Urmila Matondkar : घटस्फोटांच्या बातम्यांमुळे चर्चेत, उर्मिला मातोंडकर ‘बिग बॉस’मध्ये झळकणार ?

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्या वैयक्तिक आयुष्यात मोठी उलथापालथ झाली आहे. ती तिचा पती मोहसिन याच्यापासून विभक्त होणार असून घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला आहे. मात्र दोघांकडूनही याबद्दल अद्याप कोणतेही अधिकृत स्टेटमेंट देण्यात आलेले नाही.

Urmila Matondkar : घटस्फोटांच्या बातम्यांमुळे चर्चेत, उर्मिला मातोंडकर 'बिग बॉस'मध्ये झळकणार ?
उर्मिला मातोंडकर 'बिग बॉस'मध्ये झळकणार ? Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 12:28 PM

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असलेली उर्मिला मातोंडकर हिने 90 च्या दशकात धमाल केली होती. तिने एकाहून एक सरस, हिट चित्रपट दिले, मात्र ती केवळ अभिनेत्रीच नव्हे तर एक राजकारणी देखील आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पडद्यावर फारशी सक्रीय नसलेली उर्मिला पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आली आहे, पण ते तिच्या खासगी जीवनामुळे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, उर्मिलाच्या वैवाहिक जीवात खळबळ माजली असून ती 8 वर्षांचा संसार नमोडत विभक्त होणार आहे. उर्मिलाने 8 वर्षांपूर्वी मोहसिन अख्तरशी लग्न केलं होतं, मात्र आता ती वेगळी होणार असून तिने घटस्फोटासाठी अर्जही दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र परस्पर संमतीने हा घटस्फोट होत नसल्याचेही वृत्त समोर आले. जेव्हा एखादा सेलिब्रिटी एखाद्या वादात अडकतो तेव्हा त्याचे मित्र अनेकदा त्याच्यापासून दूर राहतात. पण बिग बॉस नेहमीच अशा सेलिब्रिटींच्या शोधात असतात.

आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उर्मिला मातोंडकरच्या घटस्फोटाची बातमी व्हायरल झाल्यानंतर तिला सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस शोमध्ये सहभागी होण्याची ऑफर मिळाली आहे. सलमान आणि उर्मिलाने अनेक वर्षांपूर्वी ‘जानम समझा करो’ या चित्रपटात एकत्र काम केलं होते. आता सलमानची एकेकाळची ही को-स्टार त्याच्या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. पण, आत्तापर्यंत अनेक रिॲलिटी शो जज केलेल्या उर्मिलाने अद्याप बिग बॉस 18 मध्ये येण्यासाठी होकार दिलेला नाही.

10 वर्षांनी लहान मोहसिनशी केलं लग्न

एकेकाळी मोठ्या पडद्यावर राज्य करणाऱ्या उर्मिलाने 8 वर्षांपूर्वी तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या मोहसिन अख्तरसोबत लग्न केले. अनेक मतभेद असल्याने दोघेही घटस्फोट घेणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, उर्मिलाने या प्रकरणाबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसून, या बातमीला दुजोरा दिलेला नाही किंवा ती अद्याप नाकरालेली नाही. मोहसिन यानेही त्याचं मौन कायम राखलं आहे.

यापूर्वी अनेक रिॲलिटी शो केले जज

रिॲलिटी शोजशी उर्मिला हिचं खूप जुनं नातं आहे. झलक दिखला जा सीजन 2 ते चक धूम धूम, डान्स महाराष्ट्र डान्स, डीआयडी सुपरमॉम असे अनेक रिॲलिटी शो जज केले आहेत. पण ती आत्तापर्यंत कोणत्याही रिॲलिटी शो मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली नाही. उर्मिला मातोंडकरसारख्या दिग्गज सेलिब्रिटीला बिग बॉसमध्ये येण्यासाठी राजी करणं हे निर्मात्यांसाठठी सोपं ठरणार नाहीये.पण बिग बॉसच्या निर्मात्यांना आशा की, पूजा भट्ट हिच्यानंतर चित्रपटसृष्टीतील मोठे चेहरे देखील या शो मध्ये सहभागी होतील. आता, उर्मिला मातोंडकर सलमानच्या शोमध्ये होण्यास होकार देते की बिग बॉसची ऑफर नाकारते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.