Ghibli ॲनिमेशन कुठून आले? त्याचा मालक कोण आहे? त्याची एकूण संपत्ती वाचून जाल चक्रावून
सध्या सोशल मीडियावर Ghibli फोटोंचा ट्रेंड सुरु आहे. हा ट्रेंड कुठून आला? हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया...

सध्या सोशल मीडियावर घिबली आर्ट ॲनिमेशनने धुमाकूळ घातला आहे. AI प्लॅटफॉर्म ChatGPT द्वारे जवळपास प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या फोटोंचे ॲनिमेशन बनवत आहे. यापूर्वी ही सुविधा केवळ प्रीमियम वापरकर्त्यांसाठी होती. पण आता मोफत वापरकर्ते Ghibli ॲनिमेशन देखील तयार करू शकतात. हे घिबली ॲनिमेशन कुठून आले हे तुम्हाला माहीत आहे का? त्याचा संस्थापक कोण आहे आणि त्याची एकूण संपत्ती किती हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया…
कोण आहे घिबलीचा निर्माता
‘घिबली’ या अॅनिमेशनचा जपानशी संबंध आहे. याचे श्रेय हायाओ मियाझाकी आणि त्यांचा स्टुडिओ घिबलीला जाते. हायाओ मियाझाकी यांच्या स्टुडिओचे नाव घिबली आहे. ते या स्टुडीओचे संस्थापक आहेत. मियाझाकी हे जपानी ॲनिमेशनच्या जगाचा राजा मानले जातात. त्यांनी बनवलेले चित्रपट जगभर पसंत केले जातात. त्यांनी 25 हून अधिक ॲनिमेटेड चित्रपट आणि टीव्ही मालिका केल्या आहेत. ‘स्पिरिटेड अवे’ हा त्याचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाने जगभरात २३००० कोटींहून अधिक कमाई केली होती.




वाचा: ऐश्वर्या राय बच्चनचे बॉडीगार्ड आहेत मराठमोळे? महिन्याचा पगार ऐकून व्हाल चकीत
जगातील सर्वात मोठ्या स्टुडिओपैकी एक
घिबली स्टुडिओने चित्रपटांमधून भरपूर पैसे कमावले आहेत. यामुळे हा जगातील सर्वात मोठ्या ॲनिमेशन स्टुडिओपैकी एक आहे. मियाझाकी यांच्या नेतृत्वाखाली, स्टुडिओ घिबलीने अनेक चित्रपट बनवले जे त्यांच्या रिलीजच्या वेळी जपानचे सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट ठरले आहेत.
स्टुडिओ घिबली केवळ ॲनिमेशनमधूनच नव्हे तर त्याच्या उत्पादनांमधून (जसे की खेळणी आणि कपडे), डीव्हीडी विक्री आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग अधिकारांमधूनही भरपूर पैसे कमावते. म्हणूनच मियाझाकी हे ॲनिमेशन उद्योगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत.
मियाझाकी यांची एकूण संपत्ती किती?
मियाझाकी यांच्या एकूण संपत्तीचा कोणताही अचूक अंदाज नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे 50 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 428 कोटी रुपये) आहे. स्टुडिओ घिबलीच्या प्रोडक्ट्स आणि स्ट्रीमिंग अधिकारांमुळे मियाझाकीची संपत्ती वाढवण्यात खूप मदत झाली आहे. सध्या ChatGPT प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांसाठी Ghibli ॲनिमेशन बनवत आहे. अशी छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये लोक घिबली स्टाईलमध्ये त्यांच्या आठवणी दाखवत आहेत. आगामी काळात, आणखी एआय टूल्स देखील अशा प्रतिमा आणि व्हिडिओ तयार करू शकतात. अशा स्थितीत स्टुडिओ घिबली आणि मियाझाकी यांच्या मालमत्तेवर याचा परिणाम होऊ शकतो असे मानले जाते.