Abhishek Bachchan and Aishwarya Rai Bachchan: अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अखेर त्यांच्या वादाचं कारण देखील समोर आलं आहे. पैशांमुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यामध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोघांच्या भांडणाचं कारण टॅरो कार्ड रीडर गीतांजली सक्सेना यांनी सांगितलं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत गीतांजली यांनी दोघांच्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत गीतांजली म्हणाल्या, सप्टेंबर 2025 पर्यंत ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यात अनेक अडचणी येतील. ऐश्वर्या आणि अभिषेत सर्व संकटांचा सामना करत आहेत. शिवाय नातं टिकवण्याचा देखील दोघे प्रयत्न करत आहेत.
‘जर सप्टेंबर 2025 पर्यंत दोघांमध्ये सर्वकाही चांगलं झालं तर, दोघांचं लग्न टिके. मला दोघांचं लग्न टिकताना दिसत आहे. दोघांच्या भांडणाचं कारण पैसा आहे. भावनांमुळे नाही तर, दोघांमध्ये पैशांमुळे वाद सुरु आहे. पैशांवरुन दोघांमध्ये बोलणं झालं पाहिजे. कार्डमध्ये पैसा कारण दिसत आहे…’
पुढे सल्ला देत गीतांजली म्हणाल्या, ‘त्यांच्या नात्यांवर कुटुंबात असलेल्या निर्बंधांचा देखील परिणाम होत आहे. ज्यामुळे ऐश्वर्या – अभिषेक यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घ्यायला हवाय… ज्यामुळे मदद होईल. ऐश्वर्या आता कुटुंबातील झगडे सहन करु शकत नाहीये…’
‘एका वेळेनंतर गोष्टी सहन करण्याची ताकद नसते. ऐश्वर्या हिला आता काही गोष्टी सहन होत नाहीयेत. जया बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये मतभेद आहेत… असं देखील समोर आलं आहे. मुलगी श्वेता नंदा हिच्या नावावर ‘प्रतीक्षा’ बंगला केल्यानंतर वाद समोर आले…’ असं देखील सांगितलं जातं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिषेक – ऐश्वर्या यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे.