Explainer | सोनाक्षी सिन्हाच्या अडचणी वाढणार? काय सांगतो इस्लाम देशातील आंतरधर्मीय विवाह कायदा?

भारतात आंतरधर्मीय विवाहावर बंदी नाही. पण, जेव्हा जेव्हा एखादा सेलिब्रिटी असा विवाह करतो तेव्हा सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित होऊ लागतात. मुस्लीम देश आणि भारताच्या शेजारच्या आंतरधर्मीय विवाहाबाबतची परिस्थिती काय आहे ते जाणून घेऊ.

Explainer | सोनाक्षी सिन्हाच्या अडचणी वाढणार? काय सांगतो इस्लाम देशातील आंतरधर्मीय विवाह कायदा?
sonakshi sinhaImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jun 21, 2024 | 5:30 PM

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच बॉयफ्रेंड झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करणार आहे. दुसऱ्या धर्मातील मुलाशी लग्न करणारी सोनाक्षी हिला तिचे युजर्स ट्रोल करत आहेत. याचदरम्यान सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा तिच्या लग्नाबद्दल नाराज आहेत. ते मुलगी सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाला उपस्थित राहणार नाही, अशीही एक बातमी समोर आली आहे. मात्र, शत्रुघ्न सिन्हा मुलगी सोनाक्षीवर जास्त काळ रागावू शकत नाही. ती त्यांची अत्यंत लाडकी आहे अशीही एक चर्चा आहे. मुस्लीम धर्मीय तरुणाशी लग्न करणारी सोनाक्षी ही काही पहिली अभिनेत्री नाही. करीना कपूर, शर्मिला टागोर यासारख्या अभिनेत्रीनीही मुस्लिमांशी लग्न केले आहे. भारतामध्ये आंतरधर्मीय विवाहावर बंदी नाही. परंतु, जगातील मुस्लीम देशात मात्र आंतरधर्मीय विवाहाला बंदी आहे. त्याचे कायदे वेगळे आहेत. काय आहेत ते कायदे हे जाणून घेऊ…

भारतात आंतरधर्मीय विवाहासाठी विशेष कायदा

भारतामध्ये आंतरधर्मीय विवाहासाठी विशेष विवाह कायदा 1954 आहे. यानुसार कोणत्याही जोडप्याला त्यांची जात किंवा धर्म विचारात न घेता धर्मांतरण न करता मान्यता देण्यात येते. यासाठी संबंधित जिल्ह्यातील विवाह करणाऱ्या जोडप्यांना विवाह अधिकाऱ्यासमोर विवाहाबाबतचा मनोदय व्यक्त करावा लागतो. त्यांच्या हेतूबद्दल एक नोटीस चिकटवली जाते. त्यानंतर त्यांना 30 दिवस प्रतीक्षा करावी लागते. जेणेकरून त्यांच्या लग्नाला कोणी विरोध व्यक्त करत आहे की नाही हे लक्षात येते. मात्र, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर या कायद्यात कोणताही उपाय सुचविण्यात आलेला नाही. भारतात अनेक जाती धर्माचे लोक रहात असल्याने प्रत्येक धर्माच्या लोकांना त्यांच्या आवडीचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य भारतामध्ये आहे.

पाकिस्तानमध्ये गैर मुस्लिम पुरुषाशी लग्न करण्यास बंदी

पाकिस्तानमध्ये मुस्लिम स्त्रियांना गैर मुस्लिम पुरुषाशी लग्न करण्यास बंदी आहे. मात्र, त्या पुरुषाने मुस्लीम धर्म स्वीकारल्यास लग्नाची परवानगी देण्यात येते. बहुतेक मुस्लीमबहुल देश इतर धर्मातील लग्नाला चांगले मानत नाहीत. परंतु, कोणाला नातेसंबंध ठेवायचे असतील तर मुस्लिम तरुणांना थोडी मोकळीक देण्यात आली आहे. ते ख्रिश्चन किंवा ज्यू मुलीशी लग्न करू शकतात. त्यांना मुस्लिम धर्मात सामील व्हावे लागेल. कालांतराने हा नियम थोडा शिथिल झाला. जर समोरील व्यक्तीने आपला धर्म सोडून इस्लाम स्वीकारण्यास सहमती दर्शवली तर स्त्रिया गैर धर्माच्या पुरुषांशी विवाह करू शकतात.

