Worli Hit & Run case : समोर उंदीर आला तरी गाडी डगमगते, तुम्ही निर्दयीपणे माणूस उडवता?; अभिनेते जयवंत वाडकर यांचा संताप

' गाडी चालवताना साधा उंदीर जरी समोर आला तरी आपण डगमगतो, गाडी इकडे तिकडे होते. आणि इथे समोर अख्खा जिवंत माणूस आलाय तरी तुम्ही त्याला उडवताय हे किती निर्दयी आहे ' असा शब्दांत अभिनेते जयवंत वाडकर यांनी उद्वेग व्यक्त केला.

Worli Hit & Run case : समोर उंदीर आला तरी गाडी डगमगते, तुम्ही निर्दयीपणे माणूस उडवता?; अभिनेते जयवंत वाडकर यांचा संताप
Follow us
| Updated on: Jul 09, 2024 | 11:58 AM

वरळीत रविवारी पहाटे झालेले ‘हिट अँड रन’चे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या अपघाताला ४८ तास उलटून गेले तरी मुख्य आरोपी मिहीर शाह याला शोधण्यात, अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. शिवसेना शिंदे गटाचे नेते राजेश शाह हे त्याचे वडील असून अपघातानंतर त्यांनीच मुलाला पळून जाण्यास सुचवले आणि ड्रायव्हरला अपघाताचा आळ घेण्यास सांगितले. या सगळ्या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून एका महिलेचा नाहक जीव घेणाऱ्या त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करण्यात येत आहे. या घटनेतील नवनवे अपडेट्स रोज समोर येत आहेत. दरम्यान अतिशय निर्घृण अशा पद्धतीने झालेल्या या अपघाताबद्दल मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘ आपण गाडी चालवताना साधा उंदीर जरी समोर आला तरी आपण डगमगतो, गाडी इकडे तिकडे होते. आणि इथे ( या घटनेत) समोर अख्खा जिवंत माणूस आलाय तरी तुम्ही त्याला उडवताय हे किती निर्दयी आहे ‘ असा शब्दांत जयवंत वाडकर यांनी उद्वेग व्यक्त केला. उद्दामपणा आणि पैशाचा माज थांबला पाहिजे, असल्या लोकांना फटके दिल्याशिवाय पर्याय नाही असे म्हणत या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर अटक करून शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी वाडकर यांनी केली.

वरळीतील हिट अँड रन प्रकरणात मच्छी आणण्याठी गेलेल्या कोळी दांपत्याला एका बीएमडब्ल्यूने उडवले. वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा दांपत्य हे सकाळी ससून डॉकला मच्छी आणण्यासाठी गेले होते. मच्छी घेऊन परतत असताना एका चारचाकीने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या दुर्घटनेत कावेरी नाखवा (वय ४५) यांचा मृत्यू झाला तर त्यांचे पती प्रदीप गंभीर जखमी झाले. कावेरी ही अभिनेते जयवंत वाडकर यांची बहीण असून त्यांच्या मृत्यूमुळे त्यांना तीव्र दु:ख झाले आहे. या घटनेनंतर टीव्ही9 शी संवाद साधताना उद्विग्न झालेल्या वाडकर यांनी संताप व्यक्त केला.

बहिणीच्या आठवणीने वाडकर झाले भावूक

राज्यात हिट अँड रनच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यात घडत आहेत. पुण्यातील घटनेत दोन तरूण जीवांनी आयु्ष्य गमावलं, राज्यात आणखीही अशाच घटना घडल्या, ते ऐकूनचं कसंतरी वाटतं होतं. आणि काल ( रविवार पहाटे) घडलेली घटना तर माझ्या नातेवाईकांशी निगडीतच होती. कावेरी माझी बहीण होती, तिच्या मृत्यूमुळे मोठा धक्का बसला आहे. माझं शूटिंग आणि नाटकाचा प्रयोग असल्यामुळे मी शेवटच्या दर्शनाला जाऊ शकलो नाही, पण माझा मुलगा, छोटा भाऊ तिकडे गेले होते, तिला बघवतही नव्हतं,असं सांगताना वाडकरांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

‘ इतक्या विकृतपणे ही घटना घडली आहे. गाडीसमोर उंदीर आला तरी गाडी इकडेतिकडे होते, पण इथे तर समोर हाडामांसाचा माणूस असूनही तु्म्ही गाडी अंगावर घालता आणि तसेच पुढे निघून जाता ? हे किती निर्दयी आहे ? हा उद्दामपणा , पैशांचा माज कुठेतरी थांबला पाहिजे.

अशा लोकांना फटके दिल्याशिवाय…

या घटनेतील आरोपीला अद्याप अटक झाली नसल्याबद्दलही वाडकर यांनी संताप व्यक्त केला. त्या मुलाचा सर्व रेकॉर्ड तुमच्याकडे आहे, पण तरी मुलगा गायब होतो याचं मला नवल वाटतं. मला नक्की माहीत नाही, पण असं वाटतंय की या सर्व गडबडीत तो मुलगा देशाबाहेर सुद्धा गेला असेल, अशी शंका त्यांनी व्यक्त केली,

उद्दामपणे गाडी चालवत, नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा लोकांना आमच्या किंवा माणसांच्या ताब्यात दिल पाहिजे. मी माझ्या भाऊजींना या घटनेनंतर फोन केला तेव्हा ते रडत होते. ते म्हणाले, मी त्याला ( मिहीर शाह) सांगत होतो, गाडी थांबव,थांबव तरी त्याने गाडी थांबवली नाही, हा उद्दामपणा आहे. मला ही घटना कळली, मला अनेक फोन आले होते. मी त्यांच्याशी बोललो. पोलिसांशी मी स्वतः बोललो, आम्ही कारवाई करूच असं त्यांनी सांगितलं आहे. पण ही घटना कळल्यावर मला राहवत नव्हतं, थरकाप उडाला.

पोलिसांना 24 तास दिले तर..

माझी शासनाला विनंती आहे कि त्याला पकडा. लोकांचा माज वाढला आहे. पोलिसांची दहशत कमी झालीय, पूर्वीसारखी राहिली नाही असं मला वाटतंय. लोक त्यांना घाबरत नाहीत, अशा शब्दांत वाडकर यांनी भावना मांडल्या. कायद्याचा उरेलला धाक नाही. पोलीस तत्पर असतात, ते काम करतात. पण कायदा आणखी सॉलिड करता येईल याकडे लक्ष दिल पाहिजे. पैशाने लोकांची मानसिकता बदलली आहे. अनेकांचा हस्तक्षेप असतो तो थांबला पाहिजे. पोलिसांना 24 तास दिले तर पोलीस सगळे गुंड 24 तासात आत टाकू शकतात असा माझा विश्वास आहे… पोलीस करू शकतात पण त्यांना साथ दिली पाहिजे, असेही वाडकर म्हणाले.

काहीही करा पण त्याला पकडा

माझी सरकारकडून अपेक्षा आहे कि एवढ्या गोष्टी माहिती आहेत तर तो कुठ आहे तुम्हाला का माहिती नाही का? असा सवाल त्यांनी विचारला. मिहीर शाहचा ड्रायव्हर मिळाला, तर तो (आरोपी) का सापडला नाही? काहीही करा पण त्याला पकडा? आमच्या हातात ट्रायल द्या, अशी मागणी त्यांनी केली.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.