Salman Khan | त्या एका कारणामुळे सलमान अजूनही सिंगल.. लग्न न करण्यामागचं कारण समोर

सलमानचा भाऊ अरबाज खान, याने नुकतंच दुसर लग्न केलं. मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी त्याने निकाह केला. तेव्हापासून तर चाहत्यांच्या मनात हाच प्रश्न घोळू लागलाय. ' भाईजान, तुझा नंबर कधी ? शादी कब करोगे ?' असाच सवाल सगळे सलमानला करत आहेत.

Salman Khan | त्या एका कारणामुळे सलमान अजूनही सिंगल.. लग्न न करण्यामागचं कारण समोर
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 27, 2023 | 9:13 AM

Salman Khan Birthday | बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानचा आज (27 डिसेंबर) आज 58 वा वाढदिवस आहे. जगभरात कोट्यवधी फॅन्स असलेला सलमान सध्या ‘टायगर 3’ आणि ‘ बिग बॉस 17’ मुळे बराच चर्चेत आहे. गेल्या अनेक दशकांपासून बॉलिवूडवर अधिराज्य करणारा सलमान प्रोफेशनल आयुष्यात खूप पुढे निघून गेला असला तरी पर्सनल (खासगी) आयुष्यात तो अजूनही सेटल नाहीये. वयाच्या 58 व्या वर्षीही तो अजूनही सिंगलच आहे, त्याने अद्याप लग्न काही केलेलं नाही. पण सर्वांचा लाडका ‘भाईजान’ लग्न करणार तरी कधी असाच प्रश्न सर्वांना, विशेषत: त्याच्या चाहत्यांना पडतो.

सलमानचा भाऊ अरबाज खान, याने नुकतंच दुसर लग्न केलं. मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी त्याने निकाह केला. तेव्हापासून तर चाहत्यांच्या मनात हाच प्रश्न घोळू लागलाय. ‘ भाईजान, तुझा नंबर कधी ? शादी कब करोगे ?’ असाच सवाल सगळे सलमानला करत आहेत.

या कारणामुळे सलमान करत नाहीये लग्न..

हे सुद्धा वाचा

याच पार्श्वभूमीवर सलमानचा एका जुना इंटरव्ह्यू चर्चेत आला. त्यात त्याने लग्न न करण्यामागचं कारण स्पष्ट केलंय. लग्न ही (आयुष्यातली) एक मोठी घटना आहे, त्यासाठी लाखो-करोडो रुपये खर्च होतात. आणि सलमानच्या सांगण्यानुसार, तो हा खर्च अफोर्ड करू शकत नाही (त्याला हा खर्च पेलवणार नाही), म्हणूनच तो लग्न करत नाहीये. तर ‘सुलतान’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सलमानने आपण लग्नाबाबत अनलकी असल्याचे नमूद केले होते.

मी लग्न करण्यासाठी उतावीळ आहे, पण समोरच्या व्यक्तीच्या होकाराची वाट पाहतोय. लग्नासाठी पुरूषाची नव्हे स्त्रीची मर्जी लागते, असंही सलमान म्हणाला होता.

अनेक अभिनेत्रींना केलंय डेट

सलमान खानने आत्तापर्यंत अनेक अभिनेत्रींना डेट केलंय. सर्वात पहिले तो सोमी अली सोबत रिलेशनशिपमध्ये होता, पण त्या दोघांच लग्न होऊ शकलं नाही. त्यानंतर तो अभिनेत्री संगीता बिजलानी हिला डेट करत होता. त्यांच्या नात्याची बरीच चर्चाही झाली, पण ते पुढे जाऊ शकलं नाही. असं असलं तरी सलमान आणि संगीता दोघे आजही चांगले मित्र आहेत.

सलमानच्या ज्या रिलेशनशिपची सर्वात जास्त चर्चा झाली ते नातं होतं अभिनेत्री ऐश्वर्या राय सोबत. त्यांचं नातं जगजाहीर होतं पण त्यांच्या ब्रेकअपचे किस्सेही सर्वांनाच माहीत आहेत.

अभिनेत्री कटरिना कैफ आणि सलमान हे दोघेही सीरियस रिलेशनशिपमध्ये होते. पण दुर्दैवाने त्यांचं नांतही फार पुढे जाऊ शकलं नाही. सध्या सलमानचं नाव मॉडेल यूलिया वंतूरशी जोडलं गेलंय, पण दोघांनीही आपल्या नात्यासंदर्भात अद्याप मौन बाळगणंच पसंत केलंय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.