आईने विचारलं, लग्न झाल्यावर बायकोचा धर्म बदलशील? वाचा नसीरुद्दीन शाह काय म्हणाले….

बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah ) आणि रत्ना पाठक (Ratna Pathak) बरीच वर्षे एकत्र गुण्यागोविंदाने नांदत आहेत. प्रदीर्घ संबंधानंतर दोघांनी 1982 साली लग्न केले होते.

आईने विचारलं, लग्न झाल्यावर बायकोचा धर्म बदलशील? वाचा नसीरुद्दीन शाह काय म्हणाले....
रत्ना, नसीरुद्दीन शाह
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 9:02 AM

मुंबई : बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) आणि रत्ना पाठक (Ratna Pathak) बरीच वर्षे एकत्र गुण्यागोविंदाने नांदत आहेत. प्रदीर्घ संबंधानंतर दोघांनी 1982 साली लग्न केले होते. दोघेही वेगवेगळ्या धर्मांचे होते. तरीसुद्धा त्याच्या प्रेमाच्या दरम्यान धर्माची भिंत कधीच आडवी आली नाही. परंतु, लग्नाआधी नसीरुद्दीनच्या आईने त्यांना विचारले होते की, लग्नानंतर रत्ना धर्म बदलणार का? यावर अभिनेत्याने दिलेले उत्तर कौतुकास्पद होते (When Naseeruddin Shah mother ask him to change wife Ratna Pathak religion after marriage).

नसीरुद्दीन आणि रत्ना यांची पहिली भेट सत्यदेव दुबे यांच्या ‘संभोग से सन्यास तक’ या नाटका दरम्यान झाली होती. या नाटकाच्या तालीमदरम्यान दोघांची एकमेकांशी मैत्री झाली. एका मुलाखती दरम्यान रत्ना पाठक यांनी स्वत: या भेटीविषयी सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या की, ‘सत्यदेव दुबे यांनी आमची ओळख करून दिली होती आणि त्यावेळी आमच्या मनात एकमेकांविषयी काहीही नव्हते. मला तर त्याचे नावसुद्धा नीट माहित नव्हते. पहिल्या दिवशी फक्त एक भेट झाली होती. मात्र, दुसर्‍याच दिवशी आम्ही छान मित्र झालो आणि मग एकत्र फिरण्यास सुरवात केली.’

आईला दिलं उत्तर!

जेव्हा नसीरुद्दीन रत्न पाठक शाहशी लग्न करणार होते, तेव्हा त्यांच्या आईने त्यांना विचारले की, तू तुझ्या भावी पत्नीचा धर्म बदलशील का? त्यानंतर नसीरुद्दीनने त्यांना थेट नकारार्थी उत्तर दिले. नसीरुद्दीन शाह म्हणाले होते की, त्यांची आई शिक्षित नसली तरीसुद्धा ती नेहमीच धर्म बदलण्याच्या विरोधात होती. ते म्हणाले की, ‘माझी आई रूढीवादी कुटुंबातील होती, तिचे शिक्षण झाले नव्हते, ती दिवसाला 5 वेळा नमाज अर्पण करायची आणि ती आयुष्यभर उपवास करत राहिली. ती म्हणायची, आपल्या बालपणात ज्या गोष्टी एखाद्याला शिकविण्यात आल्या त्या कशा बदलू शकतात? एखाद्याचा धर्म बदलणे योग्य नाही.’(When Naseeruddin Shah mother ask him to change wife Ratna Pathak religion after marriage)

नसीरुद्दीन शाह म्हणाले की, ‘आम्ही आमच्या मुलांना प्रत्येक धर्माबद्दल सांगितले आहे. परंतु, त्यांचा धर्म काय आहे, हे आम्ही कधीही सांगितले नाही. मला वाटते की धर्माबद्दलचा फरक आणि ही दरी लवकरच सुधारली जाईल. मला असं वाटतं की, माझे लग्न एका हिंदू स्त्रीशी झाले, ही सर्वांसाठी उत्तम उदाहरण आहे.’

नसीरुद्दीन शाह यांच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, ते शेवटी ‘रक्सम’ या ‘झी 5’च्या चित्रपटात दिसले होते. याशिवाय ते ‘बंदिश बॅन्डिट्स’ या वेब शोमध्ये देखील दिसले होते.

(When Naseeruddin Shah mother ask him to change wife Ratna Pathak religion after marriage)

हेही वाचा :

प्रत्येक डॉक्टर देव नसतो… वडिलांच्या मृत्यूला रुग्णालयच जबाबदार; अभिनेत्री संभावना सेठ लालबूंद

PHOTO | वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी ‘आजी’ बनली हृतिक रोशनची ‘ही’ अभिनेत्री, नातीचे फोटो केले सोशल मीडियावर शेअर!

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.