बच्चन कुटुंबांच्या घरात घुमणार शहनाईचे सूर, नव्या नंदा करणार लग्न ?
What The Hell Navya : बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा ही तिच्या 'वॉट द हेल नव्या' या शो मुळे बरीच ट्रेंडमध्ये असते. या शोमध्ये तिच्या सोबत आजी जया बच्चन आणि आई श्वेता बच्चन या दोघीही सहभागी होतात. वेगवेगळ्या विषयांवर त्या तिघी गप्पा मारत माहिती शेअर करत असतात. या शोच्या लेटेस्ट भागात नव्याने तिच्या आजीला एक प्रश्न विचारला, सध्या त्याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे.
नव्या नवेली नंदा ही प्रसिद्ध स्टारकिड्सपैकी एक आहे. बिग बी यांची नात नव्या नंदा ही तिच्या ‘वॉट द हेल नव्या’ या शो मुळे बरीच ट्रेंडमध्ये असते. या शोमध्ये केवळ ती नाही तर तिची आजी आणि अभिनेत्री आजी जया बच्चन तसेच नव्याची आई श्वेता बच्चन या दोघीही सहभागी होतात. वेगवेगळ्या विषयांवर त्या तिघी गप्पा मारत माहिती शेअर करत असतात. या शोच्या लेटेस्ट भागात नव्याने तिच्या आजीला एक प्रश्न विचारला, सध्या त्याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे.
अलीकडेच या शोमध्ये नव्याने तिची आजी जया यांना विचारलं, की जिवलग मित्राशी लग्न करणे हा योग्य निर्णय आहे का? यावर जया स्पष्टपणे म्हणाल्या- ‘हो’. त्यावर नव्याने पुढे विचारलं की, मैत्रीच्या नात्यात प्रेम आणणे योग्य आहे का?
मित्रासाठी फिलींग्स आल्या तर…
या लेटेस्ट एपिसोडमध्ये, नव्याने तिच्या आजीला तिच्या मागच्या सीझनमध्ये दिलेल्या विधानाची आठवण करून दिली की. ‘तुम्ही तुमच्या सर्वात चांगल्या मित्राशी लग्न केलं पाहिजेर’, असं विधान जया यांनी केलं होतं. तुझं ते मत अजूनही कायम आहे का ? असा प्रश्न नव्याने जया यांना विचारला. मैत्रीच्या नात्यात रोमान्स आणणे योग्य आहे का ? विशेषत: दोन लोकं जेव्हा फक्त मित्रच असतात, तेव्हा तुमच्या सर्वात चांगल्या मित्राशी लग्न करणे योग्य आहे, असं तुला वाटतं का, असंही नव्याने आजीला विचारल.
‘रोमॅटिकली गुंतणे ठीक आहे का ?’
त्यावर जया यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत स्पष्ट उत्तर दिलं. ‘लग्नानंतर रोमान्स हा खिडकीच्या बाहेर निघून जातो ( रोमान्स उरत नाही)’. ‘ पण दोन लोकं जर एकमेकांचे चांगले मित्र असतील, तर त्यांनी ( एकमेकांमध्ये) रोमँटिकली गुंतणं हे बरोबर आहे का ?’ असा सवाल नव्याने विचारला. त्यावर नव्याची आई, श्वेताने मध्येच उत्तर दिलं. ‘ तुमच्या मनात मित्राबद्दल ( रोमँटिक) भावना असतील तर तु्म्ही त्यादृष्टीने पुढे पाऊल टाकावं की नाही असं तू विचारत आहेस का, असं विचारत श्वेता म्हणाली की हो, तुम्ही पुढे गेलं पाहिजे. कारण आपल्याकडे एकच तर आयुष्य आहे, ते पण किती छोटसं आहे’ असंही श्वेताने नमूद केलं. ‘ मला वाटतं की जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत रोमँटिक रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता’ असंही श्वेता पुढे म्हणाली.
त्या तिघींच्या या गप्पा नव्या भागात ऐकायला मिळतील, मात्र नव्याने लग्नाबद्दल विचारलेल्या प्रश्नांमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नव्याच्या लग्नाची गुड न्यूज लौकरच मिळणार का, असा सवाल अनेकांच्या मनात आहे.