आकाशवाणी.. सर्वजनांत सर्वांच्या मनात.. आज जागतिक रेडिओ दिन! लोकप्रिय माध्यमाच्या प्रवासावर एक दृष्टीक्षेप

13 फेब्रुवारी 1945 रोजी संयुक्त राष्ट्र रेडिओचे पहिल्यांदा प्रसारण झाले होते. त्यामुळे हा जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र याची अधिकृत घोषणा अगदी अलीकडे म्हणजेच 2013 रोजी झाली.

आकाशवाणी.. सर्वजनांत सर्वांच्या मनात.. आज जागतिक रेडिओ दिन! लोकप्रिय माध्यमाच्या प्रवासावर एक दृष्टीक्षेप
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 2:00 AM

आज माणसं जिथं जातात तिथं मोबाइल नेतात, तसा एकेकाळी शहरापासून अगदी खेडेगावापर्यंतच्या माणसांच्या हाती रेडिओ दिसायचा. रेडिओवरील (Radio Songs) भूपाळी अन् सकाळच्या बातम्यांनी घरा-घरात सूर्य उजाडायचा. अनेक घरात तर रेडिओवरच्या बातम्या सुरु होण्याआधी उठण्याचा दंडक असायचा. ‘आप की पसंत’ कार्यक्रमात आपल्या माणसासाठी गाणं ऐकवण्यासाठी हजारो पत्र यायची. लोकप्रिय दहा गाणी ओळखण्यासाठी पैजा लावल्या जायच्या. आज टीव्ही (Television), मोबाइलवर हवं ते ज्ञान मिळवता येतं, हवं ते गाणं कधीही ऐकता येतं. मात्र विश्वसनीयतेसाठी आजही ओळखली जाते ती रेडिओ म्हणजेच आकाशवाणी. याच आकाशवाणीचा अर्थात रेडिओचा आज जागतिक स्तरावरील हक्काचा दिवस. 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन (World Radio Day). त्यानिमित्त रेडिओच्या आतापर्यंतच्या प्रवासावर एक दृष्टीक्षेप….

फादर ऑफ रेडिओ कोण?

जगातला पहिला रोडिओ बनवला मार्कोनी या इटलीच्या शास्त्रज्ञानं. 1895 मध्ये त्यानं रेडिओचा शोध लावला आणि त्याचं पेटंटही मिळवलं. मार्कोनीला ‘फादर ऑफ रेडिओ’ असेही म्हणतात. इंग्रजांनी आणि अनेक युरोपीयन देशांनी हे तंत्रज्ञान आपापल्या वसाहतीत नेलं. याच माध्यमातून अमेरिका, आफ्रिका, आशिया खंड आणि ऑस्ट्रेलिया असा रेडिओचा प्रसार झाला. त्या काळी हे माध्यम प्रामुख्यानं कम्युनिकेशनसाठी वापरलं जात होतं. विशेषतः युद्धकाळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, अनेक खेळांच्या कॉमेंट्रीसाठी रेडिओचा वापर होऊ लागला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातही ब्रिटिशांनीच रेडिओ आणाला. 23 जुलै 1927 रोजी मुंबई आणि कलकत्ता येथे ऑल इंडिया रेडिओ नावाने दोन केंद्र सुरु झाली. त्यानंतर 1932 मध्ये भारत सरकारनं भारतीय प्रसारण सेवा नावाचा एक विभाग सुरु केला. 1936 मध्ये त्याचं नाव ऑल इंडिया रेडिओ AIR असं ठेवण्यात आला.

