सैफवर हल्ला करणारा ‘तो’ अज्ञात व्यक्ती नक्की कोण? मोलकरणीच्या जबाबामधून धक्कादायक माहिती समोर

मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्यांच्या घरी चाकूने हल्ला झाला. त्यांच्या मोलकरणीवरही हल्ला झाला आहे. सैफ यांच्यावर सहा वार झाले आहेत. मोलकरणीने पोलिसांना दिलेल्या जबाबामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हल्ला करणारा व्यक्ती नक्की कोण होता असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

सैफवर हल्ला करणारा 'तो' अज्ञात व्यक्ती नक्की कोण? मोलकरणीच्या जबाबामधून धक्कादायक माहिती समोर
Follow us
| Updated on: Jan 16, 2025 | 10:30 AM

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री अडीच वाजता वाजण्याच्या सुमारास चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

सैफ अली खानला पहाटे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच डॉ. नितीन डांगे, डॉ. लीना जैन यांच्याकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जात असल्याची माहितीही समोर आलं आहे.

मोलकरणीच्या जबाबामधून धक्कादायक माहिती

तसेच सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यापैकी दोन जखमा खोलवर आहेत. त्यातील एक जखम मनक्यावर देखील असल्याचं म्हटलं जातं. तर सैफवर ऐकूण 6 वार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. एवढी मोठी घटना कशी घडली याबद्दल सर्वांनाच प्रश्न पडला आहे.

एवढच नाही तर सैफ सोबत त्याच्या मोलकरणीवर देखील हल्ला झाला आहे. या हल्ल्यात तिच्या हाताला इजा झाली असून तिच्यावरही उपचार करण्यात आले आहेत. तसेच पोलिसांनाही मोलकरणीचा जबाब नोंदवून घेतला आहे. या जबाबानुसार एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याबाबत मुंबई पोलिस डीसीपी यांनी सांगितले की, काल रात्री उशिरा एक अज्ञात व्यक्ती अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसला आणि त्याच्या मोलकरणीसोबत वाद घालू लागला.

जेव्हा अभिनेत्याने त्यात हस्तक्षेप करून त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या व्यक्तीने सैफ अली खानवरही हल्ला करून त्याला जखमी केले. या हल्ल्यात त्याच्यावर 6 वार झाले. त्याच्या मनक्यावर खोलवर जखम झाली.

अनेक धक्कादायक प्रश्न उपस्थित

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण या माहितीवरून एकच प्रश्न उपस्थित केला जात आहे की हा अज्ञात व्यक्ती नक्की कोण होता. चोर होता की अजून कोण? हा अज्ञात व्यक्ती अचानक घरात कसा काय घुसू शकतो? मोलकरणीसोबत वाद घालत असताना सैफ त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होता याचा अर्थ हा काही वेगळाच वाद होता का?

सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे तो म्हणजे सुरक्षेचा. घराभोवती एवढी सुरक्षा असताना हा व्यक्ती घरात घुसतो म्हणजे हा कोणी ओळखीचा व्यक्ती असू शकतो का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

पोलिस अॅक्शन मोडमध्ये 

तसेच वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक चित्रपट अभिनेता सैफ अली खानच्या घरी पोहोचले असून पोलिस सैफ अली खानच्या इमारतीतील सीसीटीव्ही आणि आजूबाजूच्या इमारतींचे सीसीटीव्ही तपासत आहेत. एवढच नाही तर पोलिसांनी सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्या आणि सुरक्षारक्षकांचे मोबाईल जप्त केले आहेत. पोलिसांनी काही लोकांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले आहे.

पोलिसांकडून मीडिया आणि चाहत्यांना आवाहन 

दरम्यान सैफ अली खानची शस्त्रक्रिया अजूनही सुरू असल्याचं म्हटलं आहे. सैफच्या टीमशी संबंधित लोकांनी सांगितले की, काही लोकांना भीती वाटते की त्याच्या मणक्याला एखादी तीक्ष्ण वस्तू लागली असेल असं सांगितलं जातं आहे. तो सध्या रुग्णालयात असून त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू असल्याचं म्हटलं जात आहे.

मीडिया आणि चाहत्यांना धीर धरण्याची विनंती पोलिसांनी केली आहे. तसेच प्रत्येक क्षणाची आम्ही अपडेट देऊ असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.