मन्नत खरेदी करण्याआधी शाहरूख अन् गौरी कुठे राहायचे? पाहा त्यांचं पहिलं घर कुठे अन् कसं होतं
शाहरूख खानने आपल्या मेहनतीने जसं बॉलिवूडवर राज्य केलं तसच त्याने प्रचंड मेहनतीने त्याच्या स्वप्नातलं घर मन्नतही खरेदी केलं. पण मन्नत खरेदी करण्याआधीच शाहरूखचे गौरीसोबत लग्न झाले होते. मन्नत खरेदी करण्याच्या आधी शाहरूख अन् गौरी राहत असलेलं घर कुठे आणि कसं होतं हे अनेकांना माहित नसेल.
![मन्नत खरेदी करण्याआधी शाहरूख अन् गौरी कुठे राहायचे? पाहा त्यांचं पहिलं घर कुठे अन् कसं होतं मन्नत खरेदी करण्याआधी शाहरूख अन् गौरी कुठे राहायचे? पाहा त्यांचं पहिलं घर कुठे अन् कसं होतं](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/2-28.jpg?w=1280)
मुंबईत राहणारे असो किंवा कोणीही बाहेरून मुंबईत आलेलं असो. त्यांना सेलिब्रिटी कुठे राहतात, त्यांची घरे कुठे आहेत हे सर्व पाहण्याचं फार आकर्षण असतं. त्यामध्ये बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान याची एक झलक पाहायला तर हजारोजण त्याच्या घराबाहेर गर्दी करून असतात. तो नाही दिसला की त्याचा आलिशान बंगला मन्नतसोबत फोटो काढतात. कारण मन्नत हे सुद्धा सर्वांसाठी तेवढाच आकर्षणाचा भाग आहे.
मन्नत खरेदी करण्याआधी शाहरूख अन् गौरी कुठे राहायचे?
शाहरूख खानने आपल्या मेहनतीने जसं बॉलिवूडवर राज्य केलं तसच त्याने प्रचंड मेहनतीने त्याच्या स्वप्नातलं घर मन्नतही खरेदी केलं. पण अर्थातच शाहरूखचं हे पहिलं घर नाही कारण स्ट्रगलींच्या सुरुवातीच्या काळात तो मुंबईत दुसऱ्या ठिकाणी राहत होता. शाहरुखने गौरसाठी मन्नत खरेदी केला पण त्याआधी शाहरुख कुठे राहायचा हे फार कमी लोकांना माहित असेल.
शाहरुखच्या मुंबईतील पहिलं घर हे कार्टर रोड येथे आहे. अमृत असं त्याच्या इमारतीचे नाव आहे. पण अमृत आता दिसेनासं होणार आहे. कारण शाहरुखच्या अमृत या इमारतीचा पुनर्विकास होणार आहे. मुंबईतील सर्वात पॉश एरियामध्ये असलेली शाहरुखची ही प्रॉपर्टी त्याच्या आयुष्यातील आणि कुटुंबातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
अमृतचा पुनर्विकास होणार?
मीडिया रिपोर्ट्सनुसार या इमारतीवर अनेक बिल्डरांची नजर आहे. या मालमत्तेत शाहरुखच्या मालकीच्या टेरेस फ्लॅटचा समावेश आहे. काही वर्षांआधी शाहरुख खान हा फ्लॅट त्याचं ऑफिस म्हणून वापरत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच 10 बांधकाम व्यावसायिकांनी या मालमत्तेचा पुनर्विकास करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. येत्या आठवड्यात, समिती दोन विकासकांना अंतिम निर्णय देणार असून पुनर्विकासासाठी कोण अधिक योग्य आहे याचे मूल्यांकन करणार आहे.
विवेक वासवानी यांनी याबद्दल खुलासा केला होता
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका मुलाखतीदरम्यान अभिनेता-निर्माता विवेक वासवानी यांनी या घराबद्दल खुलासा केला होता. ते म्हणाले होते, “शाहरुख खानचं लग्न होईपर्यंत तो माझ्या घरी राहत होता. गौरीशी लग्न केल्यानंतर ते ताज लँड्स एंडच्या शेजारी असलेल्या देवदत्तच्या घरी राहायला गेले. त्यानंतर ते अजीज मिर्झाच्या घरात राहायला गेले. अजीजच्या पत्नीने तिची टीआयएफआरमधील नोकरी सोडली तेव्हा त्यांना देवदत्तकडे परत जावे लागले” असे करत त्यांना अनेक घरं बदलावी लागल्याचं वासवानींनी सांगितलं.
शाहरुखने अमृत फ्लॅट कसा खरेदी केला?
वासवानी यांनी मुलाखतीत सांगितले होते की, शाहरुख खान आणि गौरी लग्नानंतर माउंट मेरी येथील असुदा कुटीर येथे एका छोट्या फ्लॅटमध्ये राहत होते. या कठीण काळात चित्रपट निर्माते प्रेम लालवानी यांनी शाहरुखला गुड्डू चित्रपटात भूमिका ऑफर केली होती.
शाहरुखने तेव्हा फ्लॅट घेण्यासाठी 40 लाख रुपये मागितले होते. त्याबदल्यात चित्रपटासाठी तारखा देण्याचं आश्वासन त्यानं दिलं होतं. लालवानी यांनी शाहरुखला पैसे दिले आणि त्या पैशातून त्याने अमृत हा फ्लॅट विकत घेतला. ही मालमत्ता पूर्वी राजेश खन्ना यांचे मामा ए.के. ती तलवारी यांची होती.