Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tv9 Marathi Poll : द काश्मिर फाईल्स, झुंड, की पावनखिंड… कोणत्या चित्रपटाकडे प्रेक्षकांचा सर्वाधिक कल? जाणून घ्या टीव्ही 9 मराठीचा पोल

द काश्मिर फाईल्ससोबत झुंड आणि पावनखिंड अशा दोन मराठी सिनेमांनाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. अशावेळी आम्ही प्रेक्षकांनाच एक प्रश्न विचारला की तुम्हाला कोणता सिनेमा पाहायला आवडेल? युट्युब लाईव्ह, युट्युब कम्युनिटी आणि ट्विटरवर पोलद्वारे आम्ही प्रेक्षकांची पसंती जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.

Tv9 Marathi Poll : द काश्मिर फाईल्स, झुंड, की पावनखिंड... कोणत्या चित्रपटाकडे प्रेक्षकांचा सर्वाधिक कल? जाणून घ्या टीव्ही 9 मराठीचा पोल
द काश्मिर फाईल्स, झुंड, पावनखिंडImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 12:15 AM

मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट शुक्रवारी (11 मार्च) प्रदर्शित झाला. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवरही (Box Office) दणक्यात कमाई सुरू आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 14 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. असं असलं तरी या चित्रपटावरुन काही वाद पाहायला मिळत आहे. राज्यात हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी भाजपनं आज विधानसभेत केलीय. मात्र, सरकारकडून अद्याप त्याबाबत ठोस प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्याच दरम्यान, झुंड आणि पावनखिंड अशा दोन मराठी सिनेमांनाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. अशावेळी आम्ही प्रेक्षकांनाच एक प्रश्न विचारला की तुम्हाला कोणता सिनेमा पाहायला आवडेल? युट्युब लाईव्ह, युट्युब कम्युनिटी आणि ट्विटरवर पोलद्वारे आम्ही प्रेक्षकांची पसंती जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.

युट्युब लाईव्हवरील पोल काय सांगतो?

आम्ही युट्युब लाईव्हवर लोकांना तुम्हाला कोणत्या सिनेमा पाहायला आवडेल असं विचारलं. 6 तासात एकूण 44 हजार 225 जणांनी आपलं मत नोंदवली आहे. त्यात सर्वाधिक 44 टक्के पेक्षकांनी पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटाला पसंती दिलीय. त्यापाठोपाठ द काश्मिर फाईल्स या चित्रपटाला 36 टक्के तर झुंड सिनेमाला 20 टक्के प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.

Youtube Live Poll

टीव्ही 9 मराठीचा पोल

युट्युब कम्युनिटीवरील पोल

यु्ट्युब कम्युनिटीवरही आम्ही प्रेक्षकांना हाच प्रश्न विचारला. इथे 6 तासात तब्बल 89 हजारापेक्षा अधिक प्रेक्षकांनी आपलं मत नोंदवलं आहे. यातही सर्वाधिक 52 टक्के पेक्षकांनी पावनखिंड या चित्रपटालाच पसंती दिलीय. त्यापाठोपाठ 30 टक्के प्रेक्षकांनी द काश्मिर फाईल्सला पसंती दिलीय. तर 18 टक्के प्रेक्षक म्हणत आहेत की आम्हाला झुंड चित्रपत पाहायला आवडेल.

Youtube Community Poll

टीव्ही 9 मराठीचा पोल

ट्विटरवरील पोलमध्ये सर्वाधिक पसंती कोणत्या सिनेमाला?

जेव्हा हाच प्रश्न आम्ही ट्विटरवरही विचारला तेव्हा मात्र काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. ट्विटरवर एकूण 6 तासांत 5 हजार 480 जणांनी आपली पसंती नोंदवली आहे. त्यात सर्वाधिक 51 टक्के लोकांनी आपली पहिली पसंती द काश्मिर फाईल्सला दिलीय. त्यापाठोपाठ पावनखिंडला 29.6 टक्के, तर झुंड सिनेमाला 19.4 टक्के प्रेक्षकांनी पसंती दिल्याचं पाहायला मिळत आहे.

Twitter Poll

टीव्ही 9 मराठीचा पोल

इतर बातम्या :

नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’मुळे कपिल शर्मा पुन्हा वादात; नेटकऱ्यांकडून होतेय टीका

“द काश्मीर फाईल्स’ सिनेमा टॅक्स फ्री करा”, भाजपची विधीमंडळ अधिवेशनात मागणी

‘पावनखिंड’ OTTवर का प्रदर्शित केला नाही; चिन्मय मांडलेकरच्या उत्तराने जिंकली नेटकऱ्यांची मनं

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.