स्वातंत्र्यलढ्यात रेडिओची महत्त्वाची भूमिका

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात रेडिओने महत्त्वाची भूमिका बजावली. 1942 मध्ये जेव्हा राष्ट्रीय काँग्रेस रेडिओचे प्रसारण सुरु झाले, तेव्हा महात्मा गांधींनी या रेडिओ स्टेशनवरूनच ब्रिटिशांना भारत छोडो.. अशी घोषणा दिली. एवढेच नाही तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीही ‘तुम मुझे खून दों, मै तुम्हे आझादी दुंगा’ ही घोषणाही जर्मनीतील रेडिओद्वारेच दिली होती. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याची इच्छा प्रत्येक भारतीयाच्या मनात जागृत करण्यासाठी स्वातंत्र्य योद्ध्यांनी रेडिओवरूनच घोषणा दिल्या. स्वातंत्र्यानंतर 1957 साली ऑल इंडिया रेडिओचे नाव बदलून आकाशवाणी असे ठेवण्यात आले. हळू हळू आकाशवाणीचे जाळे देशभर पसरू लागले. आज 23 भाषांमध्ये 415 रेडिओ स्टेशनसह ऑल इंडिया रेडिओ ही जगातल्या सर्वात मोठ्या रेडिओ प्रसारण सेवांपैकी एक बनली आहे. 2001 मध्ये भारतात खासगी रेडिओ स्टेशनलाही सुरुवात झाली.

जागतिक रेडिओ दिवस अधिकृत कसा बनला?

रेडिओ हे संवादाचे, माहिती व ज्ञानाचे प्रभावी आणि सर्वात जुने माध्यम आहे. 13 फेब्रुवारी 1945 रोजी संयुक्त राष्ट्र रेडिओचे पहिल्यांदा प्रसारण झाले होते. त्यामुळे हा जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र याची अधिकृत घोषणा अगदी अलीकडे म्हणजेच 2013 रोजी झाली. तेव्हापासून युनेस्कोद्वारे जगभरातील रेडिओ प्रसारक आणि संघटनांच्या मदतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतेय संवादाचे माध्यम म्हणून रेडिओच्या भूमिकेवर चर्चा केली जाते.

Radio Day 2022 ची थीम काय?

यूनेस्कोद्वारे दरवर्षी रेडिओ दिनाची एक थीम ठरवण्यात येते. त्यानुसार रेडिओचा प्रभावी प्रसार आणि प्रचार केला जातो. यंदाची 2022 ची रेडिओ दिवसाची थीम आहे Radio And Trust! जगात माहिती देणारे असंख्य स्रोत इंटरनेटने आपल्या पदरात टाकलेत. सोशल मीडियावर तर माहितीचा धुमाकुळ माजलेला असतो. मात्र रेडिओ किंवा आकाशवाणीकडे लोक अजूनही विश्वासू माध्यम म्हणून पाहतात. त्यामुळेच तंत्रज्ञानाने माहितीचे लाखो प्रवाह आणले तरीही रेडिओचं स्थान कुणीही घेऊ शकत नाही, हेच यातून सिद्ध होतं.

रेडिओ कालचा आणि आजचा

गेल्या जवळपास शंभर एक वर्षात रेडिओनं अनेक स्थित्यंतरं अनुभवली. त्याच्या स्वरुपात, तंत्रज्ञानात बदल झाले. सादरीकरणाची शैली, कार्यक्रमांच्या संकल्पना बदलल्या. रेडिओची भाषा बदलली. निवेदकांऐवजी RJ आले. शांत, संयमी भाषेला सुपरफास्ट, इंग्रजी, हिंदी, मराठी संमिश्र भाषा जोडली गेली. मोठ्या शहरांमध्ये ट्रॅफिकमध्ये फसलेल्या लोकांसाठी योग्य माहिती पुरवण्याचे काम रेडिओ करतो. नव्या युगाचे श्रोते जोडले जात आहेत, तसे रेडिओचे चॅनल्सदेखील नवे निर्माण होत आहेत. मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समाजासाठी सरकारनं कम्युनिटी रेडिओची संकल्पानी सुरु केली आहे. याअंतर्गत अनेक विद्यापीठांचे स्वतःचे कम्युनिटी रेडिओ आहेत. भारतात सध्या 251 कम्युनिटी रेडिओ आहेत.

इतर बातम्या-

Special Report | निवडणुकीचा धुरळा, राजकीय पक्षांकडून अश्वासनांची खैरात

Molestation Case : प्रत्येक स्पर्श वाईट नसतो; विनयभंगाच्या गुन्ह्यात क्रीडा शिक्षकाची निर्दोष सुटका

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.