Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रोमिओ अकबर वॉल्टर’ सिनेमाने जॉन बॉक्स ऑफिसवर हॅट्ट्रीक करणार?

मुंबई : अभिनेता जॉन अब्राहम याची मुख्य भूमिका असणार ‘रोमिओ अकबर वॉल्टर (Romeo Akbar Walter)’ हा सिनेमा येत्या 5 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात जॉनने एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. हा रॉ एजंट पाकिस्तानात जाऊन तिथल्या लष्करात भर्ती होतो आणि भारताला पाकिस्तानच्या सैन्याची गुप्त माहिती पुरवतो. या सिनेमाचं दिग्दर्शन रॉबी ग्रेवाल यांनी केलं […]

‘रोमिओ अकबर वॉल्टर’ सिनेमाने जॉन बॉक्स ऑफिसवर हॅट्ट्रीक करणार?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

मुंबई : अभिनेता जॉन अब्राहम याची मुख्य भूमिका असणार ‘रोमिओ अकबर वॉल्टर (Romeo Akbar Walter)’ हा सिनेमा येत्या 5 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात जॉनने एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. हा रॉ एजंट पाकिस्तानात जाऊन तिथल्या लष्करात भर्ती होतो आणि भारताला पाकिस्तानच्या सैन्याची गुप्त माहिती पुरवतो. या सिनेमाचं दिग्दर्शन रॉबी ग्रेवाल यांनी केलं आहे.

हा सिनेमा रॉ एजंट रंविंद्र कौशिक यांच्या जीवनावर आधारित असल्याची माहिती आहे. गेल्यावर्षी जॉनचे ‘सत्यमेव जयते’ आणि ‘परमाणू : द स्टोरी ऑफ पोखरण’ हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले होते. हे दोन्ही सिनेमे देशावर होते. तसेच या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.

‘सत्यमेव जयते’ आणि ‘परमाणू : द स्टोरी ऑफ पोखरण’ हे दोन्ही सिनेमे देशभक्तीपर होते. तर जॉनचा आगामी ‘रोमिओ अकबर वॉल्टर’ हा सिनेमाही देशावर आहे. त्यामुळे हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर हीट ठरेल, असा अंदाज लावला जात आहे. कारण, जॉन यात पाकिस्तानमध्ये भारताचा गुप्तहेर बनला आहे, त्यामुळे त्याची भूमिका प्रेक्षकांना आकर्षित करु शकते. जर हा सिनेमा हीट झाला तर जॉनचे एका पाठोपाठ तीन सिनेमे हीट होतील, त्यामुळे जॉन हीट सिनेमांची हॅट्ट्रीक करणार का, हे तर 5 एप्रिलनंतरच कळू शकेल.

‘सत्यमेव जयते’ आणि ‘परमाणू : द स्टोरी ऑफ पोखरण’ या सिनेमांनी किती कमाई केली?

15 ऑगस्ट 2018 ला ‘सत्यमेव जयते’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. जॉनच्या ‘सत्यमेव जयते’ या सिनेमाने 80 कोटी 50 लाख रुपयांचा गल्ला जमवला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन मिलाप मिलन झवेरी यांनी केलं होतं. यामध्ये जॉन हा मुख्य भूमिकेत होता, तर अभिनेता मनोज वाजपेयी यांचीही महत्त्वाची भूमिका होती. यामध्ये जॉन हा भ्रष्टाचाराविरोधात लढताना दिसला आहे.

‘परमाणू : द स्टोरी ऑफ पोखरण’ हा सिनेमा 25 मे 2018 ला प्रदर्शित झाला होता. 1998 ला भारताने राजस्थानच्या पोखरण येथे अणू बॉम्ब चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली, त्यावर हा सिनेमा होता. ही भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे. दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं. हा सिनेमाही बॉक्सऑफिसवर चांगला गाजला. या सिनेमाने 65 कोटी 89 लाख रुपयांची कमाई केली होती.

पाहा व्हिडीओ :

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.