पहले फुर्सत में निकल… कोण आहे मराठमोळा ‘हिंदुस्थानी भाऊ’?

विकास पाठकने वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून 35 व्या दिवशी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता. बेधडक स्वभाव आणि बिनधास्त बोलण्याच्या शैलीमुळे तो सहस्पर्धकांच्याही पसंतीस उतरला आहे.

पहले फुर्सत में निकल... कोण आहे मराठमोळा 'हिंदुस्थानी भाऊ'?
Follow us
| Updated on: Nov 14, 2019 | 3:44 PM

मुंबई : विकास पाठक (Vikas Pathak) हे नाव ऐकून तुमच्या डोळ्यासमोर कोणी आलं का? मग ‘हिंदुस्थानी भाऊ’ म्हटल्यावर नक्कीच तुमच्या नजरेसमोर नक्कीच एका तरुणाचा चेहरा आणि त्याच्यावरचे मीम्स धडाधड आले असतील. ‘पहले फुर्सत में निकल’ असं म्हणत सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा पठ्ठ्या ‘बिग बॉस 13’मध्ये (Youtube Sensation Hindustani Bhau) झळकत आहे.

‘हिंदुस्तानी भाऊ’बाबत अनभिज्ञ असलेले मोजकेच नेटिझन्स असतील. विकास पाठक हा ‘हिंदुस्तानी भाऊ’ या नावाने टिकटॉक, यूट्युब आणि फेसबुकवर प्रसिद्ध आहे. देशाविरोधात भाष्य करणाऱ्यांची हिंदुस्तानी भाऊ आपल्या शैलीत फिरकी घेतो. भाऊचे टिकटॉकवर 6 लाख, तर यूट्युबवर तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

मराठमोळा बबलू उर्फ विकास जयराम पाठक हा जन्माने मुंबईकर आहे. तो आई-वडील, पत्नी आणि मुलगा आदित्य यांच्यासह मुंबईत राहतो.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताविषयी बोलणाऱ्यांना चपराक लगावण्यासाठी त्याने सहजच एक व्हिडीओ बनवला होता. या व्हिडीओला चांगले हिट्स मिळाले. विकासचं ‘हिंदुस्थानी भाऊ’ असं नामकरण झालं. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

YouTube च्या नियमांमध्ये बदल, तुमचं चॅनल कधीही बंद होऊ शकतं

‘बिग बॉस’च्या तेराव्या पर्वात तो प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. विकासने वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून 35 व्या दिवशी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता. बेधडक स्वभाव आणि बिनधास्त बोलण्याच्या शैलीमुळे तो सहस्पर्धकांच्याही पसंतीस उतरला आहे.

लहान वयातच विकासवर घरची जबाबदारी पडली होती. विकासचं शिक्षण सातवीपर्यंतच होऊ शकलं. वडिलांची नोकरी सुटल्यामुळे सुरुवातीच्या काळात खार जिमखान्यात 20 रुपये प्रतिदिन म्हणून बॉलबॉयची पहिली नोकरी त्याने धरली. त्यानंतर त्याने बारमध्ये वेटर म्हणून काम केलं. लोकलमध्ये आणि दारोदार जाऊन अगरबत्त्याही विकल्या. चायनीजच्या गाडीवरही भाऊने काम केलं आहे.

साईबाबांना भाऊ श्रद्धास्थानी मानतो. साईबाबांसोबत संजूबाबाही त्याला आवडतो. संजय दत्त हा विकासचा आवडता अभिनेता आहे. संजूबाबाची स्टाईल भाऊच्या (Youtube Sensation Hindustani Bhau) व्हिडीओंमधून डोकावते, यात नवल नाही.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.