यामुळे सीझन 2 वेब शोलाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल, अशी चर्चा आहे.

(Web series Mirzapur 2 trailer released)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.