Aishwarya Rai And Aaradhya: जळी स्थळी… आराध्यासोबत ऐश्वर्या नेहमी सावलीसारखी का असते ? उत्तर अखेर कळलंच…
आराध्या बच्चन ही ऐश्वर्याची लाडकी लेक आहे, जिथे ऐश्वर्या जाईल तिथे आराध्या नेहमी सोबत दिसते, यामुळे अभिनेत्रीला बरंच ट्रोलिंगही सहन करावं लागतं. आराध्या कधी शाळेत जात नाही का ? ऐश्वर्या मुलीचा हात एवढा जवळ, घट्ट पकडून का चालते ? असे अनेक प्रश्न विचारत नेटीजन्स तिच्यावर टीका करतात. या सर्व प्रश्नांचं उत्तर अखेर ऐश्वर्याच्या मुलाखतीमधून मिळालंय.
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सदैव चर्चेत असते. सध्या ती दुमबईमध्ये असून तेथे तिला ‘पोन्नियन सेल्वन’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या अवार्ड फंक्शनमध्ये ऐश्वर्याची लाडकी लेक आराध्या बच्चनही उपस्थित होती, तिथे ती आईसाठी चिअर करताना दिसली. मात्र त्यामुळे तिला बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आईसोबत सतत, सर्व इव्हेंट्समध्ये जाणाऱ्या आराध्यावर टीकेची झोड उठलीये. ऐश्वर्या आणि आराध्याच्या एका व्हिडीओवर लोकांनी प्रश्नांचा भडिमार केलाय. अभिनेत्री (ऐश्वर्या) आराध्याला सतत सोबत घेऊन सगळीकडे का जाते ? आराध्या शाळेत जात नाही का ? असे अनेक सवाल तिला सतत विचारण्यात येतात आणि ट्रोलही केलं जातं.
मात्र या प्रश्नांची उत्तर अखेर मिळाली आहेत. एका जुन्या मुलाखतीत ऐश्वर्याने याबाबतीत खुलासा केलाय. 4 वर्षांपूर्वी देखील ऐश्वर्याला असेच प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हाच तिने त्याचं उत्तर दिलं होतं. ‘आराध्याच्या जन्मानतर माझी प्रायॉरिटी पूर्णपणे बदलली आहे. माझी मुलगी हीच माझ्यासाठी सर्वात पहिले येते आणि बाकीच्या सर्व गोष्टी त्यानंतर येतात. आराध्या ही नेहमी पॉझिटिव्ह स्टेट ऑफ माईंड ( सकारात्मक दृष्टिकोन) असलेल्या व्यक्तसोबत रहावं’ अशी आपली इच्छा असल्याचंही ऐश्वर्याने नमूद केलं होते.
कोणताही कार्यक्रम असो किंवा विमानतळावरू जातानाही, ऐश्वर्या नेहमीच आराध्याचा हात धरून चालताना दिसते. ती नेहमी तिला तिच्या जवळ ठेवते, प्रोटेक्ट करताना दिसते. सगळा वेळ मुलीला पकडून का चालतेस ? एखाद्या बाहुलीसारखी वागणूक का देतेस, जसं काही तिच्यावर हल्ला होणार आहे,असे अनेक प्रश्न ऐश्वर्याला विचारले जातात. त्याबद्दलही तिने उत्तर दिलं होतं. ‘ माझी मुलगी लहानपणापासून लाईमलाईटमध्ये आहे.तिला त्याची जाणीव आहे.पण तिला त्याची मजा वाटते आणि त्यावर हसतेही. पण पापाराझी जवळ आल्यावर ते कसं सांभाळायचं हे मला माहीत आहे’ असं ऐश्वर्या म्हणाली.
जळी स्थळी…सगळीकडे लेकीला सोबत घेऊन का फिरते ऐश्वर्या ?
ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन यांच्यात छान बाँडिंग आहे. तिला अनेकदा तिच्या मुलीसोबत स्पॉट केले जाते. बऱ्याच दिवसांपासून ऐश्वर्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहेत.तिच्यात व अभिषेकमध्ये काहीही ठीक नसल्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. अलीकडे, एका कार्यक्रमात दिसलेल्या ऐश्वर्याच्या हातात लग्नानंतर घातली जाणारी अंगठी दिसली नाही, त्यावरूनही अनेक अफवा उडू लागल्या. घटस्फोटाच्या चर्चाही सुरू झाल्या. मात्र ऐश्वर्या असो किंवा अभिषेक अथ्वा बच्चन कुटुंबातील इतर सदस्य , कोणीच यावर प्रतिक्रिया दिली नाही.
View this post on Instagram
याचदरम्यान ऐश्वर्या ही लेकीसोबत दुबईला रवाना झाली. SIIMA पुरस्कार सोहळ्यासाठी पोहचलेल्या ऐश्वर्यासोबत आराध्या नेहमी दिसते. त्यावरही सवाल उपस्थित करण्यात आले. ऐश्वर्याच्या सांगण्यानुसार, ‘ स्टार्सची मुलं ही इतर मुलांच्या तुलनेत खूप आलिशान आयुष्य जगतात. पण त्यांच्यासाठी नॉर्मल आयुष्य जगणं हेही तितकंच महत्वाचं आहे. मला माझ्या मुलीच्या आजूबाजूला कडेकोट प्रायव्हसी ठेवायची आहे’ , असं ऐश्वर्याने नमूद केलं.
मात्र ऐश्वर्याने ही मुलाखत दिली तेव्हा आराध्या खूप लहान होती. तेव्हा ऐश्वर्या नेहमी आराध्याला शाळेत सोडण्यासाठी आणि परत आणण्यासाठी जायची. इतर पालकांप्रमाणेच ती मुलीला मित्र-मैत्रिणींकडे खेळायला घेऊन जायची. गेल्या अनेक वर्षांपासून ऐश्वर्या ही कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होते, मुलीचा जन्म झाल्यावर ती आराध्यालाही दरवर्षी तेथे घेऊन जाते. माझी मुलगी हा माझ्यासाठी अतिशय महत्वाची आहे, बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम आहे, असंही ऐश्वर्याने नमूद केलं होते.