बांगलादेशात हिंदू महिलांसोबत विवाह करण्यास मनाई

बांगलादेशात हनाफी श्रद्धेनुसार मुस्लिम पुरुष त्यांच्या स्वतःच्या धर्मातील महिलांव्यतिरिक्त ज्यू किंवा ख्रिश्चन महिलांशी विवाह करू शकतात. मात्र, येथे हिंदू महिलांशी विवाह करण्यास मनाई आहे. बांगलादेशात हिंदू लोकसंख्या आहे. अशा परिस्थितीत जर हिंदू आणि मुस्लिमांनी एकमेकांशी लग्न केले तर हा विवाह विशेष विवाह कायदा 1872 अंतर्गतच शक्य आहे.

ट्युनिशियामध्ये गैर मुस्लिमांशी लग्न करण्याचे स्वातंत्र्य

अरब देशांमध्ये ट्युनिशिया हा एकमेव देश आहे ज्याने आपल्या मुस्लिम मुलींना गैर मुस्लिम मुलांशी लग्न करण्यास बंदी घातलेली नाही. सप्टेंबर 2017 मध्ये या देशाने कायदा करून इतर धर्मात लग्नाला हिरवा कंदील दिला. तुर्कस्तान देशातही गैर धर्मीय विवाहावर बंदी नाही. याशिवाय सर्व मुस्लिम बहुल देश असे विवाह स्वीकारत नाहीत जोपर्यंत गैर मुस्लीम पुरुष इस्लाम धर्म स्वीकारत नाहीत.

तुर्कीमध्ये लावले जाते लहान वयातच लग्न

तुर्कि देशातही आंतरधर्मीय विवाह होऊ लागले आहेत. जर्नल ऑफ मुस्लिम मायनॉरिटी अफेअर्स धर्मनिरपेक्ष कायद्यानुसार मुस्लिम पुरुष गैर मुस्लिम महिलेसोबत विवाह करू शकतो. एक महिला दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करू शकते. यामध्ये कायदेशीर अडथळे नसले तरी सामाजिक अडथळे येतात. मात्र, मुलींनी त्यांच्या आवडीचा जोडीदार दुसऱ्या धर्मातील निवडू नये यासाठी मुलीची लग्ने लहान वयातच लावण्याची येथे प्रथा आहे.

इस्लामिक कायदा असलेल्या देशांमध्ये आंतरधर्मीय विवाह बेकायदेशीर

इस्लामिक शरिया कायद्याचे पालन करणारे जगात सुमारे 29 देश आहेत. या देशात दोन भिन्न धर्मांच्या लोकांमधील विवाहाला मान्यता नाही. गाझा पट्टीमध्ये मुस्लिमांना इतर धर्माच्या व्यक्तीसोबत लग्न करण्यास मनाई आहे. इराण आणि इराकमध्ये हे नियम खूप कडक आहेत. जोडप्यांपैकी जर एकाची धार्मिक श्रद्धा मुस्लिम नसेल तर त्यांना जोडीदारापासून वेगळे करण्यात येते.

समूहाला वाचवण्यासाठी स्व धर्मातच लग्न करण्याची प्रथा

गेल्या काही दशकापासून सामाजिक जडणघडण बिघडत चालली आहे. आंतरधर्मीय विवाहाकडे एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. आदिम समाजातही स्वतःच्या समूहाबाहेर विवाह करण्याची प्रथा होती. मात्र, समाज जस जसा विकसित झाला तस तशी स्वत:चा समूह सांभाळण्याची सामाजिक चिंता वाढत गेली. जात, धर्म, प्रदेश आणि राज्यातही लग्न प्रथा वाढली. त्यामुळे एकाच गोत्रात एकाच जातीचा विवाह होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.