माधुरी दीक्षितचा डॉक्टर नवरा कोणत्या अवयवांचे ऑपरेशन करतात? ज्यासाठी मेडिकल शिक्षणानंतरही करावी लागते 6 ते 7 वर्ष कठोर मेहनत
अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉक्टर पती श्रीराम नेने सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असतात. नेहमी ते हेल्थबदद्ल टिप्स देत असतात पण बहुतेकजणांना हे माहित नसेल की डॉक्टर नेने कोणत्या आजारांवर उपचार करतात अन् कोणत्या अवयवांची सर्जरी करतात ते.
अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉक्टर पती श्रीराम नेने सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असतात. शिवाय ते अनेक वेळा आरोग्याबद्दल, खाण्यापिण्याबद्दल, डाएटबद्दल टिप्स देत असतात. एवढच नाही तर ते बऱ्याचदा काही पदार्थ स्वत: बनवूनही दाखवतात. सोशल मीडियावर श्रीराम नेने यांचे व्हिडीओ तुफान चालतात. तसेच लोकं त्यांच्या टिप्सना फॉलोही करतात
डॉक्टर नेने कोणत्या आजारांवर उपचार करतात?
तसं पाहायाला गेलं तर, डॉक्टर नेनेंबद्दल म्हणावं तेवढं लोकांना माहित नाही. त्यातील एक गोष्ट म्हणजे डॉक्टर नेने हे कोणत्या आजाराचे डॉक्टर आहेत. ते एक सर्जन आहेत हे माहित आहे. पण कोणत्या विषयात किंवा कोणत्या अवयवांचं ते ऑपरेश करतात याची कदाचित अनेकांना कल्पना नसेल. डॉक्टर नेने कार्डियोथोरेसिक सर्जन आहे.
कोणत्या अवयवांची सर्जरी करतात?
फुफ्फुस आणि छातीच्या दुसऱ्या भागांचे ऑपरेशन करतात. तसेच हार्ट वॉल रिप्लेसमेंट, हार्ट ट्रान्सप्लांट, लंग्स कॅन्सर, ऑइसोफॅगल कॅन्सर या आजारांवरही ते उपचार देतात.
यासाठी मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड ट्रेनिंग घ्यावी लागते. स्पेशलायजेशन करावं लागतं. तसेच मेडिकलचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना 7 ते 8 वर्षांची सर्जरीची कठीण ट्रेनिंगही घ्यावी लागते.
डॉक्टर नेने यांचे शिक्षण?
डॉ. श्रीराम नेने यांनी सेंट लुईस (एबी 1988), वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन (एमडी 1993), यूसीएलए स्कूल ऑफ मेडिसिन इंटर्नशिप (1993-1994) मध्ये शिक्षण घेतले.
याशिवाय त्यांनी UCLA स्कूल ऑफ मेडिसिन जनरल सर्जरी रेसिडेन्सी (1994-2000), UCLA स्कूल ऑफ मेडिसिन व्हॅस्कुलर रिसर्च फेलो (1995-1997), फ्लोरिडा विद्यापीठ कार्डिओथोरॅसिक रेसिडेन्सी (2000-2002) मधून वैद्यकीय अभ्यास पूर्ण केला आहे.
अमेरिकेतून भारतात येण्याचा निर्णय का घेतला?
दरम्यान माधुरीसोबत लग्न झाल्यानंतर ते अमेरिकेत पुन्हा परतले होते. मात्र इतके वर्ष अमेरिकेत राहिल्यानंतर माधुरीसह त्यांनी पुन्हा भारतात परतण्याचा निर्णय घेतला. याबद्दल डॉ. श्रीराम नेनेंनी सांगितले होते, “मी 20 वर्षे हार्ट सर्जरी करत होतो आणि प्रत्येक दिवसाला मी तीन ते पाच केसेस सांभाळत होतो. फायदा खूप होता आणि रिवॉर्ड्सही खूप होते. माझे खूप रुग्ण बरे झाले, ते पाहून मलाही छान वाटायचं. पण डॉक्टर होण्यापूर्वी मी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सगळं टेक्नॉलॉजीचं काम करत होतो. मला 2011 मध्ये वाटलं की भारताला खूप गरज आहे, त्यामुळे मी तिथून इथे आलो.” असं म्हणत त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय हा देशप्रेम आणि भारतातील संस्कृती कशी आहे मुलांना समजावं यासाठी घेतल्याचं सांगितलं आहे.