Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांचा जावई किती श्रीमंत ? कपूर घराण्याशी खास कनेक्शन माहित आहे का ?

अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाविषयी जाणून घ्यायला लोकांना खूप आवडतं. खुद्द अमिताभ, त्यांची पत्नी जया, मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या, मुलगी श्वेता, त्यांची नातवंड... कोणाबद्दलही काही बातमी समोर आली की सगळ्यांचे कान टवकारतात.. पण बच्चन कुटुंबातील आणखी एक सदस्य आहे, ज्याबद्दल लोकांना फारच कमी माहीत आहे.

Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांचा जावई किती श्रीमंत ? कपूर घराण्याशी खास कनेक्शन माहित आहे का ?
Follow us
| Updated on: Mar 20, 2024 | 6:38 PM

मुंबई | 20 मार्च 2024 : बॉलिवूडचं चर्चेतलं कुटुंब म्हणजे बच्चन परिवार… अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाविषयी जाणून घ्यायला लोकांना खूप आवडतं. फक्त त्यांच प्रोफेशनल आयुष्यच नव्हे तर त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलही लोकांना खूप उत्सुकता असते. खुद्द अमिताभ, त्यांची पत्नी जया, मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या, मुलगी श्वेता, त्यांची नातवंड… कोणाबद्दलही काही बातमी समोर आली की सगळ्यांचे कान टवकारतात. अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चन हिने नुकताच तिचा 50 वा वाढदिवस साजरा केला. अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या, तिच्यासाठी एका मोठ्या पार्टीचेही आयोजन करण्यात आले होते. पण बच्चन कुटुंबातील आणखी एक सदस्य आहे, ज्याबद्दल लोकांना फारच कमी माहीत आहे.. तो सदस्य म्हणजे अमिताभ बच्चन यांचा जावई, श्वेता हिचा पती…

कोण आहे श्वेताचा पती ?

अमिताभ बच्चन यांची मोठी मुलगी श्वेता हिचं लग्न 1997 साली निखील नंदा यांच्याशी झालं. दोघांचं लग्न खूप चर्चेत होतं, लग्नाचे फोटोही बरेच व्हायरल झाले होते. श्वेता आणि निखील यांना नव्या आणि अगस्त्य अशी दोन मुलं आहेत. नव्या ही चित्रपट क्षेत्रात कार्यरत नाही. पण अगस्त्यने गेल्या वर्षी ‘द आर्चिज’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

हे सुद्धा वाचा

मिताभ यांनी त्यांच्या लेकीसाठी ज्या जोडीदाराची निवड केली तो कोणी छोटा-मोठा माणूस नव्हे…तोही खासच ! श्वेता हिचा पती निखील नंदा यांचं नेटवर्थ, संपत्ती जाणून घ्याल तर तुम्हीदेखील अवाक् व्हाल.

अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे, त्यांचा जावाई हा मात्र मनोरंजन क्षेत्राशी निगडीत नाही. चित्रपट जगताशी त्याचा काहीही संबंध नसला तरी बिझनेसच्या क्षेत्रात त्याचं मोठं नाव आहे. निखिल नंदा हा एस्कॉर्ट कंपनीचे मालक राजन नंदा यांचा एकुलता एक मुलगा आहे. 1944 साली, निखीलच्या आजोबांनी ही कंपनी सुरू केली होती. निखील नंदा आता या कंपनीची धुरा यशस्वीपणे सांभाळतात.

संपत्ती ऐकाल तर…

आता निखिल नंदा यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलूया. अमिताभ बच्चन यांचा हा जावाई, श्वेता बच्चनचा पती हे कोट्याधीश आहेत. निखिल नंदा यांचं शालेय शिक्षण देहरादून येथील एका शाळेत झालं. पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. निखिल नंदा हे वित्त आणि मार्केटिंग या क्षेत्रात सक्रीय आहेत. एस्कॉर्ट्स लिमिटेड या कंपनीचे त संस्थापक आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. कन्स्ट्रक्शन संबंधित गोष्टी या ट्रॅक्टर निर्मितीची कामे या कंपनीत केली जातात. हे सामान विदेशातदेखील एक्सपोर्ट केलं जातं. रिपोर्ट्सनुसार, 2021 साली त्यांच्या कंपनीची उलाढाल 7014 कोटी रुपये होती.

कपूर कुटुंबाशी आहे खास कनेक्शन

निखिल नंदा हे चित्रपट क्षेत्रात कार्यरत नसले, सतत लाईमलाइटमध्ये नसले तरीही सिनेजगताशी त्यांचं खास कनेक्शन आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे त्यांचे सासरे तर आहेतच पण बॉलिवूडमधील आणखी एक मोठं घराणं, कपूर कुटुंबाशीही त्यांचा खास संबंध आहे. ते राज कपूर यांचे नातू आहेत. राज कपूर यांची मुलगी रितू कपूर यांचं लग्न राजन नंदा यांच्याशी झालं. त्यांचा मुलगा म्हणजे निखील नंदा. त्यामुळे रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर हे निखिल नंदाचे मामा लागतात. तर करिश्मा कपूर, करीना कपूर, रणबीर कपूर, रिद्धिमा कपूर ही त्यांची भावंडं आहेत.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.