अभिषेक बच्चन याचे लातूर कनेक्शन काय? दर महिन्याला घरी येते ही वस्तू
दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा पहिला सिनेमा 'जमीन' याचे लातूरमध्ये शुटींग सुरु होते. त्यावेळी अभिनेता रितेश देशमुख हा बॉलीवूडमध्ये आपले करिअर करण्यासाठी धडपडत होता. तो माझा चांगला मित्र.
मुंबई | 13 जानेवारी 2024 : सुपरस्टार अभिषेक बच्चन यांचे नवीन लातूर कनेक्शन समोर आले आहे. दर महिन्याला अभिषेक बच्चन यांच्या घरी ती वस्तू न चुकता घरपोच होते. विशेष म्हणजे या वस्तूचा पुरवठा कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री यांच्या घरातून होत आहे. खुद्द अभिषेक बच्चन यांनी हा खुलासा केला आहे. हे माजी मुख्यमंत्री म्हणजे स्वर्गीय विलासराव देशमुख आहेत. विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख या स्वतःच्या हाताने बनविलेली ती खास वस्तू अभिषेक बच्चन याला पाठवतात. देशभरात शुटींगच्या निमित्ताने कुठेही जो तरी ती वस्तू माझ्यासोबत असते असे अभिषेक बच्चन यांनी सांगितले.
अभिषेक बच्चन याने एका मुलाखतीदरम्यान याची कबुली दिली आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा पहिला सिनेमा ‘जमीन’ याचे लातूरमध्ये शुटींग सुरु होते. त्यावेळी अभिनेता रितेश देशमुख हा बॉलीवूडमध्ये आपले करिअर करण्यासाठी धडपडत होता. तो माझा चांगला मित्र. त्याचा मोठा भाऊ अमित देशमुख यांनी आमची लातूरमध्ये सगळी व्यवस्था केली होती. ते ही चांगले मित्र झाले.
अमित देशमुख यांनी एकदा आमच्यासाठी लातूरचा फेमस पदार्थ बाल्टी दाल पाठविला. रोजच्या जेवणात ते आमच्यासाठी खास ठेचाही पाठवत. तिखट पण स्वादिष्ट अस ठेचा मला आवडला. दर रोज मी ठेचा खायचो. त्याची सवय झाली. शुटींग संपले आणि आम्ही परत आलो. पण, येताना त्यांच्या आईनी आम्हाला ठेचा दिला होता. मला ठेचा आवडतो हे त्यांना माहित झाले आणि तेव्हापासून रितेश देशमुख यांची आई दर महिन्याला हा पदार्थ न चुकता माझ्या घरी पाठवतात, असे अभिषेक बच्चन यांनी सांगितले.
मुंबईच्या फास्ट फूडची चव कशालाच नाही…
मी कुकिंग करू शकतो. पण त्यापेक्षा मी जास्त खाण्यावर भर देतो. सिक्स पॅक सारखा मी काही हिरो नाही. त्यावर विश्वास ठेवत नाही. मी फॅमिली पॅकवर विश्वास ठेवतो. जीवनात आपल काम करतो ते कशासाठी तर पोटपूजेसाठी. मला कोणत्याही प्रकारची फळे आवडत नाही. ती मी खाऊच शकत नाही. ग्रीन खाणे हे काय खाणे आहे का? तेल नाही, मसाला नाही ते खाणे कसले? त्यात मजा नाही असेही त्यांनी सांगितले.
मी देशभरात सगळीकडे फिरलो आहे. पण, मुंबईतील स्ट्रीट फूडची जी चव आहे ती कशालाच नाही. देशात तो कुणीही बनवून दाखवा पण त्याला मुंबईसारखी चव नाही. मुंबईचा वडा पाव, पाव भाजी, भेल पुरी, पाणीपुरी हे फेवरेट आहेच. त्यातही मिसळ माझी स्पेशल आवडती फेवरेट डिश आहे. कुठलाही मिळमिळीत पदार्थ असू द्या त्यात थोडा ठेचा घाला त्याची चव बदलते. हा प्रयोग अनेकदा केला आहे. ठेचा घातलेला पदार्थ स्वादिष्ट लागतो असे ते म्हणाले.
सकाळी नाष्ट्याला ठाण्याची मामलेदार मिसळ…
मी जेव्हा मुंबईत शुटींग करत असतो तेव्हा माझा सकाळच्या नाष्ट्याला ठाण्याची मिसळ असते. सकाळी मला दररोज ब्रेक फास्टला ठाण्याची मामलेदार मिसळ लागते. पण ती तिखट मिसळ हवी. गरम करून खायची. त्यात थोडे नमकीन मिक्स करायचे आणि ती खायची. पाव सोबत मिसळ खात नाही. त्या मिसळची चव आणखी कशालाच नाही. मी मुंबईत शुटींगळा असतो तेव्हा ठाण्याहून दर रोज आमच्यासोबत काम करणारे मिस्टर तेजस ही मिसळ घेऊन येतात. कधी मी जर जाड दिसलो तर तेजसला जबाबदार धरा अशी कोपरखळीही अभिषेक बच्चन यांनी लगावली.