समांथा की तिचा माजी नवरा, कोण आहे जास्त श्रीमंत ? नागा चैतन्यची संपत्ती किती ?
समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचा आता घटस्फोट झाला असला तरी ते सतत चर्चेत असतात. नागा चैतन्यने नुकताच अभिनेत्री सोभिता धुलिपाला हिच्याशी साखरपुडा केला. या तिघांमध्ये सर्वांत श्रीमंत कोण आहे? समांथाची संपत्ती किती आहे ?
समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य विभक्त झाले असले तरी त्यांचे चाहते नेहमी आठवण काढत असतात. समंथाने 2017 साली साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यसोबत प्रेमविवाह केला होता, परंतु लग्नाच्या अवघ्या 4 वर्षानंतर समंथा आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट झाला. समंथा अजूनही अविवाहित असताना, नागा चैतन्यने नुकताच सोभिता धुलीपालाशी साखरपुडा केले आहे. 8 ऑगस्ट रोजी कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोघांचा साखरपुडा झाला.
त्याआधी नागा चैतन्य आणि सामंथा दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते, नंतर त्यांनी लग्न केलं आणि चार वर्ष एकत्र होतं. धक्कादायक गोष्ट म्हणजे घटस्फोटाच्या 6 महिन्यांपूर्वीपर्यंत समंथा ही बाळासाठी प्लानिंग करत होती , मात्र नंतर दोघांत काही तरी बिनसलं आणि दोघंनी डायरेक्ट घटस्फोटच घेतला. घटस्फोटाच्या वेळी सामंथाला 200 कोटी रुपये पोटगीची ऑफर देण्यात आली होती, परंतु तिने ते पैसे स्वीकारण्यास नकार दिला होता. समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य या दोघांत सर्वात श्रीमंत कोण आहे, त्यांची संपत्ती किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया.
समंथा रुथ प्रभुकडे किती आहे संपत्ती ?
सामंथा रुथ प्रभूने 2010 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले असून गेल्या 14 वर्षांपासून की फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. या कालावधीत तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. चित्रपट आणि वेब सिरीज व्यतिरिक्त, समंथा ही ‘सॅमसंग’, ‘ड्रीम 11’ आणि ‘टॉमी हिलफिगर’ सारख्या अनेक ब्रँड्सना एंडोर्सही करते. समंथा रुथ प्रभू हिची एकूण संपत्ती 101 कोटी रुपये आहे. ‘सिटाडेल: हनी बनी’ या वेब सीरिजमध्ये काम करण्यासाठी समंथाने अंदाजे 10 कोटी रुपये आकारले आहेत. याआधी समंथा तिच्या चित्रपटांसाठी 4 कोटी रुपये मानधन घेत होती. पण ‘पुष्पा: द राइज़’ चित्रपटातील अवघ्या एका गाण्यासाठी तिने 5 कोटी चार्ज केले होते.
View this post on Instagram
37 वर्षीय समंथा हिच्याकडे सुमारे 8 कोटी रुपयांचे डुप्लेक्स अपार्टमेंट आहे. तसेच एक सीफेसिंग 3 बीएचके अपार्टमेंट देखील आहे, ज्याची किंमत 15 कोटी रुपये आहे. सामंथाकडे ‘जॅग्वार एक्सएफ’, ‘लँड रोव्हर’, ‘ऑडी क्यू7’, ‘पोर्श केमन जीटीएस’, ‘बीएमडब्ल्यू 7 सीरीज’ आणि ‘मर्सिडीज बेंझ जी63 एएमजी’ सारख्या लक्झरी कारही आहेत.
नागा चैतन्य किती श्रीमंत ?
साऊथचा सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य हा देखील दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता आहे. नागा चैतन्यने 2009 मध्ये आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. नागा चैतन्यची एकूण संपत्ती 154 कोटी रुपये आहे. नागा चैतन्यचे वडील आणि प्रसिद्ध अभिनेता नागार्जुन यांची एकूण संपत्ती 3100 कोटी रुपये आहे आणि ते दक्षिणकडेली चित्रपट उद्योगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहेत. नागा चैतन्य हाँ चित्रपट किंवा वेब सीरिजसाठी 5 ते 10 कोटी रुपये आकारतो. ‘धूता’साठी अभिनेत्याने 5 ते 8 कोटी रुपये फी घेतली होती, अशी चर्चा होती.
View this post on Instagram
सोभिता धुलिपाला चे नेटवर्थ माहीत आहे का ?
नागा चैतन्यचा नुकताच अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी साखरपुडा झाला. सोभिता हिने 2016 साली तिच्या करिअरची सुरुवात केली. शोबिझ, मेड इन हेवन सारख्या वेबसिरीजमध्ये तिने काम केले आहे. सोभिताची एकूण संपत्ती 7-10 कोटी रुपये आहे. ‘लाइफस्टाइल एशिया’नुसार, सोभिता धुलिपाला प्रत्येक चित्रपट किंवा वेब सीरिजसाठी 70 लाख ते 1 कोटी रुपये आकारते. ‘पोनियिन सेल्वन: आय’साठी अभिनेत्रीने एक कोटी रुपये फी आकारली होती.