कोटींचे घर, साड्यांचा ब्रँड अन् स्वत:चं युट्युब चॅनेल; अशोक सराफांच्या पत्नी निवेदिता सराफ यांची एकूण संपत्ती किती?

अभिनेत्री अभिनेते अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांचा 10 जानेवारी 2025 रोजी वाढदिवस होता. मालिका, चित्रपट एवढच नाही तर साड्यांच्या ब्रॅंडपासून ते युट्युब चॅनेलपर्यंत, या सर्व माध्यमातून कमाई करणाऱ्या निवेदिता यांची नक्की संपत्ती किती हे माहितीये का? वाटेल आश्चर्य

कोटींचे घर, साड्यांचा ब्रँड अन् स्वत:चं युट्युब चॅनेल; अशोक सराफांच्या पत्नी निवेदिता सराफ यांची एकूण संपत्ती किती?
Follow us
| Updated on: Jan 11, 2025 | 1:18 PM

आपल्या मराठी चित्रपटसृष्टी अशा अनेक दिग्गज अभिनेत्री आहेत ज्या चित्रपट मालिकांसोबतच स्वत:चा व्यवसायही चालवतात. अशाच एक अभिनेत्री अभिनेते अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ. त्यांचा काल म्हणजे 10 जानेवारी 2025 रोजी 59 वा वाढदिवस होता. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही प्रेक्षकांची अत्यंत लाडकी जोडी आहे.

उत्तम अभिनेत्री सोबतच यशस्वी उद्योजिकादेखील

निवेदिता या उत्तम अभिनेत्री तर आहेतच पण सोबतच त्या यशस्वी उद्योजिकादेखील आहेत. शिवाय त्यांचं स्वत:चं युट्युब चॅनेलही आहे. तसेच सोबतच त्या चित्रपट, मालिकाही करत असतात. त्यामुळे निवेदिता यांची एकूण संपत्ती नक्की किती असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना असतेच. मग, जाणून घेऊयात की निवेदिता सराफ यांची एकूण संपत्ती किती आहे ते.

निवेदिता यांची एकूण संपत्ती

एका प्रसिद्ध मीडिया पोर्टलच्या रिपोर्टनुसार, निवेदिता जोशी- सराफ यांची एकूण संपत्ती जवळपास 10 कोटी रुपये आहे. नाटक, सिनेमे, मालिका आणि जाहिराती अशा अनेक माध्यमांतून त्यांची कमाई होते. सोबतच त्यांचं स्वतःचं युट्युब चॅनेलही चालवतात. त्यांना पाककलेची खूप आवड आहे. त्या त्यांच्या चॅनेलवर निरनिराळ्या रेसिपी करून दाखवतात.

साड्यांचा ब्रँड

शिवाय त्यांचा स्वतःचा साड्यांचा ब्रँड देखील आहे. ‘हंसगामिनी’ असं त्यांच्या साडीच्या ब्रँडचं नाव आहे. त्यांच्या कामाबद्दल सांगायचं तर निवेदिता सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत दिसतायत. तर अशोक सराफ हे कलर्स वाहिनीवरील ‘अशोक मा. मा.’ या मालिकेत दिसत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून त्या हा व्यवसाय करत आहेत. एवढच नाही तर त्या स्वत: यातील प्रत्येक साडी डिझाइन करतात.

तसेच त्यांच्या साड्यांच्या किंमती परवडेल अशा दरात असल्यानं कमी किंमतीत आणि ग्राहकांना डिझायनर साड्या उपलब्ध करून दिल्यानं ग्राहकांना समाधान मिळत असतं. सुरुवातीला त्यांनी अनेक ठिकाणी या साड्यांचं प्रदर्शन ठेवलं होतं.तसंच या व्यवसायातून अनेक गरजू महिलांना रोजगारांची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अनेक मराठी सेलिब्रिटीदेखील त्यांच्याकडून आवर्जुन साड्यांची खरेदी करतात.

अशोक सराफ यांची संपत्ती किती?

एका मीडिया पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेते अशोक सराफ यांची एकूण संपत्ती 37 कोटींच्या घरात आहे. अशोक सराफ अनेक प्रोडक्टसाठी ब्रँड एंडोर्समेंट करताना दिसतात. त्यातून त्यांची बऱ्यापैकी कमाई होते. तसेच मोठ्या पडद्यावर आणि छोट्या पडद्यावर ते साकारत असलेल्या भूमिका याशिवाय नाटकांमधूनही ते प्रेक्षकांच्या भेटीला येतात. या वयातही अशोक सराफ तिन्ही माध्यमांमध्ये मोठ्या उत्साहाने काम करताना दिसतात.

संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.