प्राजक्ता माळीची एकूण प्रॉपर्टी किती? एका ब्रॅण्डची मालकीण, फार्महाऊस आणि बरंच काही….
प्राजक्ता माळी तिच्या खाजगी आयुष्यामुळे जरा जास्तच चर्चेत असते. सध्या प्राजक्ताच्या खाजगी आयुष्यासोबतच तिच्या प्रॉपर्टीबद्दल तसेच तिच्या व्यवसायांबद्दल चर्चा होताना दिसत आहे. पाहुया नक्की तिची संपत्ती किती आहे ते.
अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या अनेक कारणांमुळे नेहमी चर्चेत असते. कधी फोटोज् तर कधी हास्यजत्रेतील तिचे काही किस्से, तिच्या मुलाखती, चित्रपट अशा अनेक कारणांमुळे ती नेहमी चर्चेत असते. पण आता प्राजक्ता तिच्या पत्रकार परिषदेवरून चर्चेत आहे.
सुरेश धस यांनी तिच्याबद्दल केलेल्या काही वक्तव्यांमुळे तिने प्रचंड राग आणि संताप व्यक्त करत ही पत्रकार परिषद घेतली होती. तिने पत्रकारांशी बोलताना या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. प्राजक्ता माळी तिच्या संपत्तीमुळे देखील नेहमी चर्चेत राहिली आहे. तुम्हाला माहितीये का की प्राजक्ताची नक्की संपत्ती किती आहे ती?
प्राजक्ताची नक्की संपत्ती किती?
सध्या प्राजक्ता माळी बऱ्याच गोष्टींबद्दल इंटरनेटवर सर्च होत असल्याचं पाहायला मिळत आहे. प्राजक्ताची संपत्ती किती? तिचं फार्म हाऊस कुठे , तिचा बॉयफ्रेंड कोण आहे वगैरेबद्दल लोक सर्च करताना दिसत आहेत.
प्राजक्ता चित्रपट, होस्टींग तसेच भिनयाबरोबरच प्राजक्ता दिग्दर्शनही करते. तसेच ती एका चित्रपटासाठी ती 15 ते 20 लाख रुपये मानधन घेते. तिने चित्रपट, मालिका आणि सिरीअलचंही दिग्दर्शन केलं आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून तिचे इन्स्टाग्रामवर 22 लाख 78 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिथे ती तिच्या फोटोशूटचे व्हिडीओ, भटकंतीचे फोटो पोस्ट करुन चाहत्यांशी कनेक्टेड राहते.
अनेक ब्रॅण्डसाठी प्राजक्ताने काम केलं आहे
प्राजक्ता अनेक मासिकांच्या मुखपृष्ठांवर झळकली आहे. यामध्ये चंदू काका सराफ ज्वेलर्स, गोविंद दूध, बिग बाझार, कसाट साडी यासारख्या अनेक ब्रॅण्डसाठी प्राजक्ताने काम केलं आहे. तसेच प्राजक्ताचा दागिन्यांचाही ब्रॅंड आहे ज्याचं नाव आहे ‘प्राजक्तराज’. या ब्रँडच्या माध्यमातून ती सोनं, चांदी आणि कॉपरची लॅमिनेटेड ज्वेलरी विकते.
16 ते 40 कोटींच्या घरात संपत्ती असल्याची चर्चा
तसेत तिने कर्जतला प्राजक्ताचं एक मोठं फार्महाऊस घेतलं आहे. हे फार्महाऊस 3 बीएचकेचं असून 15 ते 20 लोकं राहू शकतील एवढं मोठं हे फार्महाऊस आहे. ‘प्राजक्तकुंज’ असं या फार्महाऊसचं नाव आहे. एका रिपोर्टनुसार 2022 मध्ये प्राजक्ता माळीची एकूण संपत्ती ही 16 ते 40 कोटी रुपयांदरम्यान होती. आता यामध्ये वाढ झाल्याची चर्चा आहे.
View this post on Instagram
प्राजक्ता माळीने ‘पांडू’, ‘डोक्याला शॉट’, ‘मणिकर्णिका : द क्विन ऑफ झाशी’, ‘फुलंवंती’ आणि इतर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. प्राजक्ताला खरी ओळख मिळाली ती ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमधून. संगीत मानपमान हा प्राजक्ताचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट आहे.
2022 पासून प्राजक्ता अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसली
प्राजक्ताने मराठी इंडियन आयडलमध्ये अँकर म्हणून पहिल्यांदा अँकरींगची जबाबदारी घेतली होती. त्यानंतर प्राजक्ताने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून अँकरींगच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने 2022 मध्ये ‘रानबाझार’ या वेब सिरीजमधूनही तिच्या अभिनयाची वेगळी बाजू लोकांसमोर मांडली.
दरम्यान भाजपचे आमदार सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी एका राजकीय प्रकरणावरुन भाष्य करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीबरोबरच दाक्षिणात्य अभिनेत्री स्मृती मंधानाचा नावं घेतल्याने वाद निर्माण झाला. अभिनेत्री प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेऊन याबद्दल राग व्यक्त करत सुरेश धस यांनी आपली माफी मागावी अशी मागणी केली.
तसेच या प्रकरणी तिने महिला आयोगाकडे तक्रार केल्याचंही म्हटलं आहे. प्राजक्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही यासंदर्भात भेटल्याचे समजते.त्यामुळे आता हे प्रकरण नेमकं काय वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.