‘पार्टनर २’मध्ये सलमान खानसोबत गोविंदा करणार कमबॅक ? पत्नी म्हणाली…
गोविंदा अनेक दिवसांपासून चित्रपटापासून दूर असल्याने पुन्हा परतण्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. अलीकडेच गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी 'पार्टनर २' या चित्रपटात गोविंदा सलमान खानसोबत दिसणार आहे का विचारले असता त्यांनी यावर काय भाष्य केलं आहे ते जाणून घेऊयात.
बॉलीवूड अभिनेता गोविंदा काही दिवसांपासून अभिनयाक्षेत्रापासून दूर आहे. मात्र 90 च्या दशकात गोविंदाने मोठ्या पडद्यावर अधिराज्य गाजवले. त्यांचे चित्रपट आणि गाणी आजही लोकांच्या हृदयात घर करून आहेत. आजही अनेकजण कुटुंबासोबत बसून त्यांचे जुने सिनेमे पाहणे पसंत करतात. २००७ साली कॉमेडी-रोमँटिक ड्रामा फिल्म पार्टनर रिलीज झाला. या चित्रपटात सलमान खान आणि गोविंदा मुख्य भूमिकेत दिसले होते. सलमान-गोविंदा यांच्या या चित्रपटाने लोकांचे भरपूर मनोरंजन केले. अलीकडेच गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाला विचारण्यात आले होते की, पार्टनर 2 या चित्रपटातून तिचा नवरा सलमानसोबत पडद्यावर परत यावा अशी तुमची इच्छा आहे का?
या प्रश्नाला उत्तर देताना सुनीता म्हणाली की, ही चांगली कल्पना आहे कारण प्रेक्षकांना त्यांचे एकत्र काम आवडले आहे. नुकतेच सुनीता आहुजा यांनी दिलेल्या एका मुलाखतीत अनेक प्रश्नांची उत्तरेही दिली. सलमानसोबत गोविंदाच्या पुनरागमनाबाबत त्या म्हणाल्या की, त्यांचा शेवटचा चित्रपट ‘पार्टनर’ चांगला होता. म्हणूनच पार्टनर २ मध्ये दोन्ही कलाकारांनी एकत्र काम करावे अशी माझी इच्छा आहे.
‘पार्टनर २’वर गोविंदाच्या पत्नीची प्रतिक्रिया
सुनीता पुढे म्हणाली, ”पार्टनर २ बद्दल मी खूप ऐकलं होतं, पण काय झालं हेही मला माहित नाही. पण प्रेक्षकांना त्या दोघांना पुन्हा मोठ्या पडद्यावर एकत्र बघायला नक्की आवडेल.” यानंतर सुनीता यांना वरुण धवन बद्दल प्रश्न विचारण्यात आला. वरुण धवनची गोविंदासोबत झालेल्या तुलनेवरही सुनीताने प्रतिक्रिया दिली. सुनीता पुढे म्हणाली, “काही लोक बोलतात, तुलना करतात पण मला ते काय बोलतात हे समजत नाही. वरुणला देखील वाईट वाटत असेल जेव्हा त्याची तुलना केली जात आहे. त्यामुळे कोणाची तुलना कोणाशी केली नाही पाहिजे हे थांबवलं पाहिजे.
वरुणच्या गोविंदाशी केलेल्या तुलनेवर सुनीताची प्रतिक्रिया
सुनीताच्या म्हणण्यानुसार, तिचे वडील डेव्हिड धवन यांनी गोविंदासोबत 17-18 सिनेमे केले आहेत. त्यामुळे तेच चित्रपट आणि काम वरुण ने फार जवळून पहिले आहेत. वरुण लहानपणापासूनच खेळकर मुलगा होता. सुनीतासोबतच तिच्या संपूर्ण कुटुंबाला गोविंदाला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा आहे.त्यामुळे गोविंदाचे चाहते देखील त्यांच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत.