कहो ना प्यार है सोडल्याचा मला आनंद… असं का म्हणाली होती करीना कपूर खान ?
करीनाने काही वर्षांपूर्वी एक मुलाखती दिली होती. तिने अभिषेक बच्चन सोबत रेफ्युजीमधून पदार्पण केले. पण त्यापूर्वी ती कहो ना प्यार है चित्रपटात हृतिक रोशन सोबत काम करणार होती हे तुम्हाला माहीत आहे का ?
मुंबई : करीना कपूर खान ही (Kareena Kapoor Khan) बॉलिवूडमधील सर्वात महागडी आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. करिनाने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. सध्या प्रत्येक चित्रपट निर्मात्याला बेबोसोबत काम करायचे असते. 2000 साली बॉलीवूडमध्ये प्रवेश करणारी करीना एके काळी खूप बोलकी होती आणि तिचा राग व्यक्त करायला मागेपुढे पाहत नव्हती. पण आता करिना कपूर खानच्या स्वभावात बराच बदल झाला आहे. मग ते संजय लीला भन्साळी सोबतचे भांडण असो, बहीण करिश्माच्या चित्रपटांसारख्या चित्रपटांपासूनचे अंतर असो, किंवा हृतिक रोशनच्या (Hritik Roshan) सुपर ब्लॉकबस्टर चित्रपटातून बाहेर पडल्याचा आनंद असो.
करीनाने 2000 साली एक मुलाखत दिली होती, ज्यामध्ये तिने याबद्दल मोकळेपणाने बोलले होते. करीना तिच्या पहिल्याच चित्रपटात अभिषेक बच्चन सोबत दिसली होती, पण तुम्हाला माहीत आहे का ती 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला ‘कहो ना…प्यार है’ या चित्रपटात दिसणार होती, पण चित्रपट पूर्ण होण्याआधीच तिने हा चित्रपट नाकारला.
‘कहो ना…प्यार है’ मध्ये काम करण्यासाठी करीनाला आईने केली मनाई
‘रिफ्युजी’ चित्रपटापूर्वी करीना कपूर हृतिक रोशनसोबत ‘कहो ना…प्यार है’मध्ये दिसणार होती, मात्र एका छोट्या शूटनंतर तिची आई बबिता यांनी तिला चित्रपट न करण्याचा सल्ला दिला. आणि त्यानंतर करीनाची जागा अभिनेत्री अमिषाने पटेलने घेतली. या मुलाखती दरम्यान बेबोने ‘कहो ना…प्यार है’ चित्रपट न करण्याचा खुलासा केला.
हृतिकच्या क्लोजअपमध्ये 5 तास घालवायचे राकेश रोशन
करीना म्हणाली, ‘कहो ना…प्यार है’ या चित्रपटाला तिने नाही म्हटले नसते तर ती नक्कीच स्टार झाली असती, पण तिला स्टार म्हणून नव्हे तर अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण करायची होती. तिने आपला मुद्दा सविस्तरपणे मांडला आणि म्हणाली, ‘हा चित्रपट हृतिकसाठी बनवला होता. त्याच्या वडिलांनी त्याची प्रत्येक फ्रेम आणि क्लोजअपवर पाच तास घालवले, तर अमीषासाठी पाच सेकंदही घालवले नाहीत. चित्रपटात असे काही भाग आहेत जिथे त्याच्या चेहऱ्यावर मुरुम आणि डोळ्याखालील पिशव्या आहेत.
बेबोने चित्रपटात काम का केले नाही ?
बेबो पुढे म्हणाली, ‘जर मी या चित्रपटात असते तर मला नक्कीच चांगली डील मिळाली असती. पण तरीही मला वाटते की आमच्या दोघांमध्ये लक्ष विभक्त झाले असते. त्यामुळे हा चित्रपट मी केला नाही याचा मला आनंद आहे. मी चित्रपट सोडल्यानंतरही हृतिक आणि माझ्यामध्ये कोणतीही अडचण नाही याचा मला आनंद आहे. आम्ही अजूनही मित्र आहोत. त्याच्या यशाबद्दल मी खूप आनंदी आहे
डेव्हिड धवनसोबत करिअरची सुरुवात करायची नव्हती
त्याच मुलाखतीत करिनाने असेही सांगितले की, तिला करिअरच्या सुरुवातीला डेव्हिड धवनसारख्या दिग्दर्शकांसोबत काम करायचे नाही. जरी त्यांच्या चित्रपटांनी तिच्या बहिणीला स्टार बनवले असले तरी करीनाला तसे चित्रपट करायचे नव्हते. करीना म्हणाली की ती तिच्या बहिणीसारखी अजिबात नाही. बेबो म्हणाली होती की, माझ्या बहिणीने त्यांच्यासोबत (डेव्हिड धवन) तिचे करिअर घडवले, पण मला तसे करायचे नाही. ती म्हणाली होती की जर चांगले काम करणे म्हणजे कमी काम करणे असेल, तर मी कदाचित कमी काम करेन. आणि मला फक्त चांगल्या निर्माते- दिग्दर्शकांसोबत काम करायचे आहे, असेही करीनाने स्पष्ट केले होते.