राज कुमार यांनी हत्या का केली? जुहू बीचवर मुलीसोबत काय घडलं? अभिनेत्याने रागाच्या भरात केली हत्या
दिग्गज अभिनेते राज कुमार यांनी एकदा एका माणसाला एवढी मारहाण केली होती की त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी राज कुमार यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता, मात्र नंतर त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांनी एका मुलाखतीत दिग्गज अभिनेते राज कुमार यांच्याबद्दल काही मनोरंजक खुलासे केले आहेत. रझा मुराद यांनी सांगितले की, एकदा रागाच्या भरात राज कुमारने एका व्यक्तीला एवढी मारहाण केली होती की त्याचा मृत्यू झाला होता. या हत्येनंतर राज कुमार यांच्यावरील खटला अनेक महिने प्रलंबित होता आणि त्यांना न्यायालयाच्या चकरा माराव्या लागल्या होत्या. मात्र, अखेर या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आता नेमकं हे प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया…
नेमकं काय झालं?
रझा मुराद यांनी यांनी नुकतीच एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत रझा मुराद यांनी राज कुमार यांच्याशी संबंधित एक किस्सा सांगितला आहे. ते म्हणाले, “ते माझे वडील मुराद साहेबांचे खूप चांगले मित्र होते. एकदा ते एका मित्र आणि त्यांच्या मैत्रिणीसोबत जुहू बीचवर गेले होते. तिथल्या महिलेवर कोणीतरी असभ्य कमेंट केली होती. राज साहेबांना ते पाहून राग आला आणि राज साहेबांनी त्या व्यक्तीला इतकी मारहाण केली की त्याचा मृत्यू झाला होता. राज साहेबांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.”




वाचा: ‘मी गुंड असतो तर बरं झालं असतं’, सलमानच्या सिकंदरमुळे मराठी सिनेमा हटवल्यामुळे अभिनेता संतापला
निर्दोष सुटका झाली
रझा मुराद पुढे म्हणाले, “माझे वालिद साहब राज कुमार यांचे खूप चांगले मित्र होते. त्यामुळे ते प्रत्येक कोर्टाच्या सुनावणीला जायचे, ते खूप चांगले मित्र होते. हा खटला अनेक महिने चालला आणि नंतर त्यांची निर्दोष सुटका झाली. जेव्हा त्यांची निर्दोष मुक्तता झाली तेव्हा वालिद साहब मुलांसह त्यांच्या घरी गेले होते.”
रझा मुराद यांनी सांगितले की, राज कुमार यांचे जुहू येथे एक कॉटेज होते. रझा मुरादचे वडील मुराद यांनी राज कुमारसाठी फुलांचा हार घेतला होता जेणेकरुन केस जिंकल्याचा आनंद साजरा करता येईल. रझा मुराद यांनी सांगतले की, “जेव्हा आम्ही त्याच्या घरी गेलो तेव्हा माझ्या हातात हार घालण्यासाठी दिला. आणि मी असे जे पाहिले (डोके वर करून), मला वाटले की मी कुतुबमिनारकडे पाहत आहे. तो थोडा खाली वाकला. मग मी त्याला हार घातला.”
रझा मुराद यांनी सांगितले की, ज्यावेळी त्यांच्यावर खुनाचा खटला सुरु होता, त्यावेळी ते बॉलिवूडमध्ये सक्रिय होते. मेहनत करत होते. ते म्हणाला, “तो चित्रपट बनवत होता. तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये होता. ही घटना मदर इंडिया सिनेमाच्या आधीची आहे. त्यावेळी, तो असा अभिनेता होता, ज्याला सर्वजण ओळखत होते. त्याचे अनेक चित्रपट आले होते.”