Sonakshi Sinha : लग्नाला तीनच दिवस झाले, सोनाक्षीची अचानक पोस्ट, काय म्हटलं?; का होतेय चर्चा ?
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे लग्न तर झालं. पण असे अनेक लोक आहेत जे त्यांना त्यांच्या वेगळ्या धर्मामुळे सतत ट्रोल करत आहेत. लग्नाआधीपासूनच त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यातच, लग्नाच्या अवघ्या तीन दिवसानंतरच सोनाक्षी सिन्हा हिने एक अशी पोस्ट केलीआहे, ज्यामुळे चर्चांना उधाण आलंय.काय आहे तिची पोस्ट ?
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचा नुकताच थाटात विवाह पार पडला. कुटुंबिया आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत त्यांचे रजिस्टर मॅरेज लं. त्यानंतर सर्वांसाठी एक मोठं रिसेप्शन देण्यात आलं. सोनाक्षी-जहीरच्या लग्नाबद्दल त्यांचे मित्र-मैत्रिणी आणि चाहते उत्सुक होते. पण दुसरीकडे, याच लग्नामुळे सोनाक्षी आणि तिच्या कुटुंबीयांना सोशल मीडियावर बरंच ट्रोलही करण्यात आलं. तिच्या लग्नामुळे सोशल मीडियावर दोन गट पडले होते. काही लोक म्हणाले की सोनाक्षीला तिचा जीवनसाथी निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे, तर काही लोकांचे मत होते की ज्याचे नाव शत्रुघ्न सिन्हा आहे, घराचं नाव रामायण आहे आणि भावांचे नाव लव-कुश आहे,अशा कुटुंबाचे नाव सोनाक्षीने खराब केलं.
सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाआधी अशीही चर्चा होती की शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांचे कुटुंबीय सोनाक्षीच्या या लग्नामुळे फारसे खुश नाहीत. बरेच यूजर्स या जोडीवर अनेक कमेंट करत आहेत. याचदरम्यान लग्नाच्या तीन दिवसानंतरंच सोनाक्षीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो रि-शेअर केला आहे. ती पोस्ट पाहिल्यानंतर हे समजू शकतं की सोनाक्षीला या चर्चांचा, ट्रोलिंगचा जराही त्रास झालेला नाही . या स्टोरीमध्ये सोनाक्षी आणि झहीरचे क२रिकेचर (व्यंगचित्र) आहे.
मात्र या कॅरिकेचरमध्ये हे नवविवाहीत जोडपं खूपच क्युट दिसतंय. इतकंच नाही तर प्रेम यूनिव्हर्सल रिलीजन , अशी कॅप्शनही या फोटोसोबत लिहीण्यात आली आहे. कॅरिकेचर काढणाऱ्या व्यक्तीने सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांना आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सोनाक्षीने ती पोस्ट रि-शेअर करत ‘क्यूट’ असे लिहीले आहे. तिच्या या पोस्टमुळे लोकांना एक गोष्ट तर नक्की समजली असेल की ट्रोल्समुळे किंवा ट्रोल्सचा सोनाक्षी तिच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ देणार नाही. ती अशा गोष्टींकडे लक्षच देत नाही.
शत्रुघ्न सिन्हा यांची विनंती
दरम्यान सोनाक्षीच वडील आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सर्वांना विनंती केली आहे की सोनाक्षी आणि झहीरबद्दल नकारात्मक कमेंट्स करू नका आणि नकारात्मकता पसरवू नका. माझ्या मुलीने काहीही बेकायदेशीर किंवा असंवैधानिक केलेले नाही, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान झहीर इक्बाल याने लग्नाच्या पहिल्या रात्रीच सोनाक्षीला 2 कोटी रुपयांची कार गिफ्ट केली आहे. या दोघांचे चाहते खूप खूश आहेत.
View this post on Instagram