एकाच तारखेला चित्रपट रिलीज करण्याचा स्टार्सचा अट्टाहास का? काय आहे कारण जाणून घ्या

एकाच दिवशी तगडे स्टारकास्ट असलेले दोन चित्रपट समोरासमोर येतात. त्यामुळे स्टार अभिनेत्यांची डोकेदुखी वाढते. पण तरीही ठरलेल्या दिवशीच चित्रपट रिलीज करण्याचा अट्टाहास धरला जातो.

एकाच तारखेला चित्रपट रिलीज करण्याचा स्टार्सचा अट्टाहास का? काय आहे कारण जाणून घ्या
एकाच दिवशी चित्रपट क्लॅश होत असतानाही स्टार्स का धरत आहेत आग्रह? कारण समजून घ्या
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 9:19 PM

मुंबई : सुट्ट्या जोडून येणार आहेत असं दिसलं की, बॉलिवूडमध्ये त्या आधी चित्रपट रिलीज करण्यासाठी योग्य दिवस मानला जातो. खासकरून 15 ऑगस्टला बॉलिवूडचा एक तरी बिग बजेट चित्रपट रिलीज होतो.कारण या दिवसाला विकेंड जोडून आला की चांगला धंदा होतो अशी आशा प्रोड्युसर्स आणि गुंतवणूकदारांना असते. त्यामुळे सोलो चित्रपट रिलीज करण्याची निर्मात्यांची धडपड असते. पण या वर्षी 15 ऑगस्ट आधी दोन बिग बजेट चित्रपट रिलीज होणार आहेत. अक्षय कुमारचा ओह माय गॉड 2 आणि सनी देओलचा गदर 2 चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार आहेत. त्यामुळे बॉलिवूडमधील दोन मोठे चित्रपट एकमेकांसमोर उभे ठाकणार असून त्याचा थेट परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनवर दिसून येईल असं जाणकारांचं म्हणणं आहे. पण असं असताना एकाच दिवशी दोन चित्रपट रिलीज करण्यासाठी का धडपड असते? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

कोरोनामुळे अनेक चित्रपट रिलीजच्या प्रतीक्षेत

गदर चित्रपटाशी निगडीत सूत्रानुसार, चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय अभिनेते नाही तर प्रोड्युसर आणि डिस्ट्रिब्यूटर्स घेतात. गदर 2 चित्रपटाला 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो, त्यामुळे हा दिवस निवडला आहे. दुसरीकडे, कोरोना कालावधीत अनेक चित्रपटांचं चित्रिकरण पूर्ण झालं आहे. पण दोन वर्षांच्या ब्रेकमुळे सर्वच गणित फिस्कटलं आहे. त्यामुळे काही चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आले. तर काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी रिलीज करण्याची वेळ आली आहे. दोन वर्षापूर्वी चित्रिकरण केलेला चित्रपट रिलीज करण्यासाठी अजून उशीर केल्यास तोटा होऊ शकतो. त्यामुळे एकाच दिवशी बॉलिवूडचे चित्रपट रिलीज होत आहेत.

एकाच वेळी रिलीज केलेले चित्रपट चांगला बिझनेस करतील?

बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडच्या चित्रपटमध्येच क्लॅश होतात असं नाही तर दक्षिणात्य चित्रपटाचंही आव्हान असतं. प्रादेशिक चित्रपटही बॉलिवूडच्या चित्रपटांना तगडं आव्हान देतात. जर कंटेंट चांगला असेल तर दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 2001 मध्ये गदर आणि लगान चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाला होता. तेव्हा दोन्ही चित्रपटाने चांगली कमाई केली होती. पण कंटेंट नसेल तर दोन्ही चित्रपट एकाच वेळी आपटू शकतात.

अनेकदा बॉलिवूड चित्रपट समोरसमोर आले आहेत

जिरो आणि केजीएफ 1, काबिल-रईस, दिलवाले-बाजीराव मस्तानी यासारखे चित्रपट एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. गदर 2 आणि ओह माय गॉड 2 या दोन्ही चित्रपटांमद्ये आता कोण बाजी मारतं हